Read in
मंगळवार 16 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 16 मार्च चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अश्र्विनी अहोरात्र. आज शुक्राची मीन राशीत प्रवेश करण्याची वेळ 27:00 आहे.
वरील राशी व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून करून कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आज तुमच्या स्वभावातील लहरीपणा वाढेल त्यामुळे कोणत्याच विषयाच्या निर्णयावर येऊ नका. वयस्करांना आज आपल्या प्रकृतीविषयी कांहीतरी होतय अशी भावना राहील. कोणीतरी आपल्याला फसवत आहे असे विचार मनात येतील पण त्या विचारांकडे दुर्लक्ष करा.
वृषभ :–अध्यात्मिक अभ्यास करणार्यांना त्याच्या सर्वामध्ये अडचणी निर्माण होतील. दवाखान्यात अँडमिट असलेल्यांना आज सोडणार, उद्या सोडणार असे करत बुधवार 18 ची संध्याकाळ येईल तरी जराशीही घाई करू नका.
मिथुन :–ज्या व्यवसायाच्या परवानगीसाठी तुम्ही अर्ज केला आहे त्याचे काम आजही पुढे सरकणार नाही. नुसते हेलपाटेच होतील. मित्र व शेजारी यांच्या आर्थिक गरजेला मोठी मदत करावी लागेल. सरकारी कामाला आज लक्ष घालू नका.
कर्क :–नवीन नोकरी शोधावी खां एखादा व्यवसाय सुरू करावा या विचारांच्या गोंधळात अडकाल. भागिदारीच्या व्यवसायात अचानक भांडवल वाढवण्याची गरज निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी आळस झटकून जोरात अभ्यासाला सुरुवात केली तर यश टप्प्यात येईल.
सिंह :–वृत्तपत्राचे संपादक, विशेष लेखन करणारे बुद्धीमान व प्रतिभावान मंडळीना चालू घडामोडीवर वेबिनारच्या माध्यामातून विचार मांडता येणार आहेत. सरकारी नोकरीतील पदाधिकारी नकोत्या मानसिक त्रास देणार्या भानगडीत अडकतील.
कन्या :–वारसाहक्काबाबतच्या कामाला न्यायालयात दाद मागावी लागेल. नव्याने बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी संडास, बाथरूम, सांडपाणी या जागांसाठी विशिष्ट दिशांचे पालन करा. सरकारी नोकरीत असलेल्यांनी तुम्हाला नसलेल्या कोणत्याही अधिकाराचा वापर करू नका.
तूळ :–महिलांना गर्भाशयाचा त्रास असणार्यांनी विशेष काळजी घ्यावी व तज्ञांचा सल्ला घ्यावा. गूढविद्ध्या शिकण्याची संधी अचानक चालून येईल. गुरूतुल्य व्यक्तींकडून महत्वाच्या कामात मार्गदर्शन घ्यावे लागेल मनाने निर्णय घेऊ नका.
वृश्र्चिक :–मानसिक विचारांची दोलायमानता वाढेल. कोणत्याही कामातील चांगल्या गोष्टी ऐवजी नकारात्मक गोष्टीच जास्त नजरेस पडतील. कुटुंबातील जवळच्या नात्याबरोबर सुद्धा आज वैचारिक संघर्ष होईल. वृद्धांच्या पाठीच्या दुखण्याचा त्रास वाढेल.
धनु :–लेखक, कवी यांना त्यांच्या लेखनासाठी समाजाकडून उस्फूर्त दाद मिळेल. लहान मुलांच्या डोक्याला मार लागण्याची भिती आहे. पौगंडावस्थेतील मुलांनी कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी आई वडीलांचा सल्ला घेणे आवश्यकआहे.
मकर :–विद्यारथ्यांकरीताचे पुढील वर्षीच्या शैक्षणिक वर्षाचे नियोजन आत्ताच करावे लागेल. उच्च शिक्षणाकडे डोळे लावून बसलेल्यांनी आपले प्रयत्न सोडू नये. शैक्षणिक कर्जाच्या सोयीची माहिती घ्या व मगच पाउल पुढे टाका.
कुंभ :–नोकरीच्या ठिकाणी तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीवर टीका केली जाईल. पतीपत्नीमधील वाद संपुष्टात आणण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतल्यास यश मिळेल. महिलांच्या मानसिक भिती मधे वाढ झाल्याने गाडी चालवू नये.
मीन :–लहान मुलांच्या प्रतिकार शक्ती विषयी अंदाज लावत बसू नका. विशेष काळजी घ्या. ज्येष्ठ मंडळीना डोळ्यांना दुखापत होण्याचा धोका आहे. अपत्यप्राप्तीच्या प्रतिक्षेतील मंडळीना येत्या ३ दिवसात गोड बातमी कळणार आहे.
| शुभं-भवतु ||
Thank you Tai