Read in
सोमवार 15 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 15 मार्च चंद्ररास मीन 28:42 पर्यंत नंतर मेष. चंद्र नक्षत्र रेवती 28:42 पर्यंत व नंतर अश्र्विनी. आजचा दिवस शुभ असल्याने दिवसभरात कोणतीही शुभ कामे करायला हरकत नाही.
वरील राशी व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून करून कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– आज मनाची संभ्रमावस्था राहील, कोणत्याही महत्वाच्या कामाविषयी निर्णय घेण्यात अडचणी निर्माण होतील. सहकार क्षेत्रातील कर्मचार्यांना नवीन काँन्ट्रक्टचा विचार करावा लागेल. जागा भाड्याने देत असाल तर आज व्यवहारात स्पष्टता ठेवा.
वृषभ :–व्यवसायातील नव्या मार्गाचा अवलंब करण्यास आजचा दिवस थांबलात तर चांगले होईल. तेच तेच काम करून कंटाळलेल्यानी कामाला जरा ब्रेक घेण्याची गरज आहे. महिलांना स्वयंपाकघरातील कामाचा उबग येईल तरी पती राजांनी विचार करावा.
मिथुन :–मानसिक ताणामुळे न घडलेल्या गोष्टीही घडल्यात असे वाटून पुन्हा मानसिक ताण वाढेल. मानसोपचार तज्ञांना दाखवण्याची गरज निर्माण होईल. शाळकरी मुलांना वर्षभराच्या अभ्यासाचा सराव पुरेसा होणार नाही तरी पालकांनी लक्ष द्यावे.
कर्क :–कोणत्याच कामात नेहमीची पद्धत लागू पडणार नाही. कामाच्या पद्धतीत बदल करावा लागेल. तरूणांकडून एखाद्या वेबिनारच्या माध्यामातून सामाजिक विषय अतिशय पद्धतशीरपणे हाताळला जाईल.
सिंह :–तुमच्यापासून दूर राहणार्या आईवडीलांच्या गरजांकडे लक्ष द्यावे लागेल. घरातील नूतनीकरणाच्या विषयावर एकमत होऊन विचार पुढे सरकतील. महिला पोलीस अधिकार्यांना आजचा दिवस अतिशय कष्टाचा व त्रासाचा जाईल.
कन्या :–जुळ्या मुलांच्या संदर्भातील प्रकृतीच्या तक्रारी डोके वर काढतील. वयस्कर मंडळीना कानातील मळ काढताना दुखापत होण्याचा धोका आहे. मनाला त्रास देणार्या घटना इतरांकडून घडतील. तरूणांच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल.
तूळ :–नोकरीतील बदलीबाबतचा विचार वरीष्ठांकडून नाकारला जाईल. नवीन नोकरीच्या मुलाखतीसाठी आज तुम्हाला समाधान मिळणार नाही. बँकींग क्षेत्रातील कर्मचार्यांना अचानक कामाबाबत उत्साह वाटणार नाही.
वृश्र्चिक :–आजारी व हाँस्पिटल मधे अँडमिट असलेल्यांना कालच्या पेक्षा आज आराम पडू लागल्याचे जाणवेल. वैवाहिक जीवनातील न पटणार्या गोष्टींबाबत अती तणाव निर्माण केल्यास सर्वच गोष्टी बिघडून जातील.
धनु :– स्टँडप कामेडी करणारे, नाटकात, सिरियलमधे काम करणार्यांना नवीन कामाच्या आँर्डर्स मिळतील. विद्यार्थ्यांना परिक्षेच्या भितीने अभ्यासातून डोके वर काढावेसे वाटणार नाही. आरोग्याची विशेष काळजी न घेतल्याने त्रास होणार आहे तरी जागरूक रहा.
मकर :–निवृत्त झालेल्या वडीलांच्या बँकेतील शिल्लकीवर मुलांचा डोळा राहील. ज्येष्ठांना अचानक कुटुंबासाठी मोठा खर्च करावा लागेल. आईकडून येणार्या वारसाहक्काबाबत विनाकारण उलटसुलट चर्चा होतील पण त्यातून निष्पन्न काहीच होणार नाही.
कुंभ :–कोणत्याही परिस्थितीत तुमच्यावर टाकलेली जबाबदारी तुम्हाला पार पाडावी लागेल. सरकारी अधिकार्यांचा आज अचानक पारा चढणार आहे. न्यायालयातील कामकाजात जज्जसाहेबांकडून खडे बोल ऐकवले जातील.
मीन :–महिलांना पित्ताशयातील खेड्यांचा त्रास विकोपाला जाण्याची भिती राहील. आरोग्याच्या कोणत्याही तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. वयस्क मंडळीना डाँक्टरांकडून डायलिसीसचा सल्ला दिला जाईल. प्रथम संततीकडून अतिशय आनंदाची बातमी कळेल.
| शुभं-भवतु ||
Thank you Tai