Read in
रविवार 07 मार्च 2021 ते शनिवार 13 मार्च 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य
14.रविवार चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा 26:18 पर्यंत. 15 सोमवार चंद्ररास मीन 28:42 पर्यंत व नंतर मेष.
चंद्र नक्षत्र रेवती 28:42 पर्यंत व नंतर अश्र्विनी. 16 मंगळवार चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अश्र्विनी अहोरात्र. 17 बुधवार चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अश्र्विनी 07:30 पर्यंत व नंतर भरणी. 18 गुरूवारी मेष 17:20 पर्यंत व नंतर वृषभ. चंद्रनक्षत्र भरणी 10:33 पर्यंत व नंतर कृतिका. 19 शुक्रवार चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र कृतिका 13:43 व नंतर रोहिणी. 20 शनिवार चंद्ररास वृषभ 30:08 पर्यंत व नंतर मिथुन. चंद्रनक्षत्र रोहिणी 16:44 पर्यंत व नंतर मृगशीर्ष.
मेष :–या सप्ताहात जेवढ्या लाभदायक गोष्टी घडणार आहेत त्यापेक्षा कांही कमी प्रमाणात नुकसान करणार्या बाबी पण घडणार आहेत. काका व आत्या यांच्याबरोबर भेट होईल व त्यांच्यासाठी हाँस्पिटल आठी आर्थिक मदत करावी लागेल. परदेशी नोकरीची संधी गमावलेल्या ना हा सप्ताह कांहीसा आशादायक राहील. कोर्टकचेरीच्या कामकाजात तुमची बोलण्याची पद्धत बदलली तर नक्कीच तुमचे काम पुढे सरकेल. आर्थिक दिवाळखोरीत ऊन बाहेर पडण्यासाठी तुम्हाला तुमची विचारसरणी बदलावी लागेल. एकंदर हा सप्ताह मिश्र अनुभवांचा पण लाभदायक राहील.
वृषभ :–मनातील बर्याच दिवसापासून बाळगलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काय करावे याचे गुरूतुल्य व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल. नेतृत्व गुण असलेल्यांना या सप्ताहात अचानक एखादी चांगली संधी मिळेल. यातून फायदा काय याचा विचार न करता मिळालेल्या संधीचे सोने कसे करता येईल याचा विचार करा. वडील भावंडाकडून आवश्यक असणारे शैक्षणिक मार्गदर्शन मिळेल. मनातील अहंपणा कमी करून तुमची मागणी स्पष्टपणे मागितल्यास नोकरीतही तुमचा लाभ होईल. मनाला आलेली उदासिनता घालवण्यासाठी हवेशीर वातावरणात जाऊन आल्यास खूपच फरक पडेल.
मिथुन :–या सप्ताहातील प्राधान्यक्रमाने करावयाचे काम म्हणजे तुमच्या वडिलांच्या प्रकृतीची तपासणी करून घेणे. डाँक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक त्या तपासण्या करून घ्या. दत्तक पुत्राने तसेच ज्यांनी जबाबदारी स्विकारली आहे अशा मुलांनी आपल्या आईवडीलांच्या प्रकृतीच्या बाबतीत अतिशय जागरूक रहावे. व्यवसायातील मिळणार्या लाभातील सर्व हक्कदारांबरोबर तुमची बैठक वा चर्चा होणे महत्वाचे राहील. अन्यथा 14 चा रविवार भागिदारांकडून असहकाराची चिंता वाढवेल. जून्या घराचे छत किंवा उंचावरील जागेकडून पडझडीचा धोका निर्माण होईल.
कर्क :–न्यायप्रविष्ट बाबींच्या बाबतीत कोणी राजकारण करत नसल्याची खात्री करून घ्यावी लागेल. पतीपत्नीमधील घटस्फोटाबाबतच्या केसमधे इतरांचा हस्तक्षेप झाल्यास केसमधील गुंतागुंत वाढेल. तसेच पु्रमिलन झालेल्यांच्या बाबतीतही इतरांनी हस्तक्षेप करू नये. प्रथम संततीच्या आजारपणावर जास्त लक्ष केंद्रीत करावे लागेल. फौजदारी खटल्यातील कामातील प्रगती मानसिक समाधान देणारी ठरेल. ज्या घरांना तळघर आहे किंवा बेसमेंटमधील जागेतील वीजेच्या कनेक्शनबाबत एकदा तमासणी करू घ्यावी लागेल.व्यवसायाबाबतच्या ज्या परवानगीची प्रतिक्षेत असाल त्यातिल त्रुटी तातडीने पूर्ण करा.
सिंह :–राजकीय पदाधिकारी, सरकारी नोकरीतील अधीकारी, उच्चपदस्थ यांना 16, 17, व 18 रोजी आपले कामकाज करताना जागरूक रहावे लागेल. कोणतेही आर्थिक व्यवहार बिन पावतीचे करू नयेत. ज्येष्ठांनी, गुरूतुल्य व्यक्तीनी तरूण वर्गाला उद्बोधन देणार्या गोष्टी द्वारे सत्संगाची संधीचा वापर करावा. आरोग्य विभागातील सेवाभावी वर्गाला अतिशय कष्टदायक हा सप्ताह जाणार आहे. डाक्टर्स, परिचारिका यांना तर मानसिक ताण येईल. तरूण वर्ग झटपट पैसे कमवण्याच्या नादात हातातील कामावर संकट येईल तरी जागरूक व्हावे.
कन्या :–नवीन घेतलेल्या घराचे थकलेले हप्ते भरण्यासाठी आलेल्या तगाद्यावर तुंम्हाला कांहीतरी उपाय काढावा लागेल. कर्जमुक्तीसाठी पत्नीच्या माहेरील नात्याकडील मंडळींची मदत मिळेल त्यासाठी तुम्हाला त्यांना वस्तुस्थिती सांगावी लागेल. निवृत्त होणार्या कर्मचार्यांना नवीन नोकरी मिळण्याचे संकेत जबरदस्त आहेत तरी त्याकरीता प्रयत्न करावेत. महिलांना सासूबाईंच्या आवडीच्या वस्तूंची खरेदी करून गोड धक्का देता येणार आहे. संततीच्या प्रतिक्षेतील पुरूषांना डाँक्टरांच्या सल्ल्यानुसार मेडीकल टेस्ट करावी लागेल.
तूळ :–नोकरीत आलेले संकट अचानक आलेले नाही हे प्रथम समजून घ्या. या सर्व गोष्टींची कल्पना असूनही तुम्ही कांहीच हालचाल न केल्याने हे संकट आले आहे. जूना भाडेकरू सोडून गेलेल्या जागेला नवीन भाडेकरू या सप्ताहात मिळणार आहे. कर्जासाठी बँकेकडे अर्ज केला असल्यास पुढील सप्ताहात त्यावर विचार केला जाईल. तरी एकदा बँकेत जाऊन या. महिलांना कंबरदुखीचा व ओटीपोट दुखण्याचा त्रास जाणवेल . जवळच्या मित्रमैत्रिणींच्या बाबतीत हाँस्पिटलसाठी आर्थिक मदत करावी लागेल.
वृश्र्चिक :–अपत्यप्राप्तीच्या प्रतिक्षेतील जोडप्यांनी अजून कांही कालावधी वाटपाहून मगच सरोगसी किंवा दत्तक संततीचा विचार करावा. तरूणांच्या अँपेडिक्सचा त्रासावर आँपरेशन शिवाय कोणताच इलाज राहणार नाही तरी आता आँपरेशनचा विचार करावा लागेल. मनातील नकारात्मक विचार काढून टाकण्यासाठी चांगल्या सकारात्मक साहित्याचे वाचन करावे. तसेच आपले , छंद, कला , आवड यानां प्राधान्य द्यावे. ज्या वयस्कर मंडळींना धार्मिक वाचन आवडते त्यांनी इतरांनाही त्याचा लाभ करू द्यावा. प्रथम संतती असणार्यांना द्वितीय संततीचा शुभयोग आहे तरी विचार करावा.
धनु :–परगावी, परदेशी असलेल्यांना आपल्या घरी येऊन मातृसुखाचा आनंद घेता येणार आहे. ज्या वयस्कर मंडळीना झोप न येण्याचा त्रास आहे त्यांना या सप्ताहात चांगली झोप लागणार आहे. तरी दिवसभर मन आनंदी ठेवण्यासाठी तुमच्या आवडत्या छंदाला वेळ द्या. कामगार वर्गाला नोकरीतील कामाचा ताण येईल. उत्पादन क्षेत्रातील कर्मचार्यांना नवीन काँन्ट्रक्टचा विचार करावा लागणार आहे. लोखंडाशी संबंधित असलेल्यांनी आपले आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावेत.
मकर :–प्रिंट मिडीया मधे काम करणार्यांनी आपण दिलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी. 19 व 20 तारखेला कोणतेही कारण न देता नोकरीत अडचण निर्माण होईल. पाळीव प्राण्यांच्या तब्बेतीची काळजी घ्यावी लागेल. स्पर्धात्मक परीक्षेच्या विद्यार्थ्यांना विशेष कोचिंग ची सोय करावी लागेल. ब्लडप्रेशरचा त्रास असलेल्यांनी आपली औषधे वेळेवर घ्यावीत. व गरज वाटल्यास डाँक्टरांकडून तपासून घ्यावे. शिक्षक व प्राध्यापक यांना आँन लाईन काम करताना आलेल्या अडचणींवर मात करता येणार आहे.
कुंभ :–या सप्ताहात अचानक मोठ्या खर्चाची सोय करावी लागेल. पतीपत्नीच्या एकत्र व्यवसायातही कांही भांडवल गुंतवण्याचा गरज निर्माण होईल. जून्या गुंतवणूकीतून या सप्ताहात चांगला लाभ संभवतो. कुटुंबातील कर्तृत्ववान महिलेचा आदर्श पुरस्काराने गौरव केला जाईल. वनस्पती शास्त्राचा अभ्यास करणार्यांना त्यांच्या प्रयोगांना चांगले यश आल्याचे जाणवेल. प्राँ. फंड, पेंन्शनच्या कार्यालयात काम करणार्यांना अचानक कामात वाढ झाल्याचे लक्षात येईल.
मीन :–शैक्षणिक क्षेत्रातील कर्मचार्यांना नवीन काँन्ट्रक्टचा संधी मिळेल. लेखक, पत्रकार यांना वरिष्ठांच्या दडपणाखाली काम करावे लागेल. जाहिरात क्षेक्षातील काम सरकारी नियमांत अडकेल. चित्रकार, पेंटर्स, शिल्पकार यांच्या कलेला दर्दी मंडळींकडून भरभरून दाद मिळेल. वयस्कर मंडळींना अचानक एखाद्या सांध्याला किंवा गुडघ्याला दुखापत होण्याचा धोका आहे. तरी काळजीपूर्वक वागावे. राजकीय मंडळीना परिस्थितीवर मात करताना नवीन प्रश्र्न निर्माण होत असल्याचे जाणवेल.
|| शुभं-भवतु ||
Thank you Tai