daily horoscope

शनिवार 13 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शनिवार 13 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य

शनिवार 13  मार्च आज चंद्ररास कुंभ 17:56.पर्यंत व नंतर मीन. चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा 24:21 पर्यंत व नंतर उत्तराभाद्रपदा.

वरील राशी व दोन्ही  नक्षत्रांचा विचार करून करून कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

आज अमावास्या 15:50 पर्यंत नंतर प्रतिपदा सुरू. आजचा दिवस शुभ असल्याने तुम्हाला तुमच्या आवडीची व महत्वाची कामे करायला हरकत नाही.

मेष :–मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात रमताना स्वत:चे अस्तित्वच विसरून जाल. वडीलांकडील नात्यातून आनंदाची बातमी कळेल व खूष व्हाल. संध्याकाळ नंतरचा वेळ कांहीसा चिंता करणारा राहील.

 

वृषभ :–परेश्र्वराच्या कृपेने मानसिक त्रासात आजपासून थोडा फरक पडणार आहे. महिलांनी आपले हार्मोनल चेंजेससाठी डाँक्टरांचा सल्ला घ्यावा. जून्या घराच्या विक्रीचा प्रश्र्न पुन: नव्याने चर्चेत येईल.

 

मिथुन :–तुमच्याकडून आज कांही चुकीचे वागले जाणार नाही याची खात्री करून घ्या. आर्थिक गणिते चुकतील. बँकेचे व्यवहार डोळसपणाने करा. नोकरीतील वातावरण आनंदाचे व उत्साहवर्धक राहील.

 

कर्क :–दाताच्या डाँक्टर्सना पेशंटची मोठी सर्जरी करावी लागेल. वारसाहक्काने तुमच्याकडे येणार्या वास्तूविषयी फार लोभ दाखवू नका. लाचलुचपत व भ्रष्टाचार खात्यातील कर्मचार्‍यांना मोठ्या राजकीय व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी लागेल.

 

सिंह :–लहान मुलांच्या हातातील टोकदार वस्तूकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल. दुखापत होण्याचा धोका आहे. वयस्कर मंडळींना त्याच्या अनुभवाचे बोल समाजासमोर मांडता येणार आहेत. वकील मंडळीनी स्पष्टपणा च्या नावाखाली फटकळपणे बोलू नये.

 

कन्या :–बैठे काम करणार्‍या स्त्रीपुरूषांना पचनसंस्थेविषयी कांही त्रास सुरू होईल. पित्ताचा त्रास होणार्‍याना विशेष तपासणीला सामोरे जावे लागेल. मनातील भितीदायक जबलेल्या शंकाकुशंकाना बाहेर काढून त्यावरील योग्य ती माहिती घ्या.

 

तूळ :–आईच्या आजाराचे स्वरूप कळण्यासाठी डाँक्टरांनी सांगितलेल्या तपासण्या करण्यास जास्त वेळ लावू नका. महिलांना ओटीपोट दुखण्याचा त्रास वाढेल. वडीलांच्या  बँकेतील बचतीवर मुलांच्या डिमाडस् अवलंबून राहतील.

 

वृश्र्चिक :–ताटातूट झालेल्या मित्रमैत्रिणींची पुनर्भेट होण्याचा कालावधी आहे. नोकरीतील ताणतणावावर मैत्रीतील प्रेमालापाने मात होईल. लहान सहान कारणावरून वयस्कर  मंडळींची चिडचीड वाढेल.

 

धनु :–घरातील बागेत काम करण्याची इच्छा निर्माण होईल  व वेळात वेळ काढून कराल पण. तुम्ही नोकरी करत असलेल्या ठिकाणाबाबत कांही अफवा कानावर येथील तरी त्यावर विश्र्वास ठेवू नका. विद्यार्थ्यांना परिक्षेची प्रचंड भिती निर्माण होईल.

 

मकर :–मुलीच्या लग्नाबाबतच्या चर्चेतून उगीचच सोने खरेदी कराल. पतीपत्नीच्या एकत्र काढलेल्या कर्जाबाबत परतफेडीसाठीचे विचार पक्के होतील. लहान मुलांच्या प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी चे उपाय करावे लागतील.

 

कुंभ :–घरातील वायरींग एकदा तपासून घ्या. वीजेचा शाँक बसण्याचा धोका आहे. तपासणी अधिकार्‍यांनी कोणत्याही प्रकारच्या वशिलेबाजीला थारा देऊ नये प्रकरण तुमच्यावरच उठण्याची भिती राहील.

 

मीन :–गेल्या 5,6   महिन्यापासून झालेल्या व्यवसायातील नुकसानीवर अचानक त्यातून सोडवणारा मार्ग सापडेल. नवीन घराचे पझेशन मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. हाँस्पिटलमधील परिचारिकांना मनाला आनंद व समाधान देणार्‍या घटना घडतील.

| शुभं-भवतु ||

 

One thought on “शनिवार 13 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *