Read in
शुक्रवार 12 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 12 मार्च आज चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र शततारका 22:50 पर्यंत व नंतर पूर्वा भाद्रपदा.
वरील राशी व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून करून कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आजचा दिवस अशुभ असल्याने कोणतीही महत्वाची कामे करू नयेत.
आज बुध कुंभ राशीमधे दुपारी 12:35 ला प्रवेश करत आहे.
आज महाशिवरात्री असून निशीथकाल 24:24 पासून 25:15 पर्यंत आहे.
मेष :–आज सरकारी क्षेत्रातील लाभदायक योजनांची माहिती घ्या. दुसर्याच्या मध्यस्थीने नवीन व्यवसायाला सुरवात करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना परिक्षेच्या दृष्टीने अभ्यासात वाढ न केल्यास यश अवघड असेल याची दक्षता घ्या.
वृषभ :– आजच्या सकाळच्या योजनेनुसार दिवसभराचे नियोजन करावे लागेल. घरगुती वस्तूंच्या व्यवसायातील महिलांना नवीन क्लायंट मिळवण्यासाठी कांही युक्त्या कराव्या लागतील. तरूणांना हातातील कामाव्यतिरिक्त नवीन काम करण्याची संधी मिळेल.
मिथुन :– युरिन इन्फेक्शनपासून सावध रहावे लागेल. किडनीचा त्रास असलेल्यांनी दुर्लक्ष करू नये. 10 वर्षाच्या आतील मुलींच्या बाबतीत लघवीच्या तक्रारीबाबत जास्तच जागरूक रहावे लागेल. नोकरीत नवीन प्रोजेक्टमधील कामावर लक्ष केंद्रीत करावे लागेल.
कर्क :–आज तुमचा आर्थिक नुकसानीचा दिवस आहे. नवीन खरेदी करणे किंवा नव्याने गुंतवणूक करण्याचा विचारही करू नका. कुटुंबात पतीपत्नीचे एकमेकाशी चांगले हितगुज राहील. आरोग्याच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागल्याने होणार्या त्रासाचा आता पश्चाताप करावा लागेल.
सिंह :–आजाराचे स्वरूप न पाहता भितीनेच मानसिक खच्ची व्हाल. ताबडतोप डाँक्टरांचा सल्ला घ्या. अग्नी पासून हाताला भाजण्याचा कींवा चटके बसण्याचा धोका आहे. तसेच लहान मुलांनाही सांभाळावे लागेल.
कन्या :–महिलांना नटून थटून एखाद्या कार्यक्रमाला जाण्याची संधी मिळेल. लेखक व कवीना समारंभात आपल्या कथा व कवितांचे वाचन करता येईल. नोकरीतील कामाचा आवाका आवरणार नाही तर स्वत:च्या कामाबरोबरच दुसर्यांचे कामही करावे लागेल.
तूळ :–स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्यांना आज अचानक गुरूतुल्य व्यक्तीची भेट घडेल व मार्गदर्शनाची सोय होईल. प्रौढ महिलांना त्यांचे छंदासाठी पुन: वेळ देता येणार आहे. कुटुंबातील कुरूबुरीकडे लक्ष दिल्यास नंतरचा बराच त्रास वाचेल.
वृश्र्चिक :–घरातील अंतर्गत रचनेत बदल करण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी आपल्याला सर्व येते ही भावना सोडून मार्गदर्शन घ्यावे. अधिकारी वर्गाबरोबर कामातील क्लीष्ट प्रश्नावर चर्चा करता येईल व त्यातून मार्ग निघेल.
धनु :–ज्येष्ठमंडळींच्या सहवासाने मनातील मोठ्या जाचक प्रश्र्नांवर उत्तर सापडेल. निवृत्तीच्या टप्प्यात असलेल्यांना नवीन कामाची क्षेत्रांची माहिती मिळेल. पुस्तक वाचनाची आवड असणार्यांना त्यावरील चर्चेत सहभागी होउन आपले विचार व्यक्त करण्याची संधी मिळेल.
मकर :–बँकेतील नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना आपल्या अभ्यासाची दिशा बदलावी लागणार आहे तसेच वेगळे मार्गदर्शन घ्यावे. पोलीस खात्यातील कर्मचार्यांना अचानक मानसिक धक्का बसणार्या गोष्टी घडतील.
कुंभ :–वयस्कर मंडळी आपल्या जुन्या विचारावर अडकून राहिल्याने घरात वाद निर्माण होईल. लहान वयातील मुलांनी मोबाईलचा अतिरेक टाळावा, अन्यथा मानसिक ताण वाढेल. प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांनी कोणतेही अती धाडस करू नये.
मीन :–लहान मुले मध्यरात्री अचानक उठून रडू लागतील. ज्यांचा फौजदारी खटला सुरू असेल त्यांनी वकील बदलण्याची गडबड करू नये. आज आर्थिक हानी करणार्या गोष्टी घडू देऊ नका. व्यवसायातील तातडीच्या कामाना प्राधान्य द्यावे लागेल.
| शुभं-भवतु ||