Read in
गुरूवार 11 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 11 मार्च आज चंद्ररास मकर सकाळी 09:20 पर्यंत व नंतर कुंभ.
चंद्रनक्षत्र धनिष्ठा 21:44 व नंतर शततारका. आजचा दिवस अशुभ असल्याने कोणतीही महत्वाची कामे करू नयेत.
आज बुध कुंभ राशीमधे दुपारी 12:35 ला प्रवेश करत आहे.
आज महाशिवरात्री असून निशीथकाल 24:24 पासून 25:15 पर्यंत आहे.
मेष :–आज तुमच्या हातात जे काम आहे तेच तुमच्या भाग्योदयाला मदत करणार आहे. तरी त्याबाबतीत अत्यंत जागरूक रहा. किर्तन, प्रवचन करणार्यांना समाजोपयोगी विषयावर बोद्धीक देता येणार आहे. श्री शंकराची उपासना करणार्यांना आजचा दिवस विशेष लाभदायक राहील.
वृषभ :–अध्यात्मिक उपासकांना कोणत्याही देवळात न जाता श्री शंकराचे मनोमन दर्शन घडेल. पूर्वपुण्याईनेच आई वडीलांच्या सेवेचे फळ मिळाल्याचे जाणवेल. महत्वाच्या कामासाठी तुमच्याकडून गरजूंना सल्ला द्यावा लागेल. परमेश्वराची सेवा समजून कार्य करावे.
मिथुन :–इंजिनियरींगच्या क्षेत्रातील मंडळीना कामाचा ताण सहन होणार नाही. कोणत्याही प्रकारची लाँटरी किंवा कोणत्याही शेअर्समध्ये आज पैसे गुंतवू नका. कुटुंबात आईवडीलांच्या रोषास सहन करावे लागे. आज तुमचा आनंदाचा व उत्साहाचा दिवस असल्याने रेंगाळलेल्या कामाना हाती घ्या.
कर्क :–ज्या धनाची चोरी होऊ नये म्हणून एवढा आटापीटा केला तेच धन वारसा हक्क, वाटण्या या विषयाने त्रासदायक ठरेल. ट्रेडिंग करणार्यांना तज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत. ज्येष्ठांनी आपले मत स्पष्टपणे व्यक्त करावे.
सिंह :–आजाराचे स्वरूप न पाहता भितीनेच मानसिक खच्ची व्हाल. ताबडतोप डाँक्टरांचा सल्ला घ्या. अग्नी पासून हाताला भाजण्याचा कींवा चटके बसण्याचा धोका आहे. तसेच लहान मुलांनाही सांभाळावे लागेल.
कन्या :–आज तुम्हाला तुमच्या बुद्धीचे तेज वाढल्याचे जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी अवघडातील अवघड कामही तुमच्या बुद्धी कौशल्यावर कराल याची वरीष्ठ खात्री व्यक्त करतील. कुटुंबात वादग्रस्त विषय अतिशय कौशल्याने हाताळाल.
तूळ :–बर्याच दिवसापासून थांबलेला वाहन खरेदीचा विषय पुन: चर्चेला येईल. निर्णयात पत्नीचा विचाराला महत्व द्यावे लागेल. मुलांच्या परदेशी जाउ इच्छिणार्याच्या पुढील वर्षासाठीच्या शिक्षणासाठी च्या प्रवेशाबाबत एकतर्फी निर्णय घेऊ नका, तज्ञांचा सल्ला घ्या.
वृश्र्चिक :–घरातील अंतर्गत रचनेत बदल करण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी आपल्याला सर्व येते ही भावना सोडून मार्गदर्शन घ्यावे. अधिकारी वर्गाबरोबर कामातील क्लीष्ट प्रश्नावर चर्चा करता येईल व त्यातून मार्ग निघेल.
धनु :–पूर्वी हातउसने घेतलेली मोठी रक्कम आज न मागताही मिळणार आहे. डोळ्याच्या आँपरेशनची घाई नसल्यास थांबणे हिताचे राहील. ज्येष्ठांना आरोग्याच्या तक्रारी मानसिक त्रासाला कारणीभूत होतील. विद्यार्थ्यांना परिक्षेच्या काळजीने मानसिक ताण येईल.
मकर :–तुंम्हाला सतत टोमणे मारणाऱ्या, चूका दाखवून कमीजास्त बोलणार्याना खडे बोल सुनवण्याची इच्छा होईल. पण विचारांवर नियंत्रण घाला. आज ताप खोकला येण्याची शक्यता आहे. पण हा ताप वाढणार्या दुखण्याचा नाही आहे हे लक्षांत घ्या
कुंभ :–पूर्वी कधीतरी घेतलेल्या शेअर्समधून नुकसान होणार आहे. तरी मानसिक ताण येऊ देऊ नका. व्यवसायातील प्रलंबित येणी तुमच्या अंदाजानुसार येथील. मुलांकडून हरवलेल्या वस्तू बाबत काहीबाही टुकार कारण सांगतील तरी सखोल चौकशी करावी लागेल.
मीन :–तरूणांना ड्रायव्हींग चे लायसन सध्यातरी सहजासहजी मिळणार नाही. तुम्ही लिहीलेल्या पुस्तकाचे प्रकाशन येत्या ४ च दिवसात ठरणार आहे. वयस्कर महिलांना अपचनाचा व पित्ताचा त्रास जाणवेल. प्रथम संततीच्या अभ्यासातील प्रगतीबाबत अभिमान वाटेल.व कौतुक कराल.
| शुभं-भवतु ||
Thank you Tai