Read in
बुधवार 10 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 10 मार्च चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र श्रवण 21:02 पर्यंत व नंतर धनिष्ठा.
वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–परगावी असलेल्यांना आज पितृसुखाचा आनंद मिळेल. राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांना वृद्धाश्रमाच्या मोठ्या मिशनमधे सामावून घेतले जाईल. तरूणांना आज झोप न लागण्याचा त्रास होईल. मावशीकडील आनंदाच्या बातमीने आईच्या जून्या आठवणी जाग्या होतील.
वृषभ :–तुमची तब्बेत ठणठणीत असूनही कोविड 19 च्या भितीने ऊगीचच काळजी करत बसाल. पूर्वी कर्जाऊ दिलेले पैसे परत मिळण्याचा निरोप येईल. उच्चशिक्षणासाठी जाणार्यंचा बेत अजूनही पुढे ढकलला जाईल घाई करू नका.
मिथुन :–इंजिनियरींगच्या क्षेत्रातील मंडळीना कामाचा ताण सहन होणार नाही. कोणत्याही प्रकारची लाँटरी किंवा कोणत्याही शेअर्समध्ये आज पैसे गुंतवू नका. कुटुंबात आईवडीलांच्या रोषास सहन करावे लागे. आज तुमचा आनंदाचा व उत्साहाचा दिवस असल्याने रेंगाळलेल्या कामाना हाती घ्या.
कर्क :–दत्तक मुलांकडून आईवडीलांना वेगळीच प्रतिष्ठा मिळेल. कुटुंबात आनंदोत्सव निर्माण होईल. महत्वाची हरवलेल्या कागदपत्रांची तक्रार पोलीस स्टेशनला द्यावी लागेल. औषधांच्या दुकानात काम करणार्या फार्मासिस्टनी प्रिस्क्रीप्शन काळजीपूर्वक वाचून औष धे द्यावीत.
सिंह :–शिक्षक, प्राध्यापक यांचा आपल्या मेहनतीवर चा विश्र्वास सार्थ ठरेल. नोकरीत तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. आज दुपारनंतर चा दिवस अतिशय धावपळीत जाणार आहे. नवीन ओळखीतून मैत्रीचे गोड संकेत मिळतील.
कन्या :–अध्यात्मिक उपासकांना उपासनेची योग्य दिशा सापडेल. मंत्रशास्त्राच्या अभ्यासकांना शास्त्रशुद्ध पद्धतीने मंत्रांबाबतची माहिती मिळेल. बँकेतील रखडलेल्या कामासाठी वेगळी टीम करावी लागणार आहे. लोखंडाशी संबंधित असलेल्यांनी आपले व्यवहार आज अजिबात करू नये.
तूळ :–सकाळच्या वेळेतच तुम्हाला अत्यानंद देणारी बातमी कळेल. भावाला बर्याच वर्षानंतर पुत्रसुखाचा लाभ होईल. प्रवासाची तारीख जवळ येत चालली आहे तरी अजूनी तुम्हाला बेत बदलता येतील याचा विचार करा. भावनेच्या आहारी जाऊ नका.
वृश्र्चिक :–कोणतेही कामे ताबडतोप या शब्दाप्रमाणे करू नका. तुमच्याकडून नोकरीतील महत्त्वाची भूमिका बजावली असून त्याचे क्रेडीट ही मिळेल. महिलांना प्रकृतीचा त्रास संभवतो पोटदुखीचा त्रास वाढेल तरी डाँक्टरांचा सल्ला घ्यावा.
धनु :–तरूणांना अचानक घसा दुखण्याचा त्रास होईल. सध्या कोविड 19 ची भिती असल्यामुळे सर्वानाच काळजी घेण्याची गरज भासेल. स्त्रीयांना मेकअपचा चेहर्याला रँश येण्याचा धोका आहे. वयस्कर मंडळीनी जीना चढणे उतरणे हळुवार करावे.
मकर :–पती पत्नीच्या व्यवसायात अचानक बदल करावा लागणार आहे तरी काय व कसा बदल करावा याचे नियोजन आवश्यक आहे. रेल्वेने प्रवास करणार्यांनी स्वत:ची विशेष काळजी घ्यावी. मित्राच्या आईच्या किडनीचा त्रास वाढल्याने तुम्हाला तेथे जावे लागेल.
कुंभ :–कुटुंबात महत्वाच्या घटनांवर एकत्रित बसून चर्चा होईल. मंत्रशास्त्र व गूढविद्ध्येच्या अभ्यासकांनी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपला अभ्यास सुरू ठेवावा. दवाखान्यात अँडमिट असलेल्यांना आज संध्याकाळनंतर आराम पडू लागेल.
मीन :–तरूणांना ड्रायव्हींग चे लायसन सध्यातरी सहजासहजी मिळणार नाही. तुम्ही लिहीलेल्या पुस्तकाचे प्रकाशन येत्या ४ च दिवसात ठरणार आहे. वयस्कर महिलांना अपचनाचा व पित्ताचा त्रास जाणवेल. प्रथम संततीच्या अभ्यासातील प्रगतीबाबत अभिमान वाटेल.व कौतुक कराल.
| शुभं-भवतु ||
Thank you Tai