daily horoscope

मंगळवार 09 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

मंगळवार 09  मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य

मंगळवार 09  मार्च आज चंद्ररास कर दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तराषाढा 20:40  पर्यंत.व नंतर श्रवण. आजचा दिवस शुभ असल्याने महत्वाची कामे करण्यास हरकत नाही.

daily horoscope

वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–तुम्हाला आज अचानक विशेष कामाची तुमची प्रतिष्ठा वाढवणारी संधी चालून येईल. तरी नवीन कामाला नाही म्हणू नका. वेबिनारच्या माध्यामातून सामाजिक विषय अतिशय पद्धतशीरपणे हाताळाल व समाजाचा सहभागही मोठा असेल.

 

वृषभ :–आजच्या सकाळच्या अनुभवावरून तुम्हाला रागावर  नियंत्रण करण्याचे महत्व पटेल. हातातील प्रोजेक्ट मधील प्रगतीमुळे तुम्हाला एक नवीन ओळख मिळेल. कुटुंबातील वातावरण धार्मिक पूजेमूळे प्रसन्न होईल.

 

मिथुन :–तुमच्या प्रेमळ व उदार स्वभावाचा इतर लोक फायदा घेतील. खाजगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांनी अनवधानानेही कोणत्याही नियमाचे उल्लंघन होऊ देऊ नका. रखडलेल्या कामाला महत्व ओळखून कामाला सुरूवात करा.

 

कर्क :–राजकीय क्षेत्रातील मंडळीना त्यांच्या बुद्धीचातुर्याने विरोधकांचे तोंड बंद करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवावे व योग्य अयोग्य ओळखून वागावे. वडिलांकडून उसने घेतलेली रक्कम तुम्ही आज परत करणार आहात.

 

सिंह :–तुम्हाला कामाचे नियोजन करावे लागेल. सुटीत गावी जाण्याचा बेत रद्ध करावा लागेल. तरी उगीच उड्या मारू नका. अपत्यप्राप्तीच्या इच्छूकांना आपली इच्छा पूर्ण करण्याचे मार्ग सापडतील तरी त्याचा विचार करावा लागेल.

 

कन्या :–मानसिक ताण कमी करण्यासाठी तुमचा निछ्चयच महत्वाचा राहील. मनातील ईच्छा पूर्ण करण्यासाठी अतिरेकी प्रयत्न करू नका. तुमच्या कामातील जिद्द तुम्हाला यशस्वी करेल. औषधांच्या शेअर्स मधून लाभ होईल.

 

तूळ :–अंगावर नव्याने आलेली जबाबदारी सहकार्‍यांच्या मदतीने मार्गी लावाल. अचानक न झेपणारे कोणतेही धाडस करू नका. मधुमेहीनी दैनंदिन व्यायाम व आहारावर लक्ष दिल्यास मधुमेह नियंत्रणात येईल. रक्ताच्या नातेसंबंधात तणाव निर्माण होईल.

 

वृश्र्चिक :–व्यवसायातील ताणतणावावर मात करण्यासाठी योग्य नियोजनाची गरज भासेल. प्रवास व धावपळीमुळे प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. कौटुंबिक प्रश्नाना प्राधान्य द्यावे लागेल. घरातील पुरूष मंडळीना आज पूर्ण आराम मिळेल.

 

धनु :–ज्येष्ठमंडळीनी, विषयतज्ञ मंडळीनी विद्यार्थ्यांना अवघड वाटणार्‍या विषयासाठी अध्यापन व मार्गदर्शन करावे लागेल. सामाजिक विषयावर चर्चा करताना विचारात पारदर्शकता ठेवावी लागेल. विद्यार्थ्यांनी आपले प्रयत्न योग्य दिशेने वाढवावेत.

 

मकर :–कोणत्याही कागदपत्रावर सही करताना प्रथम ते वाचून पहावे.  अवघड वाटलेले काम वेगळ्या पद्धतीने करून बघितल्यास कोडे सुटेल. कोणत्याही प्रसंगात टोकाची भूमिका घेऊ नका. परदेशी असलेल्या मुलांबरोबर बोलण्याने मनाला समाधान वाटेल.

 

कुंभ :–कुटुंबात अचानक येणार्‍या संकटावर मात करताना नवीन प्रश्र्न निर्माण होतील. प्रश्र्न अतिशय काळजीपूर्वक हाताळला. आज प्रथम संततीकडून तुम्हाला आनंद देणार्‍या गोष्टी घडतील. वडीलांकडील नात्यातील ज्येष्ठांच्या आनंदासाठी मोठा खर्च करावा लागेल.

 

मीन :–लहान मुलांना आज पडण्या लागण्यापासून सांभाळावे लागेल. विद्यार्थ्यांनी यशासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी. प्रत्येक गोष्टीचा अनुभव येईपर्यंत कोणतीही गोष्ट ताणू नका. वैचारिक वाद व मतभेद टोकाला नेऊ नका.

| शुभं-भवतु ||

 

One thought on “मंगळवार 09 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *