Read in
सोमवार 08 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 08 मार्च चंद्ररास धनु 26:38 पर्यंत नंतर मकर.
चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा 20: 39 पर्यंत व नंतर उत्तराषाढा. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आजचा दिवस दुपारी 03:44 नंतर चांगला आहे.
आज आंतरराष्ट्रीय महिलादिन आहे . समस्त महिलांना महिलादिनाच्या शुभेच्छा.
मेष :–नोकरीत लवकरच तुमची उन्नत्ती होणार असल्याचे संकेत मिळतील. श्रमाचे, कष्टाचे फळ काय असते याची जाणीव विद्यार्थ्यांना येईल. आज कोणत्या गोष्टीना जास्त महत्व द्यायचे असते याचा धडा मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम कराल.
वृषभ :–आजूबाजूच्या नकारात्मक गोष्टींकडे जराही लक्ष देऊ नका. घरातील वयस्कर मंडळींच्या प्रकृतीची आज जास्त काळजी करावी लागेल. लहान मुलांच्या अभ्यासातील लहान लहान गोष्टीतील उदाहरणे मनावर परिणाम करतील.
मिथुन :–अकाउंट्स विभाग सांभाळणार्यांना जी चूक सापडत नव्हती ती अचानक सापडेल. यात तुमच्या कामाची पद्धत महत्वाची ठरेल. गायक मंडळीना मैफिलीत गाणे सादर करता येणार आहे. तरूणांना संकल्पसिद्धीचा अनुभव येईल.
कर्क :–आज तुम्हाला व्यापारात जो फायदा होणार आहे त्याची तुम्ही कधीच कल्पना केली नव्हती असा असेल. सामाजिक क्षेत्रात काम करणार्यांना सहकार्यांकडून अतिशय मोलाचे सहकार्य मिळेल. मित्रांची आर्थिक अडचण दूर करावी लागेल.
सिंह :–आईचे व मुलीचे आज ट्युनिंग चांगले जमेल. मुलीला आज मनातले सर्व बोलावेसे वाटेल. फँशन डिझायनिंगच्या क्षेत्रातील मंडळीना अचानक मोठी आँर्डर मिळेल. महिलांना उपासनेचे महत्व कळेल.
कन्या :–सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना खूप मोठी जबाबदारी अंगावर घ्यावी लागेल. कुटुंबियांबरोबर आजचा दिवस आनंदात जाणार आहे. नोकरीत हातातील प्रोजेक्टमधे निर्माण झालेल्या व होणार्या अडचणींवर मात कराल.
तूळ :–कामातील गुंतागुंत दूर करताना नवीनच अडचण निर्माण होईल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या मनातील विचार ओळखून त्यांची इच्छा पूर्ण कराल. पतीपत्नीच्या व्यवसायात अचानक लागणारी गुंतवणूक पत्नीच्या भावाकडून पूर्ण होईल.
वृश्र्चिक :–बर्याच दिवसानंतर आई व मुलाची भेट होईल. लहान भावंडांबरोबर पूर्वी झालेला वायदा पूर्ण करण्याचे मार्ग सापडतील व त्याचा तुम्हाला मनापासून आनंद होईल. बहिणीची तब्बेत नरम गरम राहिल्याने तातडीने तिच्या घरी जावे लागेल.
धनु :–आईच्या तब्बेतीची काळजी घ्यावी लागेल. वयोवृद्धांना प्रसंगी दवाखान्यात अँडमिट करावे लागेल. मित्राच्या कुटुंबासाठी अर्ध्या रात्रीही मदतीसाठी तातडीने जावे लागेल. वीकएंडला एकत्र भेटून वाढदिवस साजरा करण्याचे ठरेल.
मकर :–आज मनापासून आनंद होणे म्हणजे काय याचा अनुभव घ्याल. वाहन खरेदी करण्याची इच्छा असलेल्यांना धीर धरवणार नाही. तुमच्या वागण्यातून कोणाचे मन दुखावणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना परिक्षेची काळजी वाढेल.
कुंभ :–बर्याच दिवसापासून. रखडलेल्या कामाला अचानक सुरूवात कराल. नवीन नोकरीत अँडजस्ट होताना तु ्हाला जड जात असल्याचा अनुभव येईल. मानसिक ताण वाढेल. लहान मुलांच्या लिला पाहताना मन हरखून जाईल.
मीन :–अध्यात्मिक क्षेत्रातील प्रगती गुरूजनांकडून वाखाणली जाईल. योगासनांचा सराव व प्राणायाम करणार्यांची आंतरिक उर्जा वाढल्याचे जाणवेल.. नवीन नोकरीच्या ठिकाणी मनातील भिती काढून टाकावी लागेल. आज कामाचा व्याप वाढणार आहे.A
| शुभं-भवतु ||