Read in
रविवार 07 मार्च 2021 ते शनिवार 13 मार्च 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य
07 रविवार चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मूळ 20:58 पर्यंत व नंतर पूर्वाषाढा.
08 सोमवार चंद्ररास धनु 26:38 पर्यंत व नंतर मकर. चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा 20:39 पर्यंत व नंतर उत्तराषाढा. 09 मंगळवार चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तराषाढा 20:40 पर्यंत व नंतर श्रवण. 10 बुधवार चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्रनक्षत्र श्रवण 21:02 पर्यंत व नंतर धनिष्ठा. 11 गुरूवार चंद्ररास मकर 09:20 पर्यंत व नंतर कुंभ. चंद्रनक्षत्र धनिष्ठा 21:44 पर्यंत व नंतर शततारका. 12 शुक्रवार चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र शततारका 22:50 पर्यंत व नंतर पूर्वा भाद्रपदा. 13 शनिवार चंद्ररास कुंभ 17:56 पर्यंत व नंतर मीन. चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा 24:21 पर्यंत व नंतर उत्तराभाद्रपदा.
07 रविवार श्री दासनवमी. 10 बुधवार प्रदोषाचा उपवास. 11 गुरूवार महाशिवरात्री. 13 शनिवार अमावास्या.
मेष :- वडीलांच्या वाढदिवसासाठी आँफीसमधील मंडळी घरी येतील व लहानशा समारंभ उत्तम प्रकारे पार पाडाल. राजकीय मंडळीनी आपल्या विरोधातील लोकांचे राजकारण ओळखावे व त्यानुसार आपल्या कामाची पद्धत ठरवावी. न्यायालयीन कामातील त्रूटी पूर्ण करण्याने तुमचे काम बोर्डावर येणार आहे.महिलाना कुटुंबातील सासुबाई व सासरेबुवांकडून शुभाशिर्वाद मिळतील. लहान मुलांच्या रात्रीच्या दचकण्यावर कींवा रडण्यावर उतारा म्हणून श्री कुलस्वामीचा अंगारा लावा.
वृषभ :–निवृत्त कर्मचार्यांना प्राँव्हीडंट फंडाची लेट झालेली रक्कम मिळण्याचे संकेत मिळतील. आता उगाच हेलपाटे घालू नका. भ्रष्टाचार व लाचलुचपत विरोधी खात्यातील अधिकार्यांना आपले अधिकार वापरताना फार काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना वयोवृद्ध महिलांकडून मोलाची माहिती मिळेल व अवघड वाटणार्या विषयातील अडचणी दूर होतील. व्यावसायिकांनी बाजारातील आपले मूल्य ओळखणे गरजेचे राहील. ज्येष्ठांना लागणार्या वस्तू त्यांना न मागताही मिळाल्याने त्यांना आनंद होईल.
मिथुन :–तरूण वर्गाचा विवाहाचा विचार पक्का होईल. आपल्या व आपल्या आईवडीलांच्या अपेक्षांचा ताळमेळ घालून तुमचे विचार पक्के करा. वयस्कर मंडळीना बद्धकोष्ठतेचा व मुळव्याधीचा त्रास संभवतो. सासुबाईंच्या गावाकडील जागेच्या व्यवहारात विशेष लक्ष घालावे लागेल. नोकरीत सहकारी वर्गाकडून आवश्यक ते सहकार्य वेळेवर मिळाल्यामुळे हातातील काम दिलेल्या वेळेत पूर्ण होईल. ज्योतिषी मंडळीना आपल्या क्लायंटसना विश्वासात घेऊन धोके समजावून सांगता येतील. न्यायालयातील वाद न्यायालयाच्या बाहेर सुटणार असल्याचे लक्षात येईल व त्यानुसार तुम्हाला नियोजन करायला हरकत नाही.
कर्क :–जे लोक कालपर्यंत मान देत होते तेच आज खिल्ली उडवत असल्याचे लक्षांत येईल. सामाजिक कार्यकर्त्यानी कोणतीही गोष्ट विना परवानगीची करू नये. गावातील सरकारी बागेचे कामकाज पाहून मुलांना आच्छर्य वाटेल. व्यवसायासाठी मारलेल्या ऊड्या, नाना लटपटी पाहून ज्येष्ठ मंडळी खूष होतील. लहान मुलांबरोबरखेळताना मोठ्यानी आपले डावपेच वापरू नयेत. गर्भवती महिलांना जराशा दगदगीने त्रास जाणवेल. वडिलांकडून वेळोवेळी मिळत असलेल्या सूचनांवर ऊन व्यवसायातील बांधलेले अंदाज एकदम बरोबर निघतील.
सिंह :–स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्यांनी इतरांच्या अनुभवाचा विचार करावा. व्यावसायिक क्षेत्रातील अंदाज अचूक नसले तरीही त्यावरचा अभ्यास तुम्हाला उपयोगी पडेल. तरूणांनी केलेली मेहनत, त्यांच्या प्रोजेक्टची माहिती व त्यावरील तुमचे कष्टयावरच तुमच्या प्रोजेक्टचे भवितव्य अवलंबून राहील. आजारपण, साथीचे रोग याविषयीचे तरूणांच्या मनात असलेली भिती घालवणे वयस्कर मंडळीना शक्य होणार नाही. सामाजिक पातळीवरील तुमची प्रतिष्ठा तसूभरही कमी होणार नाही.
कन्या:–नोकरीत बोलण्यापेक्षा तुमच्या कर्तृत्वाला महत्व प्राप्त होईल.आईकडील जवळच्या नात्यातील आम्ही न अंत:करापासून निघालेले शब्द तुमचा आत्मविश्वास वाढवतील. आज तुमचा आनंदाचा व उत्साहाचा दिवस आहे त्यामुळे जे काम हातात घ्याल त्यात आनंद निर्माण कराल व यश मिळवाल. कुटुंबात कोणत्याही कारणास्तव एकमेकाबरोबरील केलेला संवाद विपर्यस्त अर्थ काढेल. आर्थिक बाबतीत जागरूक रहावे लागेल.
तूळ :–नेहमीप्रमाणे तुमच्या बोलण्याचा प्रभाव इतरांवर पडेल. वारसाहक्काने तुमच्याकडे चालून येणारी जबाबदारी तुम्हाला यशाचा वेगळाच मार्ग सापडेल. राजकीय मंडळीनी गुप्तशत्रूं पासून अतिशय सावध रहावे लागेल. नोकरी व्यवसायात नवीन संधींची शक्यता वाढेल. नोकरीच्या क्षेत्रात अचानक एखादा अडथळा निर्माण होईल त्याला सहज समजू नका तर त्याचा सखोल विचार करा. विद्यार्थ्यांनी मनात बाळगलेले स्वप्न पूर्ण होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवावी.
वृश्र्चिक :–तुमच्या अंगी असलेल्या गुणांचा वापर मुद्धमहून करू नका. योग्य वेळी योग्य संधी पाहूनच ठरवा. विद्यार्थ्यांनी परिक्षेच्या यशाकरता सर्व मुलांना मार्गदर्शकांची सोय करावी. शब्द हे विचारांपेक्षा जास्त प्रभावी असल्याने ते जपून वापरावे लागतील. स्त्रीयांना आपल्या आवडत्या छंदाला वेळ देता येणार आहे. घरातील आवराआवर चे काम आज पुरूष मंडळींवर येणार आहे. पुरूष मंडळीना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल नाहीतर गैरसमजाचे वातावरण निर्माण होईल. वयस्कर मंडळीना ापल्या शालेय जीवनातील सवंगडी भेटतील व त्यांना अत्यानंद होईल.
धनु :–पोलीस खात्यातील कर्मचार्यांना अचानक मानसिक ताण येणार्या घटनाना सामोरे जावे लागेल. तसेच कायद्याला बगल देणार्या घटना तुमच्याकडून घडतील. कुटुंबात वडीलांकडील नात्यातील मंडळींचे घरी आगमन होईल. कुटुंबातील ज्येष्ठांच्या वाढदिवसानिमित्त मोठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. राजकीय क्षेत्रातील मंडळीना विरोधकांना नामोहरण करण्याची संधी मिळणार आहे. तरूणांकडून नजरचुकीने कामातील गुंतागुंत वाढेल. मित्रांच्या मदतीने वीण एंडचा मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे नियोजन कराल.
मकर :–तरूणांनी व्यसन, प्रलोभन यांपासून दूर रहावे. शेजारील मंडळीना तुमच्या मदतीची गरज निर्माण होणार आहे. व्यावसायिकांना बँकेच्या ओव्हरड्राफ्टची गरज लागेल. सरकारी खात्यातील कर्मचार्यांना अचानक कामाच्या स्वरूपात बदल करावा लागणार आहे. न्यायालयीन कामातील विलंब तुमच्या नुकसानी जबाबदार असेल. त्वरीत त्यावरील उपाय शोधावा लागेल. नोकरी निमित्ताने लहानशा प्रवास करावा लागेल. विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करणार्यांनी आपल्याला सर्व येते या भ्रमात न राहता तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे.
कुंभ :–महिलांना मनाला बोचणी लागणार्या घटना घडतील. वयस्कर मंडळीना तब्बेतीकडे केलेल्या दुर्लक्षामुळे आता ास सोसावा लागेल. हार्ट पेशंट्सनी विशेष काळजी घ्यावी. किडनीचा त्रास असलेल्यांनी डाँक्टरांचा सल्ला घ्यावा बेफिकीरीने वागू नये. कुटुंबातील प्रत्येकाच्या मताचा तुम्हाला आदर करावा लागणार आहे. नोकरीच्या ठीकाणी कामात संथपणा येऊ देऊ नका. घरातील वयस्कर मंडळीना तुमचा प्रेमळ सहवास दिल्यास त्यांना खूप आनंद होईल.
मीन :–तरूणांना आपले स्वत:चे छंद बाजूला ठेवून मुलांसाठी व पत्नीसाठी वेळ द्यावा लागेल. लहानसहान गोष्टींवरूनपतीपत्नीमधे गैरसमजाचे वारे निर्माण होतील. पूर्वी ठरलेले प्रवासाचे बेत पुढे ढकलावे लागतील. विद्यार्थ्यांना आजपर्यंत न आवडणार्या गोष्टींमधे रस निर्माण होईल. कौटुंबिक प्रश्र्नावरील चर्चा करताना जरा आजूबाजूचे भान ठेवावे. गुंतवणूक करताना परताव्याचा विचार न करता पैसे सुरक्षित रहात असल्याचा आनंद घ्यावा लागेल. प्रेमसंबंधात एकमेकांना पव्यवस्थित ओळखत नसाल तर विवाहाची घाई करू नका.
|| शुभं-भवतु ||
Thank you Tai