Read in
शनिवार 06 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 06 मार्च चंद्ररास वृश्र्चिक 21:37 पर्यंत व नंतर धनु.
चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 21:37 पर्यंत व नंतर मूळ. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आजचा दिवस अशुभ असल्याने कोणतीही महत्वाची कामे करू नयेत.
मेष :–नोकरीच्या ठिकाणी महत्वाच्या पदावर असलेल्यांनी कायदेशीर कामांची चर्चा कोणाबरोबरही करू नये. राजकीय क्षेत्रातील मंडळीना अचानक मानहानीला सामोरे जावे लागेल. महिलांनी मनातील गोष्टी इतरांना ओपन करू नयेत.
वृषभ :–व्यवसायातील चर्चा करताना भागिदाराकडून कांहीतरी लपवले जात असल्याचा संशय येईल. सामाजिक कार्यातील तुम्ही घेतलेली जबाबदारी दिलेल्या वेळेत पार पाडल्याबद्दल कौतुक होईल. तरूणांकडून अवघड कामास सुरूवात केली जाईल.
मिथुन :–आज सकाळपासूनच महिलांना एक वेगळ्याच प्रकारची हुरहुर जाणवेल. माहेरील नात्याकडील चौकशी करावी.धार्मिक व अध्यात्मिक गोष्टीवर वयस्कर मंडळी बरोबरची चर्चा महत्वाची ठरेल. वकीलांना आज कामाचा तिटकारा येईल.
कर्क :–पाठ, पाठीचा कणा दुखण्याचा त्रास असलेल्यांनी दुर्लक्ष करू नये. प्रथम संततीकडून मनाला सुख समाधान देणारी घटना कळेल. गर्भवती महिलांनी संसर्गजन्य रोगापासून सावध रहावे. शालेय अभ्यासक्रमावर जाहीर बोलण्याचा प्रसंग येईल.
सिंह :–आज कुटुंबातील प्रत्येकाच्या आहाराकडे लक्ष द्यावे लागेल. कोणताही शिळा किंवा फ्रीजमधले ठेवलेला पदार्थ खाऊ नका. बागकाम करणार्यांच्या हाताला चांगले यश आल्याने मालकांकडून चांगली बिदागी मिळेल. नोकर वर्गास विशेष लाभ संभवतो.
कन्या :–जूळ्या मुलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. वयोवृद्ध पुरूषांच्या सेवेसाठी केअरटेकरची सोय करावी लागेल. सरकारी नोकरीच्या क्षेत्रात कोणतीही गोष्ट मनाने करू नका. आज प्रवासात अतिशय दगदग होईल. प्रकृती अस्वास्थासाठी आवश्यक वाटल्यास डाँक्टरांकडे जावे.
तूळ :–बहिणीच्या विवाहाबाबतची निर्णय प्रक्रियाफक्त तुमच्यावरच अवलंबून आहे तरी पूर्ण विचाराने निर्णय घ्यावा. पुरोहित, ज्योतिषी यांनी समोरच्याच्या कुंडलीत जे दिसतेय ते स्पष्ट सांगण्याची गरज आहे. आज तुम्हाला सगळ्या जगाविषयी प्रेम दाटून येईल.
वृश्र्चिक :–भाड्याच्या घराबाबतचे बर्याच दिवसापासून लटकलेला निर्णय आज घ्यावा लागेल. अचानक आर्थिक व्यवहार करू नका. कौटुंबिक खरेदी करताना व्यावहारिक विचा करावा, भावनिकझाल्यास दामदुप्पट खर्च वाढेल.
धनु :–मायलेकीं हितगुजात न्हाऊन निघतील. मधुमेहीनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे व आज शुगर चेक करणे महत्वाचे ठरेल. बोलण्यातील स्पष्टपणामुळे आज नोकरीच्या ठिकाणी गैरसमज निर्माण होण्याचे प्रसंग उद्भवतील.
मकर :– गरम पाण्यापासून लहान मुलांना सांभाळा. लग्नाच्या मुलींना अपेक्षेप्रमाणे स्थळे न आल्याने मुली नाराज होतील तरी घरच्यांनी त्यावर बौद्धीक देऊ नये. व्यवसायातील तुमचे अंदाज तंतोतंत बरोबर येथील.
कुंभ :–पुढील वर्षाच्या शिक्षणाबाबतची चर्चा वेग घेईल. तुमच्या इच्छा नियमात बसतात का पहा व मगच त्यांचा विचार करावा. तरूणांचा पोट बिघडण्याचा त्रास संभवतो तरी आज खाण्यावर कंट्रोल ठेवावा. जेष्ठांनी आपले पथ्य मोडू नये.
मीन :–फार पूर्वी घडलेल्या घटनेचे पडसाद आजपासून ३ दिवसात घडणार आहेत तरी काळजी घ्यावी लागेल. वयोवृद्ध महिलांना रस्ता क्राँस करताना हाताला घट्ट पकडून ठेवा. राजकीय क्षेत्रातील मंडळीना विरोधी नेत्याकडून मानहानीचे धक्का बसेल.
| शुभं-भवतु ||
Thank you Tai