daily horoscope

शुक्रवार 05 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शुक्रवार 05  मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य

शुक्रवार 05 मार्च चंद्ररास वृश्र्चिक अहोरात्र व चंद्र नक्षत्र अनुराधा 22:37  पर्यंत.

daily horoscope

आजचा दिवस सकाळी 07 :54 ते रात्री 10:37 पर्यंत शुभ आहे. वरील राशी व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–अचानक प्रकृतीविषयी मनात अनेक शंका येऊ लागतील. सासुरवाडीकडून तुमच्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी दूत येतील. सरकारी नोकरीतील कर्मचार्‍यांनी कोणत्याही प्रकारच्या खरेदी विक्रीबाबत च्या आर्थिक व्यवहारात पडू नये.

वृषभ :–व्यावसायिक क्षेत्रातील मंडळीना तुमच्याकडून प्रशिक्षणाची सोय केली जाईल. शेजार्यांकरीता दवाखान्याविषयी मोठी मदत करावी लागेल. कुटुंबात आजी व आजोबांबरोबर घराण्याबाबतच्या जून्या गोष्टी चवीने ऐकाल.

मिथुन :–मामाकडील नात्याची काळजी वाढवणार्‍या घटना घडतील. कुटुंबात जून्या नव्या चा वाद उकरून काढला जाईल. विद्यार्थ्यांना आँन लाईन परिक्षेची भयंकर भिती निर्माण होईल. आई वडीलांनी मुलांना समजून घेणे महत्वाचे ठरेल.

कर्क :–तरूणांना बाहेरचा ज्यूस, कोल्ड्रींक्सची रीअँक्शन येऊन त्रास होईल.  कुटुंबातील सदस्यांकडून सामाजिक कार्यात सहभाग घेतला जाईल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍यांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे पाहून समाधान वाटेल. व्यवसायासाठी केलेला प्रवास उपयोगी पडेल.

सिंह :–आई वडीलांच्या बाबतीत तुमच्याकडून अतुलनीय प्रेमाची कामगिरी होईल. लहान बहिणभावंडांच्या बिघडलेल्या नात्यात अचानक प्रेमाचे व मायेचे वातावरण निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी काय करावे व काय करू नये याबाबतीतील आपली मते पक्की करावीत.

कन्या :–लहान मुलांच्या डोळ्याला दुखापत होण्याचा धोका आहे. वयस्कर मंडळीनी उगाच धावपळ करू नये. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने कामाची जबाबदारी उचलल्यास होणारा गोंधळ कमी होईल. वडीलधार्या कडून मौल्यवान उपदेश मिळेल.

तूळ :–कोणतीही गोष्ट करताना आज सावचितपणा बाळगावा लागेल. तरूण मुलींना आपल्याच विचाराचा जोडीदार चालून येईल. जातीच्या बंधनांचा सोयीस्कर वापर करू नका. वीजेवर चालणार्‍या यंत्रापासून लहान मुलांना सांभाळावे लागेल.

वृश्र्चिक :– प्रवासाचा बेत अचानक ठरल्याने गाडीची वेळ गाठताना अतिशय गडबड होईल. लहान भावाला नवीन घर घेण्यासाठी मोठी आर्थिक मदत करावी लागेल. सरकारी बँकेतील कर्ज प्रकरण मानसिक त्रास देईल.

धनु :–विवाहीत पुरूषांना सासुरवाडीकडून मदतीसाठी बोलावले जाईल. हाँस्पिटलमधे अँडमिट असलेल्यांना आराम पडू लागेल. नवविवाहितांना एकमेकांच्या स्वभावाचा अंदाज न आल्याने फारसे ट्युनिंग जूळणार नाही. पाण्यापासून वयोवृद्धांना अपचनाचा, डिसेंट्रीचा  त्रास संभवतो.

मकर :– विद्यार्थ्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडल्यास समोरील अडचणीतून मार्ग निघेल. खाजगी शिकवणी वर्गातील शिक्षकांच्या मेहनतीला चांगले यश येईल. राजकीय क्षेत्रातील पदाधिकार्यांना अचानक नेतृत्वपदावरून हटवले जाईल.

कुंभ :–औषधाच्या कंपनीतील कामगारांना बर्‍याच दिवसापासूनचे पेडींग असलेले पैसे परत मिळतील. अध्यात्मिक क्षेत्रात लहान भावंडाची मदत मिळेल. कुटुंबात श्रीकुलदेवतेच्या नावाने पूजा करून प्रसादाचे वाटप करण्यात

मीन :– तुमच्या आवडत्या वस्तूंच्या खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून लहान मुलामुलींना त्यांच्या आवडीची गोष्ट मिळेल. लहान भावाच्या सांगण्यावरून केलेल्या कारभारामुळे कामात नुकसान होईल.

| शुभं-भवतु ||

 

One thought on “शुक्रवार 05 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *