daily horoscope

गुरूवार 04 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

गुरूवार  04  मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य

गुरूवार  04  मार्च आज चंद्ररास तूळ 18:20  पर्यंत व नंतर वृश्चिक. चंद्र नक्षत्र विशाखा 23:57 पर्यंत व नंतर अनुराधा.

daily horoscope

आजचा दिवस अशुभ असल्याने महत्वाची कामे करू नयेत.

वरील दोन्ही राशींचा व नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :– कालच्या व्यवहारातून तुम्हाला जे समजले ते कोणी कांही सांगितले असते तरी पटले नसते. पुढील निर्णय स्वत:च्या मनाला जे पटेल त्याप्रमाणे घ्या. दुसर्यांवरचा अती विश्र्वास घात करेल. कुटुंबात नव्या पाहुण्यांचे आगमन होणार असल्याची बातमी मिळेल.

 

वृषभ :– नोकरीतील वेळेत न झालेल्या कामाबद्दल वरीष्ठांकडून चांगलीच कानउघाडणी होईल. विद्यार्थ्यांना परिक्षेच्या काळजीने मानसिक ताण येईल. आँन लाईनच्या कार्यक्रमातील तुमचा सहभाग व तुमचे प्रेझेंटेशन कौतुकास्पद राहील.

 

मिथुन :–अध्यात्मिक पातळीवर अचानक स्वत:ची प्रगती झाल्याचे अनुभव येतील. न्यायालयातील वाद न्यायालयाच्या बाहेर सुटणार असल्याचे लक्षात येईल तरी त्यानुसार प्रयत्न करावेत. महिलांना संततीकडून आनंदाच्या बातम्या मिळतील.

 

कर्क :–दाताच्या डाँक्टर्सना पेशंटची मोठी सर्जरी करावी लागेल पण त्यातील गुंतागुंत वाढत नसल्याची खात्री करून घ्या. नोकरीत प्रतिष्ठेपेक्षा कर्तव्याला जास्त महत्व दिल्याने सर्वांकडून कौतुक होईल.गुरूतुल्य व्यक्तीकडून उपदेश मिळेल.

 

सिंह :–प्रेमाच्या व्यवहारात प्रत्येक गोष्टीत नियम लावू नका. राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असल्याबद्दल सामाजिक पातळीवर तुमच्या नावाचा बोलबाला होईल. कालच्या खरेदीतील अनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर इतरांकडून कुचेष्टा होईल.

 

कन्या :– स्पर्धा परिक्षेची क्लास घेणार्‍यांना त्यांच्या यशाबद्दल मोठी प्रसिद्धी मिळेल. वयस्कर मंडळीना एखादा संसर्गजन्य आजार होईल. वकील मंडळीना आपल्या अशिलाला वाचवण्यासाठी निकराचे प्रयत्न करावे लागतील. प्रवासात महत्वाची वस्तू सांभाळा.

 

तूळ :– सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येणार्‍या कामाच्या ठेकेदाराला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल. घरातील पुरूष मंडळींच्या अंदाजाप्रमाणे घटना घडतील. आजच्या आनंदाच्या प्रसंगात मित्रमैत्रिणींचा सहभाग मोठा असेल.

 

वृश्र्चिक :–बर्‍याच दिवसापासून बेरोजगार असलेल्यांना अचानक नोकरीबाबतची माहिती मिळेल. घराचे बांधकाम करणार्‍यांनी नियमांना भंग होत नसल्याची खात्री करावी. वाहनचालकांना दंडाची रक्कम भरावी लागेल. व्यवसायात मोठी वसुली होईल.

 

धनु :–बागकाम करणार्‍यांना , तसेच बागकामाची आवड असणार्‍यांना त्यांच्या विशेष प्रयोगाबद्दल पारितोषिक मिळेल. घराच्या सुशोभिकरणासाठी अचानक नियोजन कराल व पैसेही खर्च कराल. तरूणींना विवाहाबाबतच्या अपेक्षा पूर्ण करणारे स्थळ मिळेल.

 

मकर  :– माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती मिळेल व तुमचे बळ वाढेल. वकीली भाषेतील नोटीशीला उत्तर देण्यासाठी तज्ञ वकिलांची मदत घ्या. कुटुंबातील ज्येष्ठांच्या वाढदिवसानिमित्त आने लहानशा समारंभाचे आयोजन कराल.

 

कुंभ :–प्राँ. फंड तसेच पेन्शन च्या बाबतीतील रखडलेले काम पुढे सरकेल. फँशन डिझायनिंगच्या क्षेत्रातील मंडळीना अचानक टीका सहन करावी लागेल. तरूणांना चैन करण्याचे व व्यसनाची अतीव इच्छा निर्माण होईल.

 

मीन :–पाळीव प्राण्यांच्या तब्बेतीची काळजी घ्यावी लागेल. प्रसंगी अँडमिट करावे लागेल. वयस्कर मंडळींच्या उजव्या गुडघ्याचा त्रास सुरू होईल. बालसंगोपन केंद्रास सामाजाकडून मोठ्या रकमेची मदत मिळेल. लहान मुलांच्या इच्छा पूर्ण कराव्या लागतील.

| शुभं-भवतु ||

 

One thought on “गुरूवार 04 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *