Read in
मंगळवार 02 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 02 मार्च आज चंद्ररास कन्या 16:29 पर्यंत व नंतर तूळ.
चंद्रनक्षत्र चित्रा 27:28 पर्यंत. वरील दोन्ही राशींचा व नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज अंगारक संकष्ट चतुर्थी असून चंद्रोदय 21:51 (मुंबई) आहे.
आजचा दिवस शुभ असल्याने महत्वाची कामे करण्यास हरकत नाही.
सर्वांसाठी काँमन सूचना :– चिडचिडेपणावर नियंत्रण ठेवावे. कोणाविषयी आपले मत व्यक्त करू नये. टीका करू नये.
मेष :–कामाचे योग्य नियोजन केल्यास आजच्या दिवसातील कामे पूर्ण करू शकाल. नवीन कपडे घेण्याची ईच्छा अनावर होईल. बहिणीबरोबर जून्या आठवणी जागवाल व त्यात रमून जाल. एकावर एक फ्री च्या लोभात अनावश्यक खरेदी कराल.
वृषभ :–प्रवासाचा बेत कोविडच्या भितीने कँन्सल कराल पण घरच्यांची कुरबुर होईल व तुमची चेष्टा केली जाईल. परिक्षार्थी विद्यार्थ्यांना अभ्याचा जोर वाढवावा लागेल तरच कांही लिहीता येईल. कुटुंबातील मोठ्यांची मर्जी राखाल.
मिथुन :–व्यवसाय क्षेत्रातील मंडळीना व्यवसायातील नवनवे प्रयोग करून बघण्याची तीव्र ईच्छा होईल. सरकारी नोंद केलेल्या संस्थांना सरकारी योजना चालविण्यास मिळतील तरी त्यासाठीचा आज प्रयत्न करा. आईवडीलांना समाधान देणार्या घटना तुमच्याकडून घडतील.
कर्क :–तुमच्या नियोजनातील गडबड आर्थिक गणिते बिघडतील. तरी डोके धरून बसण्याऐवजी नियोजन पुन: चेक करा. महिलांना आपल्या आवडत्या छंदासाठी वेळ देता येणार आहे. घरातील आवराआवर चे काम आज पुरूष मंडळींवर येणार आहे तरी पुरूषांनी तशी तयारी ठेवावी.
सिंह :–गायक मंडळींना आपली कला दाखवण्याची चांगली संधी मिळेल व त्यांना तज्ञांकडून टीप्स ही मिळतील. कुटुंबात वाढदिवसा निमित्ताने लहानशी कौटुंबिक पार्टी कराल. पतीपत्नीच्या नात्यातील दुरावा कमी होईल..
कन्या :–विद्यार्थी वर्गास आत्ता परिक्षेनिमीत्ताने अवघड भाग शिकवण्याची गरज निर्माण होईल. वडील भावंडांचा रोष ओढवून घ्याल तरी शांत रहा. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी करण्याचा मोह न आवरल्याने अचानक खर्च वाढवाल.
तूळ :–तुमच्या बोलण्यातील वकीली भाषा तुम्हाला अडचणीत आणेल तरी दुसर्याला बोलताना विचार करा. राजकारण्यांबरोबर केलेली मैत्री आर्थिक खड्यात घालेल. कोणालाही आज जामिन राहणे योग्य ठरणार नाही.
वृश्र्चिक :–पतीपत्नीनी आपापल्या कमिटमेंट न पाल्याने नाराजी निर्माण होऊन कुरबुर वाढेल. द्वीतीय संततीच्या सहवासात आजीआजोबा रमून जातील. लहान मुलांना वाहनापासुन जपावे लागेल.रस्त्यावरून चालताना त्यांचा हात सोडू नका.
धनु :–घर विकण्याचे विचार सध्यातरी स्थगित करा. ज्यांना घर भाड्याने घ्यायचे आहे त्यांची ईच्छा पूर्ण होणार आहे. वडिलांकडून मुलाच्या वा मुलीच्या व्यवसायाला आर्थिक मदत मिळेल. आज कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहील. ज्येष्ठांच्या ईच्छा पूर्ण करण्याची संधी तरूणांना मिळेल.
मकर :–पुरोहित, देवळाचे पुजारी किंवा ज्योतिषी यांना अचानक मानसिक आनंद मिळणारे प्रसंग घडतील. चुलत घराकडील मंडळींचे घरी येणे होईल. भूतकाळातील घटनांवर चर्चा, गप्पा गोष्टी कराल. कुटुंबात सहभोजनाचा आनंद मिळेल.
कुंभ :–नोकरीच्या ठिकाणी तुम्ही करत असलेले काम सावधपणे करावे लागणार आहे. मित्रमैत्रिणीं बरोबर आज तुमच्याकडून अतिशय आपुलकीने वागणे होईल. बँकेच्या कर्ज प्रकरणातील वाढत गेलेल्या हप्त्याची जबाबदारी मित्रांकडून उचलली जाईल.
मीन :–आज बर्याचशा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होणार आहेत. नोकरीच्या ठिकाणी मात्र सहकार्यांकडून फारशी मदत मिळणार नाही. राजकीय मंडळीनी विरोधकांच्या त्रासाचा विचार न करता आपले काम सुरूच ठेवावे. पोलीस खात्याला गुप्त कारवाई विरोधात काम करावे लागेल.
| शुभं-भवतु ||
Thank you Tai