Read in
सोमवार 01 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 1 मार्च आज चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तरा फाल्गुनी सकाळी 07:36 पर्यंत व नंतर हस्त.
आजचा दिवस अशुभ असल्याने कोणतीही महत्वाची कामे करू नयेत. वरील राशीचा व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
सर्वांसाठी काँमन सूचना :– चिडचिडेपणावर नियंत्रण ठेवावे. कोणाविषयी आपले मत व्यक्त करू नये. टीका करू नये.
मेष :–कालपर्यंत ज्यांच्याबरोबर तुमचे पटत नव्हते त्यांच्याविषयी तुमचे मत बदलल्याचे तुम्हाला जाणवेल. तुम्ही जर बँकेच्या कर्ज वसुली विभागात असाल तर आज कोणत्याही मोहिमेवर जाऊ नका व जावेच लागले तर व्यवहारी वागा. मित्रासाठी जामिन राहण्याची वेळ येईल.
वृषभ :–नेमबाजी शिकवणार्याना योग्य गुरूची भेट होईल. लहान भावंडांबरोबर वागताना वैचारिक खटके उडतील तरी अहंपणा करू नका. व्यवसायाच्या क्षेत्रातून आर्थिक प्राप्ती चांगली होईल. नव्याने व्यवसाय करू इच्छिणार्यांनी तज्ञांबरोबर चर्चा करूनच ठरवावे.
मिथुन :–कुटुंबात स्त्रियांना आपला बँक बँलन्स चांगला भक्कम असल्याचे जाणवेल. महत्वाच्या कामासाठी पुरूष मंडळीना सासरेबुवांचे मदत घ्यावी लागेल. नोकरीत सहकारी वर्गाची मोठी मदत मिळेल. न्यायालयातील कामाबाबत अंदाज करत बसू नका वस्तुस्थितीला सामोरे जा.
कर्क :–कानाने कमी ऐकू येते अशी शंका वाटल्यास डाँक्टरांचा सल्ला घ्या. हाताला किंवा पायाला मुंग्या येण्याचा त्रास असेल तर दुर्लक्ष करू नका. आँफीसमधील तुमची बसण्याची जागा बदलली जाईल पण त्यावर खळखळ न करता स्वत:ला अँडजस्ट करून घ्या.
सिंह :–नोकरीच्या प्रतिक्षेतील व मंडळीना नोकरीबाबतची कांही आशा ठेवायला हरकत नाही. धार्मिक विषयावरील चर्चा तुम्हाला मनस्ताप देणारी ठरेल. राजकीय मंडळीना परिस्थितीवर मात करता येणार आहे. तु ची विचार करण्याच्या पद्धतीत तुम्हाला बदल करावा लागेल.
कन्या :–स्वयंपाकाची आवड असणार्या महिलांनी स्वत:चा व्यवसाय करण्याचा विचार करावा. तुमची कल्पनाशक्ती चांगली असल्याने तुम्ही लिहीत असलेल्या साहित्यासाठी सोशल मिडीयाचा वापर करावा. वाचकांकडून प्रतिसाद चांगला मिळेल.
तूळ :–लाभदायक घटना पाठोपाठ घडू लागल्याचे समजेल. व्यवसायात मोठी वसुली होईल. तुम्हाला आज दूर असलेल्या भावंडांबरोबर मनसोक्त बोलता येणार आहे. कुटुंबातील कुरूबुरीकडे लक्ष दिल्यास त्या जास्तच वाढतीस तरी कानाडोळा करा.
वृश्र्चिक :–पायदुखी, गुडघेदुखीचा त्रास कमी झाल्याचे जाणवेल. मनातील असलेल्या शंका स्पष्टपणे विचारून त्या तणावातून बाहेर पडा. दातदुखीचा त्रास असलेल्यांनी तात्पुरता उपाय करू नये. भाड्याने राहणार्यांना घरमालकांच्या जाचक अटी नाही विरोध करता येणार नाही.
धनु :–तुम्ही खूप त्रासात आहे अशा भ्रामक कल्पनेने उगीचच डोक्याला हात लावून बसू नका. कुटुंबातील सदस्यांबरोबर मोकळेपणाने गप्पा मारल्यास मनाला आनंद होईल व विचारातही बदल होईल. महिलांना मेडीठेशनची गरज जाणवेल.
मकर :–मनात आलेले विचार व स्वप्ने यांचा अर्थ लावत बसू नका. विवाहित मुलीकडील परिस्थितीवर योग्य उपाय करण्याचे ठरवा प्रथम तज्ञांचा सल्ला घ्या. वयस्कर मंडळीनी जून्या अनुभवांची पुन: पुन: चर्चा करू नये. मनाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा.
कुंभ :–बुद्धीच्या क्षेत्रातील मंडळीना त्यांच्याकडून भरीव कार्य होत असल्याचे जाणवेल. विद्यार्थ्यांसाठी घेत असलेल्या मेहनतीचा उपयोग होईल. कुटुंबातील एखाद्या गहन विषयावरील चर्चा मुलांसमोर करू नका. गर्भवती महिलांनी आज जास्त काळजी घ्यावी.
मीन :–बर्याच दिवसापापूर्वी कर्जाऊ दिलेले पैसे परत मिळण्याचे मार्ग दिसतील. बँकेचे व्यवहार स्वत: करावेत. वडिलांच्या तब्बेतीची काळजी घेण्यासाठी केअर टेकरची सोय करावी लागेल. बालहट्टाबरोबर स्त्रीहट्ट ही पुरवावा लागेल.
| शुभं-भवतु ||
Thank you Tai