Read in
रविवार 28 फेब्रुवारी 2021 ते शनिवार 6 मार्च 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य
28 फेब्रुवारी रविवार रोजी चंद्र रास सिंह 15:07 पर्यंत व चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी 09:35 पर्यंत.व नंतर उत्तरा फाल्गुनी.
1 मार्च सोमवार चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी 07:36 पर्यंत व नंतर हस्त 29:31 पर्यंत. 2 .मार्च मंगळवार चंद्ररास कन्या 16:29 पर्यंत व नंतर तूळ. चंद्रनक्षत्र चित्रा 27:28 पर्यंत. 3 मार्च बुधवार चंद्ररास तूळ, चंद्रनक्षत्र स्वाती 25:35 पर्यंत. 4 मार्च गुरूवार चंद्ररास तूळ 18:20 पर्यंत नंतर वृश्चिक व चंद्रनक्षत्र विशाखा 23:57 पर्यंत व नंतर अनुराधा 5 मार्च शुक्रवार चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अनुराधा 22:37 पर्यंत व नंतर ज्येष्ठा. 6 मार्च शनिवार चंद्ररास वृश्र्चिक 21:37 पर्यंत व नंतर धनु व चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 21 :37 पर्यंत.
रविवारी गुरूप्रतिपदा असून या दिवशी गाणगापूरची यात्रा असते.. . २ मार्च मंगळवारी अंगारक संकष्ट चतुर्थी आहे. मुंबईचा चंद्रोदय 21:51 ला आहे.
मेष :–28 रोजी सरकारी कंपन्यांमधे गुंतवणूक करण्यास हरकत नाही. यातून चांगला फायदा होईल. 1 व 2 रोजी व्यावसायिकांना समोरून वेगवेगळे प्रस्ताव येतील. नवीन खरेदी करताना घाई करू नका. नोकरीत काम करताना सहकारयाबरोबर संघर्ष होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. 3 व 4 रोजी विवाहेच्छू प्रौढ मुलांना त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुली सांगून येथील. दुसर्या विवाहाच्या संधी पण उपलब्ध होणार आहेत. 5 व 6 रोजी अँन्टीकरप्शनच्या खात्यातील अधिकार्यांना मोठ्या भ्रष्टाचाराच्या केसची चौकशी करावी लागणार आहे. राजकीय व्यक्तींना आपल्या विरोधातील गुप्त कारवाया बाबत जागरूक रहावे लागेल.
वृषभ :–28 रोजी तुम्हाला मानसिक त्रास होणार्या घटनाना कसे दुर्लक्षित करावे याचा फंडा सापडेल. मैत्रीच्या संबंधातून मानसिक त्रास कमी होणार्या चर्चा होतील. 1 व 2 मार्च रोजी अपत्यप्राप्तीच्या इच्छूकांनी डाँक्टरांचा सल्ल्यांचा विचार करायला हरकत नाही. सध्या फक्त दत्तक संततीचा विचार करू नये. 3 व 4 रोजी व्यवसायातील कांही कामे त्रासदायक ठरतील. कामगारांच्या हितासाठी लागणार्या बाबींची तुमच्याकडून पूर्तता होईल. 5 व6 रोजी वकील मंडळीनी आपल्या अभ्यासाशिवाय व केसचा सखोल अभ्यास केल्याशिवाय अशिलाला कोणताही सल्ला देऊ नये.
मिथुन :–28 रोजी तुम्हाला वयस्कर आजीआजोबांना हातापायांना मुंग्या येणे, बधिरता येणे यासारखा त्रास संभवतो. प्रौढांनाही अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. 1 व 2 रोजी सामाजिक काम करणार्या सरकारी रजिस्टर्ड संस्थांना सरकारी योजना चालवावयास दिल्या जातील. इमारतींच्या डागडुगीचे काम व देखभाल करण्याचे काँन्ट्रक्ट दिले जाईल. 3 व 4 रोजी रनिंग करणार्यांना किंवा इतर मैदानी खेळ खेळणार्यांना पाठ, पाठीच्या मणक्यांच्या दुखण्याचा त्रास संभवतो. 5 व 6 रोजी घरासाठी कर्ज प्रकरण करण्याच्या विचारात असाल तर या सप्ताहात काहीही प्रयत्न करू नका. फक्त चौकशी करून या.
कर्क :–28 रोजी मुलाच्या विवाहाची बोलणी पुढे सरकतील. निवृत्त करमचार्यांच्या प्राँ,. फंडची रक्कम लवकरच मिळणार असल्याची बातमी कळेल. 1 व 2.रोजी ज्या कामामधे सतत अडथळे निर्माण होत होते त्या कामाना मार्गावर आणाल. व्यावसायिक क्षेत्रात अचानक आर्थिक लेवल खालीवर होईल. 3 व 4 रोजी लेखक तसेच शब्दकोडी लिहीणारयांना नवीन लेखनासाठी विचारणा होईल. 5 व 6 .रोजी प्रेमविवाहाची बोलणीही फायनल होतील. ज्योतिषविद्या व मंत्रविद्या शिकवणार्याना ज्येष्ठ गुरूवर्यांचे मार्गदर्शन मिळेल.
सिंह :–28 रोजी तुम्हाला तुमच्या आवडीनिवडीनुसार खरेदी करता येणार आहे. आज स्वभावात शांतपणा येईल पण काम करण्याची जिद्ध तीच राहील. 1 व 2 रोजी आवाजाची कार्यशाळा आयोजित करण्यात येतील व त्यातील तुम्हाला सादरीकरणाची उत्तम संधी मिळेल. सायकाँलाँजीच्या विद्यार्थ्यांना अतिशय इंटरेस्टींग केसचा स्टडी करावा लागेल. 3 व 4 रोजी कफ विकारांच्या व अस्थमाच्या पेशंट्सनी प्रकृतीची काळजी घ्यावी. वयस्कर मंडळींच्या बाबतीत मुलांकडून खूपच प्रेमाने काळजी व्यक्त केली जाईल.
कन्या :–आय. टी. क्षेत्रात काम करणार्यांचा जरी प्रोटेक्ट संपला तरी त्यांच्या नोकरीस कोणताही धोका निर्माण होणार नसल्याचे दि. 3 व 4 रोजी कळेल व त्यांची चिंता मिटेल. भावंडाच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागल्याने मनस्ताप होईल. 5 व 6 रोजी जाहिरात क्षेत्रात असलेल्यांना सुचलेल्या नवनवीन कल्पना लोकांना अतिशय आवडतील. क्लायंट्स खूष होतील. तुमची कामातील सचोटी व कष्टाळूपणावर वरिष्ठ खूष होऊन 1 व 2 रोजी तुमच्यावर ग्रूप लिडरची जबाबदारी पडेल. कंपनीत सहकार्यांकडून अभिनंदन होईल.
तूळ:–28 रोजी सार्वजनिक क्षेत्रातील आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही केलेल्या उत्तम कामाबद्दल सरकारी खात्यातून तुमचे अभिनंदन होईल. 3 व 4.रोजी वेबिनारच्या माध्यमातून समाजाशी आरोग्यविषयक संवाद साधाल.व लोकांच्या शंकांचे समाधान कराल. 1 व 2 रोजी पतीपत्नीच्या नात्यात अचानक वादळ निर्माण होईल. गैरसमज व संशयाच्या कारणावरून वाद निर्माण होतील. 5 व 6 रोजी पुरूषांना वाढदिवसानिमित्त मौल्यवान वस्तुंची भेट मिळेल. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाची मेहनत वाढवली तरच यश मिळेल.
वृश्र्चिक :– 5 व 6 रोजी अध्यात्मिक उपासना करणार्यांना अचानक मानसिक शांतीचा अनुभव येईल. मेडीटेशनचा सराव उत्तम सुरू असल्याचे जाणवेल. 1 व 2 रोजी भाड्याचे घर शोधणार्यांना चांगले घर कळेल व्हरांडा व खेळकर हवा असलेले घर श्री गुरूमाऊलीच्या आशिर्वादाने मिळेल. 28 रोजी नोकरीत होणार्या बदलीच्या मागे कांहीतरी राजकारण असल्याचे जाणवेल किंवा कळेल. कोणतीही तक्रार न करता वस्तुस्थितीचा स्विकार करा. 3 व 4 रोजी लहान मुले मध्यरात्री अचानक रडत उठतील.
धनु :–28 रोजी सत्संगाच्या वर्गातील तरूणांना अध्यात्मिक प्रगती झाल्याचे जाणवेल. वयस्कर मंडळी धार्मिक गोष्टीतून उपदेश करण्यावर भर देतील. 1 व 2 रोजी राजकीय मंडळी कर्तव्याला प्रथम महत्व देतील तर व्यावसायिक उद्योगाला महत्व देतील. 3 व 4 रोजी ज्याच्या वैवाहिक जीवनातील घटस्फोटाची केस न्यायालयात सुरू आहे असे पति-पत्नी पुन्हा प्रेमाने एकत्र राहण्याचा विचार करतील. कुटुंबातील हरवलेल्या व्क्तीची माहिती मिळेल व ती अचानक घरीही येईल. 5 व 6 रोजी काका व आत्याच्या मदतीने कुटुंबावर आलेले संकट दूर होईल.
मकर :– 5 व 6 रोजी शिक्षणात खूप चांगले यश मिळत असल्याचे जाणवेल. वडील भावंडाच्या मध्यास्थिने पतीपत्नीमधील वाद संपुष्टात येऊन एकोपा निर्माण होईल. कुटुंबाचा आनंद शेजारी व मित्रमंडळींबरोबर साजरा केला जाईल. . 3 व 4 रोजी वडिलांच्या प्रकृतीची काळजी वाढेल प्रसंगी दवाखान्यात अँडमिट करावे लागेल. अजोळकडील नात्यातील मंडळींचे घरी आगमन होईल. घरी आज्जी आल्यामुळे लहान मुले पण खूष होतील. 1 व 2 रोजी घरातील देवाचा फोटो भंग पावल्याचे दिसेल. असाच न ठेवता त्वरीत नवीन करून आणावा. पूजा, प्रार्थनेमुळे घरात प्रसन्नता येईल. 28 रोजी व्यावसायिकांनी आर्थिक व्यवहार करू नयेत नुकसान संभवते.
कुंभ :–बर्याच दिवसापासून दुसर्या संततीबाबतचा सुरू असलेला विचार आज 28 रोजी पक्का होईल. महिलांनी मनावरील ताण कमी केल्यास सर्व कांही सुरळीत होईल. . व्यावसायिक क्षेत्रातील अंदाज अचूक निघतील. व्यवसायात निर्माण झालेली गुंतवणूकीची गरज 5 व 6 रोजी आपोआप पूर्ण केली जाईल. नवीन व्यवसाय सुरू करण्याची तयारी पूर्ण होईल. शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक आशयावर प्रकाश टाकणारे लेखन लेखकांकडून होणार आहे. 3 व 4 रोजी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्यांना सरकारी खात्याकडून मानपत्र मिळेल. 1 व 2 रोजी डाँक्टर., सर्जन., इंजिनीयर यांना शासनाच्या योजनांमधे सहभाग घेता येणार आहे.
मीन :– 5 व 6 या दोन दिवसात घरगुती व्यवसायात अचानक लोकांच्या मागणीमुळे वाढ होईल. व्यवसायातील गुंतवणूकही वाढवण्यासाठी बँकेकडून कर्ज मंजूर होईल. 1 व 2 रोजी वैवाहिक सुखात वाढ होऊन पतीपत्नीमधील नाते खेळीमेळीचे व दृढ होईल. महिलांना गर्भाशयाबाबत काळजी निर्माण करणारा त्रास होईल तरी डाँक्टरांचा सल्ला घ्यावा. 3 व 4 रोजी सरकारी अधिकारी वर्गास मानहानीला सामोरे जावे लागेल. कोणतेही नियमबाह्य काम करू नये,. पोलिस खात्याकडून गुन्हेगारांकडून गुप्त कारवायांची बातमी काढून घेतली जाईल. 28 रोजी पुरूषांना पचनसंस्थेच्या विकाराचे कारण समजेल.
|| शुभं-भवतु ||
Thank you Tai