daily horoscope

शनिवार 27 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शनिवार 27 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

शनिवार 27 फेब्रुवारी 2021 आज चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा 11:18  पर्यंत व नंतर पूर्वा फाल्गुनी .

daily horoscope

आज माघस्नान समाप्ती चा दिवस आहे. आज माघ पौर्णिमा आहे. आजचा दिवस चांगला असल्याने मनात योजलेली कामे करावीत.

वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–कोर्टकचेरीच्या कामात आज लक्ष घातलेत तर काम योग्य प्रकारे मार्गी लागेल. व्यवसायातील हाताखालील कर्मचार्यांकडून आज तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे काम करून घेता येणार आहे. गायी म्हशी असलेल्यांनी गोठ्यांची नीट काळजी घ्यावी विचित्र प्रकारचा रोग निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

वृषभ :–आईच्या आजारपणाबाबत काळजीचे प्रश्र्न निर्माण होतील. नोकरीत प्रमोशनसाठी मुद्धमहून कोणतेही प्रयत्न करू नका.  सार्वजनिक इमारतीमधे राहणार्‍यांना एखाद्या अडचणीला तोंड द्यावे लागेल.  विवाहेच्छूंनी प्रथम आपल्या अपेक्षा  ठराव्यात.

 

मिथुन :– कँलिग्रँफीच्या तज्ञांकडून सेमिनारचे नियोजन किंवा प्रत्यक्ष सेमिनार घेतले जाईल. कलाकार व चित्रकार, रांगोळी काढणारे यांचे समाजाकडून कौतुक केले जाईल. स्पर्धात्मक परिक्षेत चांगले यश मिळेल.

 

कर्क :–फँशन शो साठी काम करणार्‍यांना अचानक गठ्ठ्याने कामे येतील.नोकरीच्या शोधात असलेल्यांचे प्रयत्न फलदायी होत असल्याचे जाणवेल. आई वडीलांबरोबर स्थळ पाहण्यासाठी एकत्र त्स्थळाकडे जाणे होईल.

 

सिंह :– आज मनाला आनंद देणार्‍या बर्‍याचशा  गोष्टी घडतील. कुटुंबातील ज्येष्ठांच्या विचाराला पुष्टी देताना खरोखर विचार करा. तरूणांना मनातील ईच्छा पूर्ण होण्याचे संकेत मिळतील तरी तुम्ही एक पाऊल पुढे सरका.

 

कन्या :–प्रेमाच्या व्यवहारात वादविवाद करू नका. जे पूर्वीपासूनच दिवाळखोरीने त्रस्त आहेत त्यांनी आपले फंडे बाजूला ठेवून तज्ञांच्या मताने व्यवहार करावेत. महिलांना स्वत:च्या हिमतीवर नवीन दागिने, फँशनेबल कपडे घेण्याची संधी मिळेल.

 

तूळ :–तुमच्या लाभ स्थानातील पौर्णिमा सर्वच क्षेत्रातील कामे सहजपणे व लाभदायक होतील. आज होत नसलेली कोणतीही गोष्ट ओढाताण करून करू नका. कुटुंबात पत्नीबरोबरच्या व्यवसायातही अचानक मागणीही  वाढ झाल्याचे कळेल.

 

वृश्र्चिक :–डिजीटल मार्केटमधे काम करणार्‍यांना मोठ्या आँर्डर्स मिळतील व तुमच्या व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल. आज सकाळपासूनच कामाची सुरूवात सकारात्मक होत असल्याचे जाणवेल. महत्वाच्या कामासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल.

 

धनु :–नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी  इच्छा नसतानाही नवीन कामाची जबाबदारी स्विकारावी. कालेज गोईंग मुलांनी नियमाचा भंग होणार नाही याची खबरदारी घ्यावी. काकांकडील कुटुंबाकडून अचानक वारसाहक्काबाबतची माहिती कळेल.

 

मकर :–हातातील प्रोजेक्ट बाबतची शंका वरिष्ठांना मोकळेपणाने विचारा म्हणजे तुमच्याकडून होणार्‍या चुकां परत होणार नाहीत. व्यावसायिक कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न केल्या अपेक्षित यश मिळेल. महिलांकडून मानसिक भितीपोटी हातातील कामात चुका होतील.

 

कुंभ :–शाळकरी मुलांना वर्षभराच्या अभ्यासाच्या गोंधळावर तज्ञांच्या मार्गदर्शनाने अभ्यासातील उणीवा भरून काढता येतील. नोकरदार मंडळी स्वत:वरील जबाबदारी सांभाळून कामाचा मोठा भाग उचलतील. राजकीय क्षेत्रात तुमच्या विरोधातील मंडळी विनाकारण गाँसिपींग करतील.

 

मीन :–घरगुती व्यवसायात  आर्थिक आवक चांगली राहील. कस्टमच्या मागणीनुसार व्यवसायात नवीन वस्तूंची वाढ करता येणार आहे. नोकरदारांना सहकार्यांकडून भक्कम मदत मिळाल्याने कामाचे लोड कमी होईल. परदेशी, परगावी असलेल्या मित्रमैत्रिणींबरोबरच्या संपर्कामुळे आनंद वाटेल.

| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *