daily horoscope

शुक्रवार 26 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शुक्रवार 26 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

शुक्रवार 26 फेब्रुवारी आज चंद्ररास कर्क 12:34 पर्यंत व नंतर सिंह. .

daily horoscope

चंद्रनक्षत्र आश्लेषा 12:34 पर्यंत व नंतर मघा. आजचा दिवस 15:50  पर्यंत चांगला आहे तरी त्या नंतर महत्वाची कामे करू नयेत. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–कौटुंबिक प्रश्र्नांना प्राधान्य द्यावे लागेल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षा देण्याची उत्सुकता वाढेल. आजपर्यंत ज्या कामाना जास्त वेळ लागत होता तीच कामे आज लवकर करून दाखवाल. अनावश्यक खर्चाकडे वळूच नका.

 

वृषभ :–वयस्कर मंडळीना उच्चरक्तदाबाचा त्रास संभवतो. कलाकार मंडळीना समाजाला आवडणार्‍या विषयावर कला सादर करता येणार आहे. पेंटींग्ज करणार्यांना, चित्रकारांना स्वत:चे एखादे प्रदर्शन भरवण्याचे नियोजन करतील.

 

मिथुन :–आज व्यावसायिक क्षेत्रातील मंडळींची चांगलीच धावपळ वाढणार आहे. ज्या पतप्रतिष्ठेची तुम्हाला ओढ लागली आहे त्या मार्गानेच तुम्ही जात असल्याचे तुम्हाला अनुभवास येईल. किरकोळ भाजी विक्रेत्यांना आज चांगला धनलाभ होईल.

 

कर्क :–आज तुमचे खर्चाचे प्रमाण वारेमाप होईल. नोकरदार मंडळीनी कोणत्याही नियमबाह्य गोष्टीला सहाय्य करू नये. सर्वानीच आपल्या आहारावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. लहान मुलांना गँलरीत, गच्चीत ऊंच ठिकाणी कोठेच एकटे सोडू नका.

 

सिंह :–राजकीय मंडळीना त्यांच्या कतृत्वानुसार गटप्रमुखाची जबाबदारी सोपवली जाईल. व्यावसायिक  क्षेत्रात काम करताना लागणारी मार्गदर्शनाची  मदत मागण्यासाठी लाजू नका.यश तुमच्या नजरेच्या टप्प्यात आहे पण तेथे पोहोचण्यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज आहे.

 

कन्या :–नोकरीच्या ठिकाणी आपण भले व आपले काम भले हीच वृत्ती ठेवा. कोणाच्याही भानगडीत पडू नका. आज नव्याने गुंतवणूक करायला हरकत नाही लाभदायक ठरेल. विद्यार्थी इतरांवर अवलंबून न राहता स्वत: अभ्यासाला जोरात सुरूवात  करतील.

 

तूळ :–सतत उद्योगी राहण्याच्या  वृत्तीतून नवीन संकल्पना साकार होऊ लागतील. व्यवसायातील दुसर्यांकडून येणारी येणी आज तुमच्या एका फोनवर येथील फक्त फोन करावा लागेल. सरकारी बँकेत जमा असलेले पैसे तांत्रिक बाबींमुळे आज काढता येणार नाहीत.

 

वृश्र्चिक :–कुटुंबातील प्रत्येकाची मर्जी राखताना स्वत:कडे दुर्लक्ष होईल. नात्यातील विवाह सोहळ्याला हजर राहण्याच्या आग्रहाला बळी पडाल पण कोरोनाचे नियम पाळा. तुमच्या पायांची जखम लवकर बरी न झाल्याने पुढील उपचारांसाठी दवाखान्यात अँडमिट व्हावे लागेल.

 

धनु :–परिक्षेच्या धामधुमीचा परिणाम प्रकृतीवर होईल. अभ्यासाबरोबर झोपेलाही तितकेच महत्व द्या. राजकीय क्षेत्रात अचानक तुम्हाला पुढे जाण्यापूर्वी विचार करावा लागेल. घाईने कोणताच निर्णय घेऊ नका. परदेशी असलेल्या मुलांबरोबर चे बोलणे मनाला त्रासदायक ठरेल.

 

मकर :– औषधाच्या कंपनीत काम करणाऱ्यांना पगारात वाढ मिळणार आहे. दुभाषीचे काम करणार्‍यांना कामाचा खूपच ताण जाणवेल. व्यवसायातील जूने सहकारी भेटतील व पुन: तुमच्याबरोबर सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करतील.

 

कुंभ :–शालेय विद्यार्थ्यानी अवघड विषयातील कन्सेप्ट्स प्रथम तज्ञांकडून क्लिअर करून घ्या. स्टेशनरीच्या दुकानदारांना व्यवसायातील झालेली त्रूटी भरून काढता येणार आहे. लहान मुलांना हातातील वस्तु कडे लक्ष ठेवावे लागेल.

 

मीन :–नोकरदारांना वरिष्ठांची चांगली साथ मिळेल. विद्यार्थ्यांनी परिक्षेची तयारी सराव पेपरच्या मार्गातून करावी. पोरोहित्य करणार्‍यांनी लोकांचे प्रबोधन करण्याची संधी मिळेल. व्यवसायात जरासाही केलेला कंटाळा नुकसानी कारणीभूत होईल.

| शुभं-भवतु ||

 

One thought on “शुक्रवार 26 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *