Read in
गुरूवार 25 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 25. फेब्रुवारी चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य 13:16 पर्यंत व नंतर आश्लेषा.
आज गुरूपुष्यामृतयोग असल्याने ज्यांचा सोने खरेदीचा नियम आहे किंवा ज्यांना सोने खरेदी करता येणार आहे त्यांनी करावे. हा योग सोनेसंग्रहास चांगला असतो. या योगावर घर किंवा देवालयाच्या बांधकामाची सुरूवात करावी. सोने चांदी, रत्ने किंवा नवीन वस्त्रांचे दुकान सुरू करण्यास चांगला दिवस आहे तसेच ज्यांना वस्त्राचा घरगुती व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनीसुद्धा आज व्यवसायास सुरूवात करावी. महिलांना हौसेने कान किंवा नाक टोचून घेण्यासाठी आजचा शुभ दिवस आहे.
वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आज आईजवळ बसून मनातील गोष्टी करण्याचा, मनावरील दडपण दूर करण्याचा दिवस आहे. महिलांना आपल्या कुटुंबाविषयी अतीव प्रेमाचे उधाण येईल व कुटुंबाच्या सुखापुढे सर्व गोष्टी तुच्छ वाटतील. नवीन घराबाबतचेी माहिती कळेल.
वृषभ :–वार्ताहर मंडळीनी बातमीची शहानिशा करूनच काम पुढे सरकवावे. राजकीय मंडळीना स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी उड्या माराव्या लागतील. तरूणांच्या मनातील गोष्टींचा आज जराही थांगपत्ता लागणार नाही. मोठ्या भावंडांबरोबर तात्विक मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या.
मिथुन :–पुरूषांनी आपल्या उजव्या डोळ्याची काळजी घ्यावी. घराची स्वच्छता करताना महिलांना पूर्वी हरवलेली वस्तू सापडेल. निवृत्त होणार्या कर्मचार्यांना, सहकार्यांकडून अतिशय प्रेमपूर्वक, आदराने निरोप समारंभ केला जाईल. तुम्ही भावूक व्हाल.
कर्क :–दाताच्या डाँक्टर्सना पेशंटची मोठी सर्जरी करावी लागेल. औषधाच्या कंपनीच्या शेअर्समधून चांगला नफा होणार आहे. व्यावसायिकांना एखाद्या सरकारी नोटीसीचे थटलेले उत्तर आजच्या आज तातडीने द्यावे लागणार आहे.
सिंह :–आईकडील नात्यातून एखादी काळजी वाढवणारी बातमी मिळेल. मुलांना वैयक्तिक पातळीवर अतिशय माणुसकीचा आनंददायक अनुभव येईल. घर विकण्याचे विचार पुढे ढकलले जातील. नोकरीतील कामाचा वाढलेला व्याप लवकर आवरणार नाही सहकार्यांची मदत घ्यावी लागेल.
कन्या :–मानसिक चिंता करण्यापेक्षा महत्वाचा प्रश्र्न कसा सोडवावा याचा विचार करा. प्रसंगी इतरांची मदत घ्या. सोनारांना गिर्हाईकाकडून घडणावळीचे खुषीने जास्त पैसे मिळतील. मुलींना वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल गरज पडल्यास स्वत:च्या घरी आणावे लागेल.
तूळ :–दलाल मंडळीना कामाची चांगली दलाली मिळेल. जागेच्या व्यवहारातून घरमालकांच्या खिशाला तोशिस पडेल. नोकरीच्या ठिकाणी कालच्या मिटींगमधून झालेल्या निर्णयात आज बदल होणार आहे तरी तिकडे लक्ष द्या बेफिकीर राहू नका.
वृश्र्चिक :–कुटुंबात अचानक संतपुरूषांची गाठभेट होईल व मोलाचा उपदेशही मिळेल. बुद्धीच्या जोरावर आज तुम्ही सर्वच बाबतीत अग्रेसर होणार आहात. आँन लाईन परिक्षेतही चांगले यश मिळवाल. आज तुमचा आनंदाचा दिवस आहे.
धनु :–व्यवसायाचे कर्ज फेडण्यासाठी पत्नीची मदत घ्यावी लागेल. वयोवृद्ध मंडळीना आज फारच समजून घ्यावे लागेल. तरूण वर्गास पूजा, प्रार्थना याचे महत्व समजावून सांगितले जाईल. सत्संगातील वयस्कर मंडळी एकत्र येऊनमानसपूजेने समाधान मिळवतील.
मकर :–लहान मुलांना त्यांच्या शू च्या जागेला दुखापत होण्याची शक्यता आहे तरी मुलास आज सांभाळावे लागेल. ज्योतिषांना अतिशय किचकट व क्लिष्ट प्रश्र्नांचा अभ्यास करावा लागेल. सरकारी खात्यातील कर्मचार्यांना अचानक मानसिक ताण येणार्या घटनाना सामोरे जावे लागेल.
कुंभ :–महिला आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करण्याच्या इच्छेने मैत्रीणीबरोबर मोठ्या माँलला जातील. घरातील किराणा भरण्याचे काम या महिन्याला पुरूषाना करावे लागणार आहे व त्यांना त्याची चुणूक अनुभवास येईल. महिलांना आपले घरातील नियोजन योग्य जमल्याचे जाणवेल.
मीन :–पतिराजांकडून मँडमना त्याच्या आवडीचा ड्रेस वा साडी मिळेल. तरूणांना नोकरीच्या ठिकाणी आज जास्त वेळ काम करावे लागेल. प्रेमाच्या विषयातील भावना व्यक्त करण्यात तुमच्याकडून रूक्षपणा येईल. नोकरीच्या प्रतिक्षेतील तरूणांना अपेक्षित काँल येईल.
| शुभं-भवतु ||
Thank you Tai