Read in
बुधवार 24 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 24 फेब्रुवारी आज चंद्ररास मिथुन सकाळी 07:09 पर्यंत व नंतर कर्क. चंद्रनक्षत्र पुनर्वसु 13 :16 पर्यंत व नंतर पुष्य. बुधवार 24 फेब्रुवारी आज चंद्ररास मिथुन सकाळी 07:09 पर्यंत व नंतर कर्क. चंद्रनक्षत्र पुनर्वसु 13 :16 पर्यंत व नंतर पुष्य.
आज भीमद्वादशी असून प्रदोषाचा उपवासही आजच आहे.
वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–सरकारी कामे करताना अनेक अडचणी येतील. बँकेच्या कर्ज प्रकरणी तसेच खाजगी क्षेत्रातील घेतलेल्या लोनबाबत तगादा सुरू होईल. कायदा, नियम दाखवण्याऐवजी समोरासमोर नम्रतेने बोलल्यास मध्यम मार्ग निघू शकेल. अरेरावी करू नका.
वृषभ :–पतीपत्नीमधील सुरू असलेल्या विरहाचा परिणाम त्रासदायक ठरेल. तरी आज दुपारी 01:16 नंतर या विषयावर एकमेकांनी विचार व्यक्त केल्यास मार्ग निघेल. नोकरदारानी हातातील कामासाठी इतरांवर विसंबून राहिल्यास कामात बिघाड निर्माण होईल.
मिथुन :–नको असलेल्या वस्तूंची खरेदी करून अचानक मोठ्या प्रमाणात पैसे खर्च कराल. विवाहाची बोलणी पुढे सरकतील पण मनातील आढ्यता काढल्यास बोलण्यात पारदर्शकता राहील. ज्येष्ठांना दिलेला शब्द तुम्हाला आज पाळावा लागेल.
कर्क :–मनातील चंचलपणामुळे आज तुम्हाला कोणताही निर्णय घेता येणार नाही. निर्णयाची घाई करू नका. तुमच्या व्यावसायिक करीयरमधे आजपर्यंत कधीही न अनुभवलेल्या लाभदायक गोष्टी घडतील. काका किंवा आत्याच्या प्रकृतीची काळजी निर्माण होईल.
सिंह :–संततीकडून आनंद व समाधान देणारी घटना कळेल. धार्मिक कामासाठी पुरोहित मंडळीना समाजाला प्रबोधन करण्याची संधी मिळेल. डाँक्टर्सना वेबिनारच्या माध्यमातून समाजाशी संवाद साधता येईल व त्यांच्या शंका दूर करता येणार आहेत.
कन्या :–आज व उद्या या दोन दिवसात तुमच्या हस्ते एखाद्या नामाकिंत लेखकाच्या पुस्तक प्रकाशनाची संधी मिळेल. गावाकडील शेतीच्या किंवा घराच्या कामासाठी तातडीने जाण्याचा प्रश्र्न उभा राहील. राजकीयदृष्टय़ा वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.
तूळ :–व्यवसायाला पूरक असलेल्या नवीन व्यवसायाचे मार्ग सापडतील. महिलांच्या मनाला स्पर्श करणार्या घटना घडतील तर तरूण वर्गास प्रेमाच्या हळुवार प्रसंगांचा अनुभव येईल. घर भाड्याने घेताना आज कोणताही आर्थिक व्यवहार करू नका.
वृश्र्चिक :–दैनंदिन कामातूनही आज जास्त श्रम जाणवतील. अपत्यप्राप्तीच्या इच्छूकांना कन्या रत्नाची प्राप्ती होईल व कुटुंबात आनंद साजरा होईल. पेपरमधील जाहिरातीवर आज कोणतीही आँन लाईन खरेदी करू नका मानसिक त्रास होईल.
धनु :–ओबिस लोकांनी आपल्या प्रकृतीकडे लक्ष देण्याचे ठरवावे. वयस्कर मंडळीना ब्लडप्रेशरचा त्रास संभवतो. सासुबाईंच्या माहेरकडील मंडळींचे आगमन होईल. सायकल चालवताना लहान मुलांना दुखापत होण्याचा धोका आहे.
मकर :–विवाहेच्छूंना परिचयातून विवाहाचे संबंध जुळत असल्याचे जाणवेल. कुटुंबातील ज्येष्ठांच्या विचारानेच निर्णय घ्यावा लागेल. शाळकरी विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाबाबतची यशाची खात्री देता येणार नाही. अवघड वाटणार्या विषयांवर मार्गदर्शन घ्यावे.
कुंभ :–आज महिलांना चैन करण्याची इच्छा निर्माण होईल तरी पतिराजांनी याची दखल घ्यावी. मित्रमैत्रिणींच्या प्रेमसंबंधात विश्र्वासाचे नाते निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवावे व मोठ्यांचे मार्गदर्शन घ्यावे.
मीन :–ज्येतिष शास्त्रातील पारंगत व्यक्तींना त्याच्या अभ्यासातून नवीनच नियम तयार होत असल्याचे जाणवेल. नोकरदारांना हाती घेतल्या कामातील गुंतागुंत दूर करण्याचे श्रेय मिळेल. लहान मुलांच्या शिक्षकांना आपले प्रयोग यशस्वी होत असल्याचे दिसेल.
| शुभं-भवतु ||
Thank you Tai