Read in
मंगळवार 23.फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 23 फेब्रुवारी आज चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आर्द्रा 12:29 पर्यंत व नंतर पुनर्वसु. आजचा दिवस 18:04 नंतर शुभ असल्याने या वेळेत महत्वाची कामे करू नयेत.
वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–तुम्हाला वारसा हक्काने जमीन, किंवा घर मिळाले असेल तर त्याबाबतच्या कायदेशीर बाबी पूर्ण केल्याची खात्री करून घ्या. प्रत्येक कामात आज तुमचा प्रभाव पडणार आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी महत्वाच्या कामाना सुरूवात करावी.
वृषभ :– तुमच्या क्षेत्रांतील तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्याबरोबर बरोबरी करण्याचे प्रयत्न करणार आहेत. महिलांना हार्मोनल चेंजेसचा त्रास होऊ लागल्याने मानसिक चिडचिड जाणवेल. बी . पी. चा त्रास असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी.
मिथुन :–व्यवसायामधे तुमच्या बरोबरील स्पर्धा वाढत असल्याचे जाणवेल. प्रेमसंबंधात इतरांवरून वादग्रस्त विषय निर्माण होतील. पुरूष मंडळीनी झटपट पैसे कमविण्याचे शाँर्टकटसचे विचार करू नयेत. ज्येष्ठांनी लहानांवर आपला राग काढू नये.
कर्क :–सतत भूतकाळातील घटनांचा विचार करत राहीलात तर वर्तमानकाळात जगणे अवघड होईल. तुमच्या विचारांप्रमाणे वागण्यातही नियमांची गरज निर्माण होणार आहे. वडिलांकडील कुटुंबातून काळजी लावणारा निरोप येईल.
सिंह :–मित्रावर आलेल्या संकटात तुमच्याकडून त्याला मोठी मदत करावी लागणार आहे. नोकरीच्या ठीकाणीही सहकार्याचे रडगाणे ऐकून घ्यावे लागेल. आज भेटणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला क्षुल्लक समजण्याची चूक करू नका.
कन्या :–मनातील विचार स्पष्ट बोलल्यास कामातून मार्ग निघेल. खाजगी शिकवणी वर्गातील शिक्षकांच्या वेगवेगळ्या प्रयोगशील पद्धतीला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. महिलांना आज कामातून अजिबात वेळ मिळणार नाही.
तूळ :–तुमच्या बोलण्यातील वकीली भाषा तुम्हाला अडचणीत आणेल तरी आज तोलून मापून बोला. तुमच्या महत्वाकांक्षेस थोडा लगाम घालावा लागेल. तुमच्या हातातील कामाबाबत वव्यहारी दृष्टीकोनातून बघा.आपले म्हणणे इतरांना पटवण्याचा प्रयत्न करा.
वृश्र्चिक :–रागावर नियंत्रण ठेवल्यास आजची कामे सुरळीत राहतील. हाताखालील स्टाँफ कांही प्रमाणात सहकार्य करणार नाही. मनातील व कामाच्या ठिकाणची गुपिते दुसर्यांना सांगण्याच्या मोहात पडू नका. स्वतःच्या घराला सुशोभित करण्याचे विचार पक्के कराल.
धनु :– विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासात गती निर्माण झाल्याचे जाणवेल. आज घरातील कर्तव्यांना प्राधान्य दिल्या कुटुंबात समाधान निर्माण होईल. बर्याच दिवसानंतर जून्या मित्रमंडळींची गाठभेट होईल. व्यावसायिक कामात भावनिकता आणू नका.
मकर :–नात्यातील दुरावा असलेल्या व्यक्तीला अडचणीत असल्याने मदत करण्याची इच्छा होईल. दुसर्यांच्या सांगण्यावरून कोणत्याही आर्थिक व्यवहारात पडू नका. आज तुमच्या कामातून तुमची ओळख निर्माण होईल.आज कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्या.
कुंभ :–राजकीय क्षेत्रातील विरोधक अचानक मैत्रीचा हात पुढे करतील. तुमच्या वागण्यातील पारदर्शकपणा तुमची प्रतिष्ठा वाढवेल. ज्या गोष्टी तुमच्या तत्त्वात बसत नाहीत त्यांकडे दुर्लक्ष करा हेच चांगले. आज मानसिक समाधान मिळेल.
मीन :–गुंतवणूक करताना कोठे कशी करावी याची माहिती तज्ञांकडून घेतल्यास नुकसानीचा धोका राहणार नाही. विरोधकांच्या त्रासाचा विचार करून हातातील काम सोडून देऊ नका. घरातील नात्यात संशयाचे वातावरण राहील असे कोणतेही कृत्य करू नका.
| शुभं-भवतु ||
Thank you Tai