Read in
सोमवार 22 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 22 फेब्रुवारी चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 10:57 पर्यंत व नंतर आर्द्रा. आजचा दिवस शुभ दिवस आहे. तुमच्या आवडीची व महत्वाची कामे करून घ्या.
वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– नोकरीच्या ठिकाणी करत असलेल्या कामातील तुमचे कौशल्य पाहून वरिष्ठ खूष होतील. शिक्षकांना कोरोना कालावधीत घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे जाणवेल. राजकीय मंडळीना त्रास देणारे व विरोधक अचानक माघार घेत असल्याचे जाणवेल.
वृषभ :–हातातील प्रोजेक्टमधे अचानक अडचणी निर्माण होऊन कामाबाबत तणाव निर्माण होईल. व्यावसायिकांना आजचा दिवस शुभ असल्याने ज्या कामाबाबत मार्ग निघत नव्हता त्याबाबतचे मार्ग ओपन होतील. महिलांना अचानक पोटदुखीचा त्रास जाणवेल.
मिथुन :–आई वडीलांकडून मुलीला अचानक नवीन वस्त्रांची भेट मिळेल. शाळकरी मुलामुलींना परिक्षेचा ताण जाणवेल. महत्वाच्या कामासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल आपल्याला सर्व येते या भ्रमात राहू नका नुकसान होईल.
कर्क :–बँकेकडून घेतलेल्या कर्जाबाबत परतफेडीसाठी दांडगाई सुरू होईल तरी सावध रहावे. आईच्या गुडघ्याच्या आँपरेशनची प्रकरण ऐरणीवर येईल. सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना वृद्धाश्रमातील कामाची जबाबदारी घ्यावी लागेल.
सिंह :–नवविवाहित दांपत्यास कुटुंबातील व्यक्तींच्या मानसिकतेचा अंदाज आल्याने दैनंदिन व्यवहार सोपे जातील. नोकरीतील कायदेशीर बाबींची जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात येईल. पूर्वी केलेल्या कामातून तुंम्हाला मुक्त केल्याचे सांगण्यात येईल.
कन्या :–न्यायालयातील कामाबाबतची जागरूकता महत्वाची ठरेल. वकीलांना कामाचा ताण वाढेल. डाँक्टर मंडळीना पेशंटसाठी समुपदेशनाचे कामही करावे लागेल. तरूणांनी उत्साहाच्या भरात वाहन चालवताना वेगावर नियंत्रण याची काळजी घ्यावी.
तूळ :–सेवाभावी संस्थेत काम करणार्यांचे समाजाकडून खूप कौतुक केले जाईल. पोलिस खात्यातील कर्मचार्यांनी कोणत्याही छुप्या बाबीत सहभागी होऊ नये व कोणाशीही अती जवळीक करू नये. आज तुम्हाला तुम्ही न केलेल्या चुकांसाठी सुद्धा ओरडा पडणार आहे.
वृश्र्चिक :–लाचलुचपत व भ्रष्टाचार खात्यातील कर्मचार्यांना अचानक एखाद्या नवीन योजनेत सहभागी व्हावे लागेल. सरकारी बँकेतील कर्ज प्रकरण इतक्या सहजपणे होणार नसल्याने त्याच्यावर विसंबून राहू नका.
धनु :–अपत्यप्राप्तीच्या प्रतिक्षेतील जोडप्यांनी सँरोगसीचा विचार करताना जवळच्या नात्यातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. वकीली भाषेतील नोटीशीला उत्तर देण्यासाठी तज्ञ वकिलांची मदत घ्या. आयुष्यातील ताण तणाव सहन करण्यासाठी तरूणांनी मेडीटेशनचा सराव करावा.
मकर :–कोर्टकचेरीच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. रेल्वेतील तिकीट तपासकांकडून नियमबाह्य काम होणार नाही याची दखल घ्यावी लागेल. नोकरीत वरीष्ठांकडून नवीन कामाची जबाबदारी सोपवण्यात येईल.
कुंभ :–व्यसनाच्या आहारी गेलेल्यांनी स्वत:विषयी पाँझिटीव्ह विचार केल्यास सद्धपरिस्थितीतून मार्ग निघेल. वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल व प्रसंगी हाँस्पिटलमधे अँडमिट करावे लागेल. व्यवसायातील हाताखालील कर्मचार्यांबरोबरचे संबंध वृद्धींगत होणारे प्रसंग घडतील.
मीन :–प्रथम संततीच्या बाबतची काळजी वाढेल. वाहन खरेदीच्या निर्णयात बदल करावा लागणार आहे. आईच्या आजारपणाबाबत काळजी निर्माण होईल. कुटुंबातील लहान मुलांना आपल्या बुद्धीची चुणूक दाखवण्याची संधी मिळणार आहे.
| शुभं-भवतु ||