weekly-horoscope-2020

रविवार 21 फेब्रुवारी 2021 ते शनिवार 27 फेब्रुवारी 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य

Read in

विवार 21 फेब्रुवारी 2021 ते शनिवार 27 फेब्रुवारी 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य

रविवार 21 चंद्ररास वृषभ 21:54 पर्यंत व नंतर मिथुन. चंद्रनक्षत्र रोहिणी 08 :42 पर्यंत  नंतर मृगशीर्ष.

weekly-horoscope-2020

सोमवार 22 चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्र नक्षत्र मृगशीर्ष 10:57  पर्यंत व नंतर आर्द्रा. मंगळवार 23 चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्र नक्षत्र आर्द्रा 12 :29  पर्यंत. बुधवार 24 चंद्ररास मिथुन 07:09 पर्यंत व नंतर कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुनर्वसु 13:16 पर्यंत व नंतर पुष्य. गुरूवार 25 चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य 13:16 पर्यंत नंतर आश्लेषा. शुक्रवार 26 चंद्ररास कर्क 12:34  व नंतर सिंह. चंद्रनक्षत्र आश्लेषा 12:34 पर्यंत व नंतर मघा. शनिवार 27 चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा 11:18  पर्यंत व नंतर पूर्वा फाल्गुनी.

मंगळवार 23 रोजी ज्या एकादशी आहे.  बुधवार 24 भीमद्वादशी आहे.

गुरूवार 25 रोजी गुरूपुष्यामृतयोग आहे. शनिवार 27 रोजी माघस्नानसमाप्ती होत आहे.

वरील सर्व राशी नक्षत्रांचा विचार करून व रोजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

 

मेष :– 22, 23  व 24 रोजी ज्या क्षेत्रात काम करत असाल त्या क्षेत्रातील कामात तुम्ही माहीर असल्याचा रिमार्क वरीष्ठांकडून मिळेल. सुखाच्या कक्षा रूंदावतील. 25 व 26  रोजी गायक मंडळीना आपल्या कला सादर करण्याचे आमंत्रण मिळेल. महिलांना आवडत्या गोष्टींचा लाभ तर होईलच पण त्याचबरोबर या सप्ताहात सर्वच घटना आनंद देणार्‍या घडतील. 27 रोजी होणार्‍या चर्चेत महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत तुमच्या शब्दाला मान मिळेल. 21 रोजी मात्र खर्चाला आवर घालावा लागेल.

 

वृषभ :–21 रविवार हा दिवस चैन करण्यात व पाहुण्यांबरोबर गप्पांच्या मैफिलीत जाणाराने. प्रकृतीची कोणतीच काळजी करण्याचे कारण नाही. 22.व 23 रोजी चेहर्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी कधीही पार्लरमधे न जाणार्या मल. हिला पार्लरला जातील. मोबाईल सांभाळून ठेवावा लागेल हरवण्याचा धोका आहे. 24, 25  व 26  रोजी दळणवळणाच्या क्षेत्रातील मंडळींच्या व्यवसायातून चांगला लाभ होईल. टेलिफोन, पोस्ट या क्षेत्रातील मंडळीनी शिकाऊ उमेदवारांना शिकवावे लागेल. इंटर्नशिप करणार्‍यांना हार्ड वर्क करावे लागेल. बी . पी. ओ. तील कर्मचारी महत्च्याच्या संभाषणाक कन्फ्युज्ड होतील. मन शांत ठेवून काम करावे.

 

मिथुन :– 22 व  23 रोजी तुम्ही आपल्या आवडी निवडीना प्राधान्य द्या.  वयस्कर मंडळीना त्यांच्या आवडीचा सिनेमा नाटक पाहता येणार आहे. लहान मुलांकडून त्यांच्या लिला पाहून मोठी करमणूक होईल. 24.,25.व 26 रोजी आवडत्या नातलगांबरोबर राहण्याची संधी मिळेल. पेन्शनरना नातवंडांची इच्छा पूर्ण करता येणार आहे. कुटुंबात आईस्क्रिमचा बेत जमेल. 27 रोजी जाहिरात क्षेत्रात काम करणार्‍यांना लोकांच्या टिकेला सामोरे जावे लागेल. तरूणांना मनातील विचार व्यक्त करण्याची मस्त संधी मिळेल. 21 रोजी घरीच आराम करा. कोणाच्याही भानगडीत पडू नका मानसिक त्रास होईल.

 

कर्क :–24. ,  25  व 26 रोजी मनातील स्वत:विषयीच्या ठरवलेल्या गोष्टीना मूर्त रूप देता येईल. प्रेमाच्या नात्यात, व्यवहारात तुमच्या आवडीच्या गोष्टी घडतील. 27.रोजी कलाकार मंडळीना आपल्या कलेमुळे प्रसिद्धी मिळत असल्याचे जाणवेल व अचानक तुमच्याच नावाचा बोलबाला होईल. नोकरीत बदल करण्याची इच्छा असलेल्यांना आपल्याला जिल्ह्याबाहेर जावे लागत नसल्यामुळे आनंद होईल. तरूणांकडे आईवडीलांचे रहाण्याचे निछ्चित होईल. 22 व 23 रोजी आश्रमशाळेत नेकरी करणार्‍यांना खूप मोठी जबाबदारी पेलावी लागेल. सरकारी बँकेच्या कर्जाबाबतीत बेफिकीर राहू नका. 21  रोजी वडील भावंडाच्या मताला मान देऊन कामे करावी लागतील. 27  रोजी भव्यदीव्य विचाराच्या आदरणीय व्यक्तीबरोबर भेट होईल व त्यांच्या विचाराने भारावून जाल.

 

सिंह :–27 .रोजी नोकरीत तुम्हाला आज स्पेशल अधिकार दिले जातील. तरी त्याचा वापर पूर्ण विचारानेच करा. तुमच्या प्रतिकारशक्तीचा  अंदाज येईल व तुम्ही खूष व्हाल.  24,  25  व 26  रोजी शिक्षकांना विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून गुणांकनासाठी कांही वेगळा विचार करावा लागेल. आँन लाईन शाळेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक ताणाचा विचार करण्याची तुमची भूमिका मोठी ठरेल.  ज्यांच्या पायाचे, गुडघ्याचा दुखणे वाढले आहे त्यांनी 22  व  23 रोजी डाँक्टरांच्या म्हणण्यानुसार लांबलेल्या  आँपरेशनची विचार करावा.

 

कन्या :–21 रोजी विद्यार्थ्यांना, तसेच अध्यात्मिक क्षेत्रातील अभ्यासकांना  गुरुवर्यांकडून मोलाचे व महत्वाचे मार्गदर्शन घडेल. न्यायालयातील कामकाजाबाबत ओळख लावू नका लावल्यास  तुम्हाला मानसिक त्रास होईल. 22 व  23 रोजी नोकरीतील बदलीसाठी चा प्रयत्न यशस्वी होत असल्याचे कळेल. 24 , 25   व 26 या तीन दिवसांच्या दरम्यान वैवाहिक जीवनात निर्माण झालेला दुरावा दूर करण्याचा स्वत:हून प्रयत्न करावा अन्यथा  27 रोजी वैवाहिक वादाचे प्रकरण वाढत असल्याचे जाणवेल. मध्यस्थी घेऊ नका.

 

 

तूळ :–27.रोजी मित्रमंडळींच्या पाठींब्याने व आर्थिक मदतीने व्यवसायास सुरूवात करण्याचे ठरवाल. 24 , 25 ,व 26  रोजी  कर्तव्यापेक्षा नाते महत्वाचे ठरवून कृती कराल. पतीपत्नीच्या नात्यात आनंदाला पारावार उरणार नाही  न्यायालयातील कामकाजात आपण कमी पडल्याची भावना 22 व 23 रोजी वकील मंडळीना जाणवेल व मानसिक खेद वाटेल. चाळीशीच्या महिलांनी मासिक पाळीबाबतचे कोणतेच दुखणे अंगावर न काढता डाँक्टरांचा सल्ला घ्यावा. श्री गजाननाच्या उपासकांना दैवी शक्तीचा अनुभव येईल.

 

वृश्र्चिक :–22  व 23 रोजी रोडवरील वाहन अपघातापासून धोका संभवतो. तरी या दोन दिवसात वाहन चालवून प्रवास करूच नका. कोणतेही काम करून घेण्यासाठी भ्रष्टाचाराची मदत करू नका. पैसे वाया जातील व कामही होणार नाही. 24, 25  व 26 या तीन दिवसांच्या दरम्यान वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होईल. विवाहेच्छूंच्या विवाहाची बोलणी पुढे सरकतील. 27  रोजी होणार्‍या कुटुंबातील धार्मिक कार्यक्रमावर तुम्ही उगाच तोंडसुख घेऊ नका. स्वत:चेच हसे करून घ्याल.

 

धनु :–22 .व 23 .रोजी व्यवसायिक क्षेत्रात तुमचे व भागिदाराचे एकमत राहील. गुंतवणूक वाढीबाबत केलेला विचार फायद्याचा ठरेल. 24  25  व 26  रोजी टँवल्स कंपनीत काम करणार्‍याना चांगला फायदा होईल. अपत्याच्या बाबतीतील निर्णय घेण्यास आता विलंब लावू नका. 27  रोजी पूर्व पुण्याईने चांगली संधी चालून येईल. फक्त डाँक्टरांबरोबर एकदम ट्रान्सपर्न्ट रहावे लागेल. 21  रोजी महिलांना ओटीपोट व कंबरदुखीचा त्रास होईल.

 

मकर :–21 रोजी प्रथम संततीकडून अतिशय अतिशय आनंदाची बातमी कळेल. परगावी असलेल्या मुलांबरोबरील केलेला संवा फलद्रुप होईल. 22 व 23 रोजी ज्यांना आर्थिक कर्ज दिले आहे त्यांच्याकडून  लवकरच परतफेड करणार असल्याचा निरोप येईल. दळणवळण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा सन्मान होईल. 24, 25  व 26  रोजी वकील मंडळींच्या अशिलांना मनाला समाधान देणारा अनुभव येईल. सामाजिक स्तरावर प्रतिष्ठा वाढवणार्‍या घटना घडतील. 27 रोजी डाक्टर्स व सर्जन यांना मोठ्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेकरीता तयार रहावे लागेल.

 

कुंभ :–21  रोजी वृद्धाश्रमाशी संबंधित कामकाजाला सुरूवात कराल. समाजातील धनाढ्य मंडळींची मदत तुम्हाला सहजासहजी मिळणार आहे. 24 , 25  व 26  रोजी स्पर्धा परिक्षांचे क्लास चालवणार्‍या शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून चांगला सपोर्ट मिळेल. विद्यार्थ्यांची मेहनत वाढत असल्याचे जाणवेल. 27 रोजी ट्रँफीक कंट्रोलच्या क्षेत्रातील कर्मचार्‍यांना  अधिकार्यांच्या रोषास सहन करावे लागेल. कर्मचार्यांकडे संशयी नजरेने पाहिले जाईल. 22  व 23 रोजी लहान मुलांच्या कानाला दुखापत होण्याचा धोका आहे तरी त्यांच्या हातातील वस्तूकडे लक्ष द्यावे.

 

मीन :–21  रोजी आरोग्याबाबत पब्लिककडून पसरणाऱ्या अफवांवर विश्र्वास ठेवू नका. घरातील वयस्कर मंडळींच्या प्रकृतीची काळजी घ्या. 24, 25  व 26  रोजी नाटक सिनेमा क्षेत्रातील समिक्षक मंडळींवर टिकेचा भडीमार सोसावा लागेल. कुटुंबात आजोबांच्या वाढदिवसाचा निमित्ताने कार्यक्रम ठरेल. 22 व 23  रोजी वयस्कर मंडळीना उजव्या गुडघ्याचा त्रास वाढेल. पतिराजाना पत्नीकडून वाहन गिफ्ट केले जाईल. 27  रोजी नोकरीतील प्रमोशनची बातमी मिळेल.

|| शुभं-भवतु ||

 

One thought on “रविवार 21 फेब्रुवारी 2021 ते शनिवार 27 फेब्रुवारी 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *