daily horoscope

शनिवार 20 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शनिवार 20 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

शनिवार 20 फेब्रुवारी आज चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्र नक्षत्र रोहिणी 08:42  पर्यंत व नंतर मृगशीर्ष.

daily horoscope

आजचा दिवस अशुभ असल्याने कोणतीही महत्वाची कामे करू नयेत.

 

वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :– बँकेतील कर्मचार्‍यांना  बँकेतील कार्यक्रमाचे नियोजन करून ते फार पाडण्याची जबाबदारी स्विकारावी लागेल. राष्ट्रीय मालमत्तेचे संरक्षण करताना तुमच्या कामात कांही प्रमाणात अडचणी निर्माण होणार आहेत त्या अडचणींना तोंड देताना नाकी नऊ येतील.

 

वृषभ :–स्वभावातील कष्टाळूपणामुळे अंगावर इतरही बर्‍याच कामांची जबाबदारी येऊन पडेल. महिलांना अचानक ब्लडप्रेशरचा त्रास जाणवेल. महत्वाच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी मोठ्या माँल मधे जाण्याचे ठरेल.

 

मिथुन :–प्रकृतीच्या अस्वास्थ्यामूळे मानसिक ताण येईल. सख्खे शेजारी आणि मित्र यांच्यासाठी अचानक पार्टीचा बेत कराल व मोठ्या खर्चाला बळी पडाल. एवढा खर्च करून मनस्ताप होणार आहे तो वेगळीच डोकेदुखी. होईल.

 

कर्क :–व्यवसायातील लाभाचे वेगवेगळे मार्ग खुले होतील. आँनलाईनच्या व्यवसायाला तर मर्यादाच राहणार नाही. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांकडून होणार्‍या समाजोपयोगी कामात तुमची महत्वाची भूमिका असेल.

 

सिंह :–खाजगी कंपनीत काम करणार्‍यांनी आपण काम किती करत आहे याचे मोजमाप करू नये. विवाहेच्छूना आपल्या अपेक्षा व अटींना कांही प्रमाणात मर्यादा घालाव्या लागणार आहेत. बद्धकोष्ठतेचा त्रास असणार्‍यांनी त्रासामागच्या कारणांचा विचार करावा.

 

कन्या :–वृद्धाश्रमासाठी तुम्ही देणार असलेली मदत कारणी लागेल. ज्यांना घर भाड्याने द्यावयाचे आहे त्यांनी अती घाई करू नये. तुमच्या मनात असलेले व आलेले विचार स्पष्टपणे बोलल्यास कोणत्याही शंका राहणार नाहीत व नंतर अडचणी येणार नाहीत.

 

तूळ :–सध्याच्या परिस्थितीत इतरांना होणारा प्रकृतीचा त्रास बघून आपल्याला तर नाही झाले ना याची भिती निर्माण होईल. आँन लाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना परिक्षेची भिती निर्माण होईल. व्यावसायिकांना ही आजचा दिवस अतिशय काळजीचा जाणार आहे.

 

वृश्र्चिक :–आज राजकीय मंडळींकडून वादग्रस्त विधाने व्यक्त होतील व विरोधी पक्ष त्याचा बाजार करेल. पायाच्या दुखण्याकडे लक्ष न दिल्यास मनस्ताप सोसावा लागेल. कुटुंबातील ज्येष्ठांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल व त्याचे प्रमुख तुम्ही असाल.

 

धनु :–स्टेशनरीच्या दुकानदारांना व्यवसायातील झालेली त्रूटी भरून काढता येणार आहे. नवीन घरात भाड्याने रहायला जाणार्‍यानी दलालांवर विसंबून न राहता स्वत:  मालकांकडून माहिती घ्यावी. लहान मुलांचा पाय घसरून पडण्याची शक्यता मोठी आहे.

 

मकर :–व्यवसायातील झालेल्या जुन्या व्यवहाराचे पडसाद आता जाणवू लागतील तरी सावध रहावे लागेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांनी आपल्याला नक्की काय पाहिजे आहे हे ठरवावे व नंतरच त्यानुसार प्रयत्न करावेत.

 

कुंभ :–कुटुंबातील कटुता दूर होऊन एकोपा निर्माण होण्याचा दिवस आहे तरी तुम्ही पुढाकार घ्या. आर्थिक बाबतीत कुटुंबातील मतभिन्नतेवर उपाय सापडेल. राजकीय व्यक्तींना गुप्तशत्रूंचा त्रास कमी होत असल्याचे जाणवेल.

 

मीन :– तुमच्या ध्यानी मनी नसताना तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे. वडिलांकडील नात्यातून दुख:द बातमी कळेल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. तरूणांना पित्ताचा त्रास जाणवेल.

| शुभं-भवतु ||

 

One thought on “शनिवार 20 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *