daily horoscope

शुक्रवार 19 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शुक्रवार 19 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

शुक्रवार 19 फेब्रुवारी आज चंद्ररास मेष 09:39 पर्यंत व नंतर वृषभ. चंद्रनक्षत्र कृतिका 29:56 पर्यंत व नंतर रोहिणी.

daily horoscope

वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

 

आज रथसप्तमी 10:57 पर्यंत असून पुढे सुरू होणारी अष्टमी भीमाष्टमी या नावाने ओळखली जाते.

 माघ महिन्यातील शुक्ल अष्टमीला भीष्माच्या उद्देशाने जे तिलतर्पण व श्राद्ध करतील ते संततियुक्त होतील. असे हेमाद्रित पद्मपुराणात सांगितले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती. ( तारखेनुसार)

 

मेष :–आज कितीही काळजीपूर्वक वागले तरी कांहीतरी गडबड होणार आहे याची दखल घेऊनच सावचितपणे वागा. ज्या स्पर्धेच्या निकालाची आतुरतेने वाट बघत होता त्याचा निकाल येईल व तुमची सरशी होईल. व्यवसायातील आवक भरभराटीकडे वाटचाल करेल.

 

वृषभ :–जे जे हवे ते ते मिळण्याचा व मिळवण्याचा आजचा दिवस आहे. मनातील गुपितही सर्वांना उघडपणे सांगावेसे वाटेल. आँन लाईनच्या कार्यक्रमात तुम्हाला मुलांच्या सर्वागिण विकासावर बोलण्याची संधी मिळेल.

 

मिथुन. :–प्रथम संततीच्या बौद्धीक क्षेत्रातील कामगिरी बद्धल सर्वांकडून कौतुक होईल. नवीन घराचे पझेशन मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. आई वडीलांच्या इच्छेनुसार निर्णय घेतल्याने सर्व सुरळीत चालल्याचे जाणवेल.

 

कर्क :–पूर्वी घेतलेल्या शेअर्समधून चांगला नफा होईल. मानलेले भावाबहिणीचे नाते जगाला आदर्श घालून देईल. एखाद्या शासकिय वेबिनारच्य माध्यमातून सामाजिक आरोग्याविषयी व्याख्यान देण्याची तुमच्याकडे मागणी होईल.

 

सिंह :–तुमच्या चित्रकलेचे प्रदर्शन आयोजित करण्याचे ठरेल. महिलांनी काढलेल्या रांगोळ्या व चित्रे यांचेही कौतुक होईल. सायकल वरून दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील व त्याची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर येईल.

 

कन्या :–समोरच्याकडून तुम्हाला आज मानसिक त्रास होईल व त्याचा राग तुमच्याकडून दुसर्‍यावरच निघेल. खाजगी वाहनाने जाण्याचे आज टाळा. कामाचा ताणही  इतका वाढेल की तुम्हाला कांहीही सुचणार नाही. तरी शांत रहा.

 

तूळ :–कोणत्याही साथीच्या रोगापासून सावध रहा. विषारी किडा चावल्याने आजारपण येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यानी दुसर्यांबरोबर स्पर्धा न करता फक्त स्वत:च्या यशाकडे लक्ष द्यावे. शाळकरी मुलांनी आपल्या मनावर संयम ठेवण्याचा प्रयत्न करावा.

 

वृश्र्चिक :– मामाकडील नात्याची काळजी वाढेल. मामाचा लहरीपणा वाढेल. फळबागांतील उत्पन्नातून चांगली आर्थिक कमाई होईल. गर्भवती स्त्रीयांनी बाळंतपणाच्या तारखेचा गोंधळ घालू नये. डाँक्टरांचा सल्ला मानावा.

 

धनु :–गायक मंडळींचा घसा बसल्याने ठरलेला कार्यक्रम रद्ध करावा लागेल. पुरूषांनी उजव्या डोळ्याची व महिलांनी डाव्या डोळ्याची काळजी घ्यावी. वडिलांच्या व्यवसायाचे उत्तरदायित्व तुमच्याकडे देण्याचे सर्वानुमते ठरेल.

 

मकर :–दैनंदिन कामापेक्षा आज स्त्रीयांना जास्त कष्ट पडणार आहेत. कुटुंबातील वादग्रस्त विषयावर तोडगा काढण्याचे काम तुमच्यावर येईल. कुटुंबात धार्मिक गोष्टींचे नियोजन होईल.

 

कुंभ :–आजचा दिवस मनाला विशेष आनंद देणारा ठरेल. व्यवसायातील पूर्वीपासूनच्या प्रतिस्पर्ध्यांना  मागे टाकून तुम्हीच पुढे असल्याचे जाणवेल. महत्वाच्या कामासाठी तज्ञांचा सल्ला घेताना प्रथम सर्व गोष्टी स्पष्ट करा.

 

मीन :–परिक्षेपूर्वी आपलाच अभ्यास किती झाला आहे याचा विद्यार्थ्यांनी आढावा घ्यावा. शिकवणीवर विसंबून राहिलेल्यांनी अजूनही विचार करावा. व्यवसायातील गणिते वजाकडून जमेकडे वळतील. चामड्याच्या वस्तूंच्या व्यवसायात अचानक मोठी वृद्धी होईल.

| शुभं-भवतु ||

 

One thought on “शुक्रवार 19 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *