Read in
गुरुवार 18 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरुवार 18 फेब्रुवारी आज चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र भरणी 26:53 पर्यंत व नंतर कृतिका. आजचा दिवस चांगला असल्याने महत्वाची कामे करण्यास हरकत नाही.
वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– स्वत:विषयी असलेल्या अवास्तव कल्पनेला तडा जाईल. तुमच्या स्वभावातील अतीउत्साह कामाला यशाच्या मार्गावर घेऊन जाईल. व्यावसायिक क्षेत्रात पार्टनरविषयी मनात संशयी वृत्ती राहील. स्वत:च्या प्रतिकार शक्तीविषयीची खात्री पटेल.
वृषभ :–जवळच्या प्रेमाच्या व्यक्तीचा विरह जाणवेल. ज्या वादाच्या मुद्यामुळे पतीपत्नीमधे दुरावा आहे त्या वादावर अचानक पडदा पडणार आहे. अनपेक्षितपणे लहान मुलांकडून शहाणपण शिकण्याची संधी मिळेल व ती कामी येईल.
मिथुन :–राजकीय क्षेत्रातील पदाधिकारीना अपकीर्तिला तोंड द्यावे लागेल. घरातील पुरूष मंडळीना आनंद होणार्या घटना घडतील. किरकोळ धान्य दुकानदारांना व्यवसायाबाबत नामी कल्पना सुचेल. कोर्टामधील केसबाबत बेफिकीरी महागात पडेल.
कर्क :–सरकारी खात्यातील कर्मचारी स्वत:वर असलेल्या जबाबदारीविषयी अतिशय जागरूक होतील. मानसिक त्रास, आजार असलेल्या महिलांना सुरू असलेली उपचारपद्धती लागू पडण्यास जरा वेळ लागेल लगेच डाँक्टर बदलण्याचे विचार करू नका.
सिंह :–जे जून्या छताच्या घरात रहात आहेत त्यांनी छताबाबतची दुरूस्ती वेळेवर करून घ्यावी. इतरांनी आपल्या घरातील सिलींग फँनबाबत जागरूक रहावे. उच्चशिक्षणाच्या प्रवाहातील विद्यार्थ्यांना अवघड परिस्थितीला तोंड द्यावे लागेल.
कन्य :–महिलांच्या एखाद्या विषयाबाबत सुरू असलेल्या चळवळीचा चांगला उपयोग होत असल्याचे जाणवेल. लाचलुचपत विरोधी पथकाकडून एखादी मोठी घटना उघडकीस येईल. ग्रामीण भागातील लहान मुलांच्या आरोग्या चा प्रश्र्न ऐरणीवर येईल.
तूळ :–कोणत्याही निवडणूकीचा उभे राहण्याचा निर्णय आज घेऊ नका. एखाद्या स्पर्धेतील निकाल तुमच्या बाजूने लागल्याने आनंदोत्सव होईल. खाजगी हाँस्पिटलमधील डाँक्टर्सना कामाचा ताण अचानक वाढेल. प्रथम संपत्तीबाबत आनंदाच्या घटना कळतील.
वृश्र्चिक :–महिलांनी आज स्वयंपाकघरातील पसार्याचे काम अजिबात काढू नये. पडण्या लागण्याचा धोका आहे. वृद्धाश्रमातील मँनेजर कडून एखादी अतिशय उल्लेखनीय व कौतुकाची बाब घडेल. मुलीच्या विवाहाची बोलणी आज पुढे सरकणार आहेत.
धनु :–मोठ्या माणसांनी ठरवलेला सहलीचा बेत फसणार आहे. आज प्रवास करणार असाल तर वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे लागेल. तरूण वर्गास आज चैन, मौजमजा करण्याची इच्छा निर्माण होईल. आईकडील नातेवाईकांचे आगमन होईल.
मकर :–जाहिरातीच्या क्षेत्रात काम करत असलेल्यांना हातातील काम वेळेवर न झाल्यामुळे नुकसान सोसावे लागेल. वार्ताहर व संपादकांना बातमीतील चुकीबद्दल माफी मागावी लागेल. प्रेमाच्या नात्यात अपेक्षांचे ओझे वाढल्याने नात्यात दुरावा निर्माण होईल.
कुंभ :–आजचा दिवस तुम्हाला अतिशय त्रासदायक जाणार जाणाराने सर्वच बाबतीत जागरूक रहावे लागेल . महसूल विभागात काम करणार्यांना लोकांचा रोष ओढवून घ्यावा लागेल. चेहर्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी केलेल्या पार्लरमधील उपायाची रिअँक्शन येईल.
मीन :–कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. दवाखान्यात अँडमिट असलेल्यांना आराम पडू लागेल पण डिसचार्ज मिळणार नाही. वयस्कर मंडळीना अंगदुखी व ताप येण्याची शक्यता आहे. आज सोशल मिडीयातून अफवा पसरण्याचा धोका आहे.
| शुभं-भवतु ||
Thank you Tai