daily horoscope

बुधवार 17 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in
बुधवार 17 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

बुधवार 17 फेब्रुवारी आज चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अश्र्विनी 23:47 पर्यंत व नंतर भरणी.

daily horoscope

आजचा दिवस अशुभ असल्याने महत्वाची कामे करू नयेत.

वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–आजचा दिवस अतिशय आनंदात, उत्साहात व सुखात जाणार आहे. आता कोणता आनंद कोणत्या सुखातून घ्यायचा ते तुम्हालाच ठरवायचे आहे. अचानक धनलाभ ही होणार आहे. मित्रपरिवाराबरोबर आवडत्या प्रकारचे चमचमीत जेवणाचा बेत होणार आहे.

 

वृषभ :–मनातील इच्छा प्रत्यक्षात पूर्ण होणार आहेत त्यामुळे आता कोणत्या इच्छांना महत्व द्यायचे ते नक्की करा. अध्यात्मिक अभ्यासकांना एखादी सिद्धी प्राप्त झाल्याचे जाणवू लागेल. आजच्या दिवशी निर्माण होणारा वाद भांडणाकडे नेणार आहे.

 

मिथुन :–शारिरीक कष्टाची सवय नसल्याने थोड्याशा कष्टाने सुद्धा अंगदुखी होणार आहे. जराशी कणकणही जाणवेल. कारण नसताना मित्रांच्या संगतीने खाण्याचा व पिण्याचाही मोह आवरणार नाही पदरचा खर्चही कराल व घरच्या मोठ्यांकडून शिव्यापण खाल.

 

कर्क :–ऐंश्र्वर्य म्हणजे काय याचा अर्थ कळू लागेल. आवडत्या वस्तूंचा मोह आवरणार नाही  व मोठ्या उत्साहाने खरेदी कराल. कोणत्याही अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास करू नये कारण प्रवासात डोक्याला त्रास होणार्‍या घटना  घडतील.

 

सिंह :–तुमच्या कडून दुसर्‍याला त्रास होणारी घटना घडणार आहे. तरी आज दुसर्‍यांच्या बाबतीत कोणतेही काम करताना विचार करूनच करा. आज अचानक होणारा धनलाभ अविस्मरणीय असणार आहे. तुम्ही हातात घेतलेले काम सुरवातीला बिघडेल व मार्गदर्शनाने मार्गावर आणण्याचा प्रयत्न करा.

 

कन्या :–नोकरी मधे तुमच्यावर असलेली जबाबदारी पाळण्यात तुमच्याकडून कुचराई होणार आहे. व त्यासाठी बाँसकडून आहेरही मिळणार आहे. अगदी जवळच्या मित्रांसाठी जामिन रहावे लागेल व त्याविषयीचा विचार करायलाही वेळ मिळणार नाही.

 

तूळ :– बाहेर फिरायला जात असाल तर उंचावर जाउ नका. उंचावरून पडण्याची भिती आहे. पुरूष मंडळीना पत्नीला घरच्या कामात मदत करावी लागणार आहे. शक्यतो स्वयंपाकात मदत कराल व नवीन पाककृती बनवाल.

 

वृश्र्चिक :–महिलांनी भाजी चिरताना, कापताना लक्ष देउन काम करावे. कापले जाउन रक्तस्राव होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत केलेल्या अभ्यासाचे रिवीजन करताना बराच भाग येत नसल्याने मानसिक धक्का बसेल घरच्यांकडून ओरडाही बसेल.

 

धनु :–कोणत्याही बाबतीतील विरोधासाठी तुम्ही विरोधाला विरोध करू नका प्रकरण जास्त चिघळेल. व्यवसायातील उधारी वसूल करण्यासाठी तुम्ही वापरलेल्या युक्तीचा फायदा होईल. लहान मुलांचा हट्ट पुरवावा लागेल.

 

मकर :–शालेय विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखून यशासाठी अभ्यासात प्रगती केल्यासच यश मिळेल. सरकारी नोकरदार वर्गास कामाचा बोजा वाढल्याने स्वभावात चिडचिड वाढेल. महिलांच्या मनाला स्पर्श करणार्‍या घटना घडतील.

 

कुंभ :–तुमच्याकडून दुखावला गेलेला जवळचाच मित्र किंवा मैत्रिण सर्वांसमोर अपमान करेल. औषधांच्या दुकानात काम करणारे स्वत:ला डाँक्टर समजून इतरांना औषधे सुचवतील. वयस्कर मंडळीना जून्या मित्रमैत्रिणींकडून छानशी भेट मिळेल.

 

मीन :–ट्रेकींग, माउंटेनिअरींग करणार्यांना आजपर्यंतच्या अनुभवाचे किस्से मुलांना सांगता येणार आहेत. डाँक्टर्सना वेबिनारच्य माध्यमातून समाजाशी संवाद साधून आरोग्याविषयी प्रबोधन करता येणार आहे. महिला घरातील मंडळीना घराच्या स्वच्छतेची कामे वाटून देतील.

| शुभं-भवतु ||

 

One thought on “बुधवार 17 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *