Read in
मंगळवार 16 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 16 फेब्रुवारी चंद्ररास मीन 20:55 पर्यंत व नंतर मेष. चंद्र नक्षत्र रेवती 20:55 पर्यंत.
आज वसंत पंचमी. आजचा दिवस शुभ असल्याने महत्वाची कामे करण्यास हरकत नाही.
वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–ज्याना परदेशी नोकरीचा काँल आला आहे त्यांनी आता विचार करण्यास हरकत नाही. व्यवसायात हाताखालील लोक बंडखोरी करण्याच्या विचारात राहतील. चित्रकार मंडळी एकदम प्रसिद्धीच्या झोतात येतील.
वृषभ :–एखाद्या निवडणूकीचा विचार कराल. सौंदर्यप्रसाधनाच्या उद्योगातून चांगली प्राप्ती होईल. महिलांना हरवलेले सुख परत मिळण्याचे संकेत मिळतील. लहान बहिणीकडून मोठ्या भावाला शिक्षणात मदत मिळेल.
मिथुन :–स्वभावातील आळशीपणा कमी होऊ लागेल. विद्यार्थी अभ्यासाच्या प्रेशरने मानसिक टेन्शन घेतील. खाजगी क्षेत्रातील हिशोबनीसांना आर्थिक घोटाळ्याचा अंदाज येणार आहे त्यांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी.
कर्क :–ज्या धार्मिक स्थळी जायचे ठरले आहे तेथील सर्व माहिती बारकाईने घ्यावी. अध्यात्मिक प्रगतीसाठी श्री गुरूमाऊलीचे मार्गदर्शन मिळेल . मनातील विचारांवर मात करण्याचा प्रयत्न कराल. ज्येष्ठांच्या विचाराने निर्णय घेतल्याशिवाय कोणतेही काम करू नये.
सिंह :–घाईने आँपरेशनची घाई केल्यास नुकसान होणार आहे. तरी तुमच्याकडून घाई करू नका. अजाणतेपणी तुमच्याकडून पैशाचा व्यवहार होईल व तो तुम्हाला त्रासदायक राहील. कोणत्याही प्रकारचा जुगार होऊ देऊ नका.
कन्या :–द्वितीय संततीकडून आनंदाच्या बातम्या कळतील. आँन लाईन शिकवणार्या विद्यार्थ्यांना मागची पाटी कोरी असल्याचे जाणवेल. संशोधनाचा अभ्यास करणार्यांना हा कालावधी अतिशय लाभदायक ठरणार आहे.
तूळ :– ज्यांना अपचनाचा त्रास आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी. स्वत:च्या मनातील विचार जोडीदाराबरोबर चर्चा करून सोडवा. कोर्टकचेरीच्या कामातील अडथळे दूर होतील. अचानक जवळच्या मित्रासाठी जामिन रहावे लागेल.
वृश्र्चिक :–वेगवेगळे छंद असलेल्या क्षेत्रात तुम्हाला कौतुकास्पद काम करता येणार आहे. स्वत:च्या चित्रांचे व पेंटींग चे प्रदर्शन भरवण्याचे निश्र्चित कराल. घरामध्ये नव्याने आलेला पाळीव प्राणी पळून जाण्याचा धोका आहे तरी काळजी घ्यावी लागेल.
धनु :–आईला आवडणार्या गोष्टी तुमच्याकडून घडणार आहेत. अचानक सासरेबुवांचे आजारपण निघेल. फुलबागेची निगा राखण्यात यश मिळवाल. निसर्गाच्या चमत्कारापुढे जाण्याचा प्रयत्न कराल. लहान मुलांच्या दातांना दुखापत होण्याची मोठी शक्यता आहे.
मकर :–वार्ताहर मंडळीनी आपली जबाबदारी ओळखून वागावे. राजकीय क्षेत्रातील बातमी बाबत तुम्हाला (संपादकांना) जबाबदार धरले जाईल. शारिरीक कष्टामुळे महिलांना आजचा दिवस नकोसा होणार आहे. मन: शांतीसाठी प्राणायाम करा.
कुंभ :–आजच्या सकाळच्या अनुभवावरून तुम्हाला विचार करण्याची पद्धत बदलावी लागेल. स्त्रियांना घसा व स्वरयंत्राबाबत चा त्रास होईल तरी डाँक्टरांचा सल्ला घ्यावा. तरूण व्यावसायिकांनी घेतलेले कर्ज सध्या फेडता येत नसल्याचा अर्ज बँकेला द्यावा.
मीन :–महिलांच्या स्वभावातील हौशीपणात वाढ झाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. राजकीय क्षेत्रातील मंडळीना अचानक अहंपणा येईल. सामाजिक स्तरावर कार्य करत असताना आर्थिक कमतरता होईल.
| शुभं-भवतु ||
Thank you Tai