Read in
सोमवार 15 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 15 फेब्रुवारी आज चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा.
आज विनायक चतुर्थी आहे. माघ महिन्यातील श्री गणेश जयंती आहे. आजचा दिवस दुपारी 02:43 पर्यंत शुभ असल्याने महत्वाची कामे दुपारपर्यंतच करावीत.
वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आज सकाळपासूनच कामाची घाईगर्दी होणार आहे. तरी कामाचे योग्य नियोजन केल्यास बर्यापैकी कामे सुरळीतपणे पार पडतील. आजारी मंडळीना आज आपली तब्बेत सुधारत असल्याचे जाणवेल. प्रामाणिकपणाने वागलेल्या कर्मचार्यांना अचानक पगारात वाढ होणार असल्याचे कळेल.
वृषभ :–गुणी व वर्षभर शिस्तीने वागलेल्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल व परिक्षेची भिती दूर होईल. वयस्कर मंडळीना लहानश्या प्रवासानेही दमायला होईल. लेखकांना लेखनासाठी नवीन विषय मिळतील व लिहीलेल्या लेखनासाठी प्रकाशक मिळतील.
मिथुन :–व्यवसायातील कांही गणिते चुकत चालल्याचे जाणवेल. महत्वाच्या कामासाठी दूरच्या नातेवाईकांना मदत करावी लागेल व प्रसंगी स्वत:चा वेळही द्यावा लागेल. लहानसहान गोष्टींवरून पतीपत्नीमधे गैरसमजाचे वारे वाहतील.
कर्क :–कांही गंभीर विषयावरील चर्चा कौटुंबिक वातावरणात व हसतखेळत पार पडतील. महिलांकडून महिन्याचे आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करून दाखवतील. विद्यार्थ्यांनी परिक्षेची तयारी जोरात सुरू करावी. वयस्कर मंडळीना जूने मित्र भेटतील.
सिंह :– ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना आजच्या दिवशी अविस्मरणीय प्रसंगाचा अनुभव येईल. पतीपत्नीच्या भागिदारीच्या व्यवसायात नव्याने गुंतवणूक करण्याची गरज निर्माण होईल. महिलांना गेल्या वर्षीचे बेस्ट परफाँर्मन्सचे अँवाँर्ड मिळेल.
कन्या :- तरूणांना नवीन प्रोजेक्टविषयी विचारले जाईल. कलाकार मंडळींचे नांव मोठ्या पडद्यावरील कामासाठी निवडले जाईल. पुरूष मंडळीना दवाखान्यासाठी मोठा खर्च करावा लागेल. महिलांना गर्भाशयाचा होणारा त्रास कमी होत असल्याचे जाणवेल.
तूळ :–तुमच्या एकट्याच्या मालकीचा व्यवसाय असेल तर आज तुमचे नोकर तुम्हाला मानसिक त्रास देणार आहेत. काँप्युटरवर काम करणार्यांना नेटवर्कचा प्राँब्लेम त्रासदायक ठरेल. ट्रेडिंग करणार्यांना पण हाच त्रास होईल व त्यामुळे आर्थिक नुकसान होईल.
वृश्र्चिक :–राजकीय घडामोडींचा परिणाम तुमच्या कामावर होऊ देऊ नका. बर्याच कालावधीपासून तुमच्याकडे असलेली नेतृत्वाची जबाबदारी काढून घेण्यात योणार असल्याची बातमी मिळेल. वैयक्तिक आयुष्यातील कोणत्याही सिक्रेटची चर्चा करू नका.
धनु :–पुरूष मंडळीना सासुरवाडीकडून व्यवसायासाठी मोठी मदत मिळेल व गावाकडील असलेल्या शेतीतीलही वाटा मिळेल. खाजगी क्षेत्रातील अधिकारी वर्गाने आपल्या अधिकाराचा योग्य वापर करावा. घर भाड्याने देत असाल तर घाई करू नका.
मकर :–आज प्रत्येक कामातून आनंद निर्माण होणार आहे. डाँक्टर्स मंडळीना अचानक गुंतागुंतीच्या केसला सामोरे जावे लागेल. मनातील कोंडलेल्या प्रश्र्नांना आज बाहेर काढणे तरूणांना अवघड जाईल. कलाकार मंडळींचे मनोधैर्य वाढणार्या घटना घडतील.
कुंभ :–तुम्हाला त्रासदायक असणार्या व वाटणार्या गोष्टींची तुमची भिती आज आपोआप कमी होईल व आत्मविश्वासात वाढ होईल. सरकारी कर्मचारी वर्गास कांही विशेष सवलती मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. तुमच्या क्षेत्रांतील तुमचे प्रतिस्पर्धी अचानक माघार घेणार आहेत.
मीन :– सकाळपासूनच आज कामाची लीस्ट तुमच्या हातात पडणार आहे. कंपनीच्या सेक्रेटरीजना साहेबांच्या कामाची दिशा आज गोंधळवून टाकणारी ठरेल. इंटरनॅशनल काँलवरील मेसेज मुळे कांही गोष्टीत स्पष्टता येईल.
| शुभं-भवतु ||
Thank you Tai