Read in
रविवार 14 फेब्रुवारी 2021 ते शनिवार 20 फेब्रुवारी 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य
रविवार 14 चंद्ररास कुंभ 10:18/ पर्यंत व नंतर मीन. चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा 16:32 पर्यंत व नंतर उत्तरा भाद्रपदा.
सोमवार 15 चंद्ररास मीन अहोरात्र व चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा 18:27 पर्यंत व नंतर रेवती. मंगळवार 16 चंद्ररास मीन 20:55 पर्यंत व नंतर मेष. चंद्र नक्षत्र रेवती 20:55 पर्यंत व नंतर अश्र्विनी. बुधवार 17 चंद्ररास मेष अहोरात्र व चंद्रनक्षत्र अश्र्विनी 23:47 पर्यंत व नंतर भरणी . गुरूवार 18 चंद्ररास मेष अहोरात्र व चंद्रनक्षत्र भरणी 26:53 पर्यंत व नंतर कृतिका. शुक्रवार 19 चंद्ररास मेष 09:39 पर्यंत व नंतर वृषभ. चंद्रनक्षत्र कृतिका 29:56 पर्यंत व नंतर रोहिणी. शनिवार चंद्ररास वृषभ अहोरात्र व चंद्रनक्षत्र रोहिणी अहोरात्र.
सोमवार 15 ला श्री गणेश जयंती. यालाच तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात. याच दिवशी भाद्रपदातील चतुर्थी प्रमाणे श्री गणेशोत्सव केला जाते.
मंगळवार 16 ला वसंतपंचमी, श्री पंचमी. शुक्रवार 19 ला रथसप्तमी, या लाच भीमाष्टमी असेही म्हणतात.
पुढील दिवस शुभ असल्याने महत्वाची कामे करायला हरकत नाही. :—-14 रविवार., 15 सोमवार 14:43 पर्यंतच शुभ. मंगळवार 16, गुरूवार 18 .
वरील सर्व राशी नक्षत्रांचा विचार करून व रोजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–14 चा रविवार अविस्मरणीय राहील. जून्या भेटीगाठी व मित्रमंडळींचा सहवास अतिशय आनंददायी राहील. पतीपत्नीमधील प्रेम वृद्धींगत होत असल्याचे जाणवेल. 17, 18, व 19 या तीनही दिवसात तुमच्या सानिध्यात आलेले लोक तुमचे कौतुक करतील. इतरांकडून दिला गेलेला मानसन्मान यामुळे कांहीसा अहंपणा निर्माण होईल. 15, 16 रोजी अचानक चर्चेतून वाद निर्माण होईल. व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याचे ठरेल व त्यादृष्टीने काय करायचे याचे नियोजन कराल. 20 रोजी चा दिवस अनपेक्षितपणे धामधुमीचा जाईल.
वृषभ :–14 रोजी दत्तक पुत्र व वडील यांच्यात अतिशय प्रेमाचे व आनंदाचे वातावरण राहील. नवीन योजना घरातील वातावरणात सकारात्मक बदल होईल. 15, 16 .रोजी लेखक व कवीना आपले पुस्तक प्रकाशन करण्यासाठी प्रकाशकाबरोबर बोलणे होईल. 17.,18.,व.19 रोजी नियोजित कामाऐवजी दुसर्याच कामाला प्राधान्य द्यावे लागेल. घरातील स्वच्छता करताना लहान मुलांना टोकदार वस्तूने जखम होण्याचा धोका आहे. जवळच्या नाश्त्यासाठी फौजदारी खटल्याकरीता वकीलबुवांची भेट घ्यावी लागेल. 20 रोजी एखाद्या कार्यक्रमाचे नेतृत्व स्विकारावे लागेल.
मिथुन :–14 रोजी वयस्कर मंडळीना तरूण वर्गाकडून सुखाचे क्षण मिळतील. मंदीराच्या पुजारीना., ज्योतिषीना आध्यात्मिक क्षेत्रातील आश्र्चर्यकारक अनुभव येईल. 17.,18.व 19 रोजी पतीपत्नीमधे फारसे ट्युनिंग जमणार नाही तरी उगाच एकमेकांकडून अपेक्षा करू नयेत. 20 रोजी ज्येष्ठांनी तरूणांच्या हिताचा विचार करून आपले स्पष्ट मत मांडावे. गुंतवणूक करण्याऐवजी पैसे काढण्याचा विचार करा. 15 व 16 रोजी महिलांना उद्योगाची दिशा सापडेल. निवृत्त झालेल्या ज्येष्ठ मंडळींना एखाद्या सामाजिक कामात भाग घ्यावा लागेल.
कर्क :– 14 रोजी मित्रमैत्रिणींच्या मदतीने वैवाहिक जीवनातील कुरबुरीवर समाधानकारक उपाय निघेल व आनंद निर्माण होईल. 17, 18 व 19 रोजी राजकारणातील डावपेचावर गहन चर्चा कराल. नोकरीमध्ये खालचे अधिकार बदलून नविन अधिकार व जबाबदारी सोपवली जाईल. 20 रोजी आजारी व अँडमिट असलेल्यांची सुटका होईल. पोलीस स्टेशनला डांबून ठेवलेल्याना आज सोडून देतील. 15 व 16 रोजी वयस्कर मंडळीना तिर्थयात्रेचे वेध लागतील. व जे कांही मिळते ते पूर्वपुण्याईनेच मिळते असा सूर लावतील.
सिंह :–नुकतीच व्यवसायात अचानक घेतलेली उडी चांगलीच फायदेशीर पडल्याचे 20 ला कळेल व आत्मविश्वासात वाढ होईल. 15 व 16 रोजी तुमचे विवाहाबाबतचे विचार पक्के होतील विवाहित पति-पत्नीच्या सहविचाराने एखादा मोठा व्यवहार ठरवतील. 14 रोजी गर्भाशयाच्या मोठ्या दुखण्यातून मुक्त व्हाल व मनावरचे टेन्शन कमी होईल. 17, 18 व 19 रोजी कुटुंबातील वाढदिवसाच्या नि ित्ताने एकत्र समारंभ साजरा होईल.
कन्या :–17, 18 रोजी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या पूर्वपुण्याईमुळे संकटातून वाचाल. 19 ला प्रवास करू नका. व संवत: वाहनही चालवू नका. लहान मुलांना उंचावरून पडण्याचा धोका आहे.19 व 20 रोजी न्यायालयीन बाबी तुमच्या बाजूने होतील तसेच भरपाई मंजूर होईल. 14 रोजी सकाळी उठल्या उठल्या तुमच्या अकाउंटमधे येणारे पैसे जमा झालेले असतील. 15 व 16 रोजी गावी जाण्याचा बेत केलेल्यांना मनस्ताप होईल. सरकारी कामातून जराही सूट मिळणार नाही.
तूळ :–14 रोजी शाळकरी मुलांना व वयस्कर मंडळीना शब्दकोडी लवकर एकदम बरोबर सुटतील व आनंद होईल. लेखक व नाद्यलेखन करणार्यांचे विशेष कौतुक होईल. 17 18 व 19 नेते व कार्यकर्ते निवडणूकीचा विचार करतील. नव्याने आखणी करतील. 20 रोजी वकील मंडळीना आपले अधिकार वापरताना अहंपणा येईल.तुम्ही जर कोणासही कर्ज दिले असले तर 15 व 16 रोजी त्यांच्याकडे मागितल्यास लवकर मिळण्याची सोय होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीतील असलेले अडथळे दूर होतील.
वृश्र्चिक :–14 .रोजी सार्वजनीक ईमारतीमधील तुमच्या क्लेम बाबत गोंधळ निर्माण होईल. सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील. 20 रोजी आईवडीलांना प्रथम संतती पासून आनंदाची बातमी मिळेल. ऐच्छिक सेवानिवृत्तीची संधी मिळणार आहे. तरी योग्य विचार करूनच निर्णय घ्या. 17 , 18 व 19 रोजी तुम्ही ज्या स्पर्धेमध्ये सहभागी झाला असाल त्यात विजयी व्हाल. कामगार वर्गास थटलेला पगार मिळेल. 15 व 16 रोजी सिनेमा, नाटक कलाकारांना नवीन कामाच्या संधी मिळण्याचे संकेत मिळतील. गुरूतुल्य व्यक्तीकडून तुमचे नांव सुचवले जाईल.
धनु :–15 व 16 रोजी पतीपत्नीच्या व्यवसायातील अडचणींवर मार्ग सापडेल व त्यानुसार नियोजन कराल. पाठीच्या मणक्याचे आँपरेशन झालेल्यांनी बेफिकीरीने वागल्यामुळे होणारा त्रास सहन करावा लागेल. अती आत्मविश्वासाने नुकसान होते हे लक्षात घ्या. 20 रोजी व्यवसायासाठी कर्जाची सोय करत असल्यास बँकेकडून तुम्हाला चांगली मदत मिळणार आहे. 14 रोजी विद्यार्थ्यांना सकाळपासूनच स्वत:च्या कामाकडे लक्ष द्यावे लागेल. 17 , 18 व 19 बालसंगोपन केंद्रासाठी तुमच्याकडून खूप मोठे काम होणार आहे.
मकर :–14 रोजी महिला सुंदर दिसण्याच्या प्रयत्नात स्वत:चे सौंदर्य बिघडवून घेतील. प्रेमाच्या व्यवहारात अडचणी निर्माण होतील तरी समजूतीने घ्यावे लागेल. 17, 18 व 19 निद्रानाशाचा त्रास असलेल्यांना मेडीटेशनचा चांगला उपयोग होईल. ज्येष्ठ व्यक्तींकडून मेडीटेशन चे मार्गदर्शन मिळेल. 20 रोजी अद्भूत व अचंबित करणारा अनुभव येईल व त्यामुळे सद्गुरूंवरील विश्र्वास व श्रद्धा वाढेल. 15 व 16 रोजी घरातीतच ठेवलेला पासपोर्ट सापडणार नाही पण पँनिक होउ नका. घरातच सापडेल.
कुंभ :–14 रोजी विद्यार्थ्यांना शिक्षकांनी नेमून दिलेल्या टीमचे नेतृत्व करावे लागेल व 19 रोजी रिपोर्ट सादर करावा लागेल. 17 व 18 रोजी कुरीयरने पाठवलेले पार्सल वेळेवर मिळणार नाही गहाळ झाल्याचे कळेल. 19 व 20 रोजी वर्षभराचे नियोजन कसे करावे याच्या नियोजनाच्या कार्यशाळेला हजर राहता येणार आहे. 15 व 16 रोजी चेहर्याचे सौंदर्य टिकवण्यासाठी फारच जागरूक होतील. ब्युटीपार्लरचा व्यवसायही या दिवसात जोरात चालेल.
मीन :–15 व 16 रोजी मनातील ईच्छा व्यक्त करण्याचे धाडस निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी आपल्याला माहित नसलेल्या गोष्टी माहित असल्याचा आव आणू नये. 17, 18, व 19 रोजी मानसिक त्रास होणार्या घटना घडतील. कुटुंबात प्रथम ज्येष्ठ मंडळींची सोय बघताना काही महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होईल. 20 रोजी हस्ताक्षर स्पर्धेत तुमचा नंबर येईल व कँलिग्राफी शिकण्याची संधी मिळेल. 14 रोजी कुटुंबिय., मित्र, व शेजारी यांच्याकडून कौतुकाचे शब्द मिळतील.
|| शुभं-भवतु ||
Thank you Tai