Read in
शनिवार 13 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 13 फेब्रुवारी आज चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र शततारका 15:10 पर्यंत. आजचा दिवस शुभ असल्याने महत्वाची व आवडती कामे करून घ्या.
वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– आज ज्यांच्या वैवाहिक जीवनात बिनसलेले आहे किंवा कोणत्याही प्रकारचा बिघाड निर्माण झालेला असेल त्यांनी पुनर्मिलनासाठी प्रयत्न करावा निच्छितच तुम्हाला यश येणार आहे. नोकरीतील नवीन प्रोजेक्टविषयी मनापासून केलेली चर्चा फलद्रुप होईल.
वृषभ :–नोकरीत प्रमोशनची चर्चा सुरू होईल व त्याचबरोबर बदली बाबतचे वारेही वाहू लागतील. प्रथम संततीच्या प्रकृतीची काळजी करावी लागेल. वडिलांच्या प्रकृतीची काळजी वाढवणार्या घटना घडतील. कुटुंबात कर्तव्याला जास्त महत्व द्यावे लागेल.
मिथुन :–सेवाभावी वृत्तीने काम करणार्यांना आत्मिक सुख मिळेल. प्रवास करू नका. मोठ्या संकटाची शक्यता आहे. संशोधन क्षेत्रातील काम करणार्यांचे अतिशय कष्ट वाढतील. पित्त प्रकृतीच्या मंडळीना पित्ताचा त्रास जाणवेल. वडिलांकडून मिळणार्या सूचनांवर विचार करा.
कर्क :–आजपर्यंत टाळलेले आँपरेशन लवकरच करावे लागणार आहे हे लक्षात घ्या. आर्थिक व्यवहार करताना सांभाळून करावेत. निवृत्त कर्मचार्यांना प्राँव्हीडंट फंडाची लेट झालेली रक्कम मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. राजकीय मंडळीना मानहानीला सामोरे जावे लागेल.
सिंह :– डाँक्टर मंडळींकडे येणार्या पेशंट्सना मानसिक समाधान व शारिरीक आराम मिळेल. दत्तक पुत्र कडून असलेल्या तुमच्या अपेक्षा पूर्ण होण्याचे संकेत मिळतील. लहान मुले व वयस्कर मंडळीना स्टुलावरून किंवा पलंगावरून पडण्याचा धोका निर्माण होईल.
कन्या :–पुन्हा पुन्हा आजारी पडणार्यांनी प्रकृतीची पूर्ण तपासणी करून घ्यावी. आज कोणतेही काम करण्यास दिवस चांगला असल्याने घराबाबतचे राहिलेले काम करून घ्यावे. कुटुंबात जून्या मित्रमैत्रिणींचे आगमन होईल. सरकारी योजनांतून मिळणारे लाभ लवकर पदरात पडणार नाहीत.
तूळ :–प्रथम संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. शालेय विद्यार्थ्यांना सोप्या वाटणार्या महत्वाच्या विषयातच सर्वात कमी मार्क पडतील. बँकेतील कर्मचार्यांना कामाचे बर्डन वाढेल व खाते धारकांकडून त्रास होईल.
वृश्र्चिक :–शाळा काँलेजमधील प्रवेशाबाबत झालेला गोंधळ पुन: नव्याने गडबड करेल व मानसिक त्रास वाढेल. महिलांना प्रकृतीबाबत असलेली अनास्था मानसिक त्रासाला कारणीभूत होईल. सर्व कुटुंबाची काळजी दूर करणारी घटना घडेल.
धनु :–स्टेशनरीच्या दुकानदारांना व्यवसायातील झालेली त्रूटी भरून काढता येणार आहे. महत्वाच्या कामाच्या वेळी अचानकपणे इंटरनेटचे कनेक्शन बंद पडून तुमच्या कामात व्यत्यय येईल. पूर्वी ठरवलेला प्रवासाचा बेत बदलण्याची गरज भासणार नाही.
मकर :–व्यवसायासाठी लागणार्या कर्जाची सोय बँकेकडून होणार असल्याचे कळेल. गर्भवती महिलांनी शारिरीक कष्ट फार होणार नाहीत याची काळजी घ्यावी. वडिलांच्या आँफीस कडून त्यांचा सत्कार होणार असल्याचे कळेल. नवीन नोकरीतून इंटरव्हूसाठी काँल येईल.
कुंभ :–कालपरवापर्यंत आपली प्रकृती दणकट नाही असे वाटणार्याना आपली प्रतिकारशक्ती वाढल्याचे कळेल. अपत्यप्राप्तीच्या इच्छूकांना आपली इच्छा पूर्ण करण्याचे मार्ग सापडतील तरी त्याचा विचार करावा. महिलांनी आपल्या विचारात बदल करण्याची गरज आहे.
मीन :–महसूल विभागाकडून एखादी नोटीस येईल व त्याला तातडीने उत्तर द्यावे लागेल. कोर्टातील केसमुळे झालेल्या बदनामी बाबत फार विचार करत बसू नका. मुलीच्या विवाहाची बोलणी सध्या पुढे ढकला. अनाठायी होणार्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
| शुभं-भवतु ||