daily horoscope

शुक्रवार 12 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शुक्रवार 12  फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

शुक्रवार 12 फेब्रुवारी आज चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र धनिष्ठा 14:22  पर्यंत व नंतर शततारका. आज 21:13 ला रवि कुंभ राशीमधे प्रवेश करत आहे. आजचा संपूर्ण दिवस शुभ असल्याने महत्वाची व व्यावसायिक व्यवहाराची कामे करायला हरकत नाही.

daily horoscope

वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–आज अचानक  मोठ्या खर्चाची कलमे निघतील व मनात नसतानाही खर्च करावा लागेल. मित्राच्या  ओळखीमुळे शैशणिक क्षेत्रात अडलेल्या कामास सुरूवात होईल. सरकारी योजनांतून एखादे काम मिळेल या आशेवर राहू नका.

 

वृषभ :–कोणत्याही प्रवासात एखाद्या नियमाचा भंग केल्याबद्दल दंड भरावा लागेल. विवाहेच्छूना अपेक्षित वधू मिळण्याचे संकेत मिळतील. शिक्षकांना त्यांच्या मनातील योजनांप्रमाणे काम करता येणार नाही त्यावर बंधने येतील.

 

 

मिथुन :–तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत आहात तेथून तुमचे आजवरचे अडकलेले पैसे येऊ लागतील. तरूण वर्गास नवीन नोकरीच्या विषयात फार जागरूकतेने चौकशी करावी लागेल. घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. अडचणीत पडाल.

 

कर्क :–लहानश्या कारणाने मन भयभीत होईल. विद्यार्थ्यांना परिक्षेच्या काळजीने ताप येईल व मन अस्वस्थ होईल. लहान भावाबहिणीच्या नात्यात झालेला बिघाड संपवण्यास आजचा दिवस महत्वाचा आहे. नात्यातील दुरावा काढता येणार आहे.

 

सिंह :–महिलांना न मागताही पतिराजांकडून धनप्राप्ती होणार आहे. कपड्याच्या दुकानदारांना व्यवहारातील गुंता सोडवावा लागेल. नवीन वाहन खरेदी करण्यासाठीची माहिती घ्याल. मानेचे दुखणे पुन्हा सुरू झाल्याचे जाणवेल.

 

कन्या :–आज तुम्हाला एकदम फ्रेश वाटणार आहे.  आपण एकदम ठीकठाक आहोत अशी भावना निर्माण होईल. मानसिक बळ वाढल्याने  अवघड व रेंगाळलेली कामे हातात घेतलीत तर कामे मार्गी लागतील. कोणाचीही मदत न मागता कामांना गती येईल.

 

तूळ :–पैशाचा विचार जास्त करू  नका. पैशासाठी तुम्ही नसून तुमच्यासाठी पैसे आहेत. तुमच्या विरोधातील व्यक्तींना उपरती होईल व पुन्हा मैत्री कराविशी वाटेल. व्यवसायासाठी केलेला प्रवास मानसिक त्रास निर्माण करेल.

 

वृश्र्चिक :–काल परवा तुमच्या हातून झालेल्या चुकांमुळे मानसिक त्रास संभवतो. ज्या प्रोजेक्टवर सध्या तुम्ही काम करत आहात त्या प्रोजेक्टचा कालावधी वाढणार आहे त्यामुळे परदेशी असलेल्यांनी नोकरीबाबतची कोणतीही भिती बाळगू नये.

 

धनु :–आज तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात लाभच लाभ होणार आहेत. तुम्ही कशीही उडी मारली तरी ती बरोबरच पडेल. महिलांना संवत:चे मनोरंजन करण्याची चांगली संधी मिळेल. गायक महिलांना, तरूण मुलींना आपल्या कला सादर करता येणार आहे.

 

मकर :–आज हातातील काम सोडून दुसर्‍या कामाकडे लक्ष देऊ नका. व्यवसायातही अती लोभापायी नवीन आँर्डर द्यावी वाटेल पण आज अजिबात नको. पतीपत्नीमधील व्यवसायातील अडचणीत वाढ होईल. तरी शांत रहावे हे उत्तम.

 

कुंभ :–महिलांना व तरूणींना नवीन फँशनेबल  कपडे घेण्याची इच्छा होईल व अचानक मोठ्या माँल मधे किंवा मार्केटमधे जाणे होईल. सरकारी नोकरदारांना दुसर्‍या आँफीसला जाऊन काम करावे लागेल. अजोळकडील मंडळींची काळजी वाढेल.

 

मीन :–लहान मुलांना एखादा किडा चावेल तरी त्याना आज झाडाझुडपात  जाऊ देऊ नका. घरातील  व्यक्तीचा वाढदिवस साजरा केला जाईल व त्यात तुमचा सहभाग मोठा असेल. आज कोणाच्याही सांगण्यावरून नव्याने गुंतवणूक करू नका. जून्या शेअर्समधून फायदा होईल.

| शुभं-भवतु ||

 

One thought on “शुक्रवार 12 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *