Read in
गुरूवार 11 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 11 फेब्रुवारी चंद्र रास मकर 26:10 पर्यत व नंतर कुंभ. चंद्रनक्षत्र श्रवण 14:04 पर्यंत व नंतर धनिष्ठा. आज पौष अमावास्या. आजचा दिवस अशुभ आहे. तरी आज कोणतेही महत्वाचे काम करू नका.
वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–मनापासून ज्या गोष्टींच्या प्राप्तीची आतुरतेने वाट बघत आहात ते आज दुपार नंतर तुम्हाला मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. तुमच्या क्षेत्रांतील तुमचे प्रतिस्पर्धी अचानक माघार घेणार आहेत. कौटुंबिक नात्यात आपल्याच माणसांकडून अपमान सहन करावा. लागेल.
वृषभ :–आज रवि, चंद्र, बुध, गुरू, शुक्र, शनी हे तुमच्या भाग्यस्थानात येत आहेत. तुम्हाला ज्या गोष्टींची आशा अपेक्षा आहे त्या गोष्टी मिळण्याचे संकेत मिळतील. कुटुंबातील वयस्कर मंडळीना तर सामाजिक संस्थेकडून सन्मान जाहीर होईल. विद्यार्थ्यांना स्वत:विषयी अभिमान वाटावा अशी घटना घडेल.
मिथुन :–आज कोणतेही काम सहजपणे होणार नाही, नेहमीपेक्षा जास्त कष्ट पडतील. अपत्यप्राप्तीच्या इच्छुकांना मनातील इच्छा पुर्ण होणार असल्याचे संकेत मिळतील. धार्मिक विषयावरील चर्चा तुम्हाला मनस्ताप देणारी ठरेल तरी शब्द, बोलण्यातील मुद्धे याबाबत सावधपणा बाळगा .
कर्क :–ज्या महिलांना दागदागिने यांची हौस आहे त्यांना सासरच्या कुटुंब प्रमुखाकडून किंवा सासूबाईंकडून मौल्यवान दागिना मिळेल. कुटुंबात पाहुण्यांचे आगमन होईल व घरात सुग्रास भोजनाचा बेत जमेल. तुम्ही करत असलेल्या कार्याला राजाश्रय मिळेल व कांही प्रमाणात अनुदानही मिळेल. .
सिंह :–आजपर्यंत ज्या गोष्टींचे तुम्हाला दु:ख वाटत होते त्या गोष्टी आता तुम्हाला त्रासदायक वाटणार नाहीत. त्याच्यावर उपाय सापडेल . गायक मंडळीना तुमचा स्वत:चा एखादा कार्यक्रम करता येणार आहे. कुटुंब प्रमुखाचा आज खर्या अर्थाने विजय होणार आहे.
कन्या :–मुलाच्या बाबतीत काळजी निर्माण करणारी घटना घडेल. बाहेरून कळालेल्या गोष्टींवर आंधळेपणाने विश्र्वास न ठेवता गोष्टी पडताळून पहा. कोणालाही आरोपीच्या पिंजर्यात उभे करू नका. शाळकरी मुलांकडून आज चुका होणार आहेत अंदाजावर मत बनवू नका.
तूळ :–व्यसनांचा नाद असलेल्यांच्या मनावर संयम घालण्यासाठी काहीतरी युक्ती योजावी लागेल. पाळीव प्राण्यांची आवड असलेल्यांना घरी बसून आवडत्या प्राण्याची प्राप्ती होईल. महिलांचे मानसिक क्लेश वाढतील व मनाची अस्वस्थता वाढेल. मनातील दुखा:ला मोकळे कराल.
वृश्र्चिक :–ज्यांचा लहान मोठा कसलाही व्यवसाय असलेल्यांना अचानक धनलाभ होणार आहे. अचानक नवीन आँर्डर्स, मिळतील व व्यवसायाची वृद्धी होत असल्याचे जाणवेल. शेजारच्यांच्या महत्वाच्या कामासाठी शेजार्यांबरोबरच वकिलाकडे जावे लागेल. पूर्ण विचाराने गोष्टी हाताळा.
धनु :–ज्या क्षेत्रात काम करत आहात तेथे तुमच्या गुणांमुळे चमकाल. राजकीय मंडळीनी गुप्तशत्रूं पासून अतिशय सावध रहावे. आईच्या बँकेतील व्यवहाराविषयी तुम्हाला लक्ष घालावे लागेल. विद्यार्थांना उत्तम हस्ताक्षराचे बक्षिस मिळेल.मनातील विचारांना आवर घाला.
मकर :–आजचा दिवस सुखासमाधानात व आनंदात जाणार आहे. तुमच्याच राशीत असलेले सात ग्रह तुमच्यावर प्रेमाची पण बरसात करणार आहेत. महिलांना हार्मोनल चेंजेसचा त्रास होईल तर पुरूषाना पित्ताचा प्रचंड त्रास होईल.
कुंभ :–मालक व भाडेकरू यांच्यामधील वाद विकोपाला जाईल व प्रसंगी पोलीस स्टेशनला जावे लागेल. तरूण मुलींनी मनातील कोंडलेल्या प्रश्र्नांना ओपन करावे. व्यवसायासाठी कर्जाचा विचार योग्य आहे याची जाणीव होईल पण त्याचा परिणाम सामाजिक प्रतिष्ठेवर होईल.
मीन :–आजचा दिवस इच्छापूर्तीचा आहे. मनातील बाळगलेल्या अपेक्षां आज दुपारनंतर पूर्ण होऊ लागतील व तसे संकेतही मिळतील. कांही कारणांनी ज्यांचे सन्मान हुकले असतील त्यांना नजरेच्या टप्प्यात आल्याचे जाणवेल. नोकरीत कामाचा उरका वाढेल.
| शुभं-भवतु ||
Thank you Tai