daily horoscope

बुधवार 10 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

बुधवार 10 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

बुधवार 10 फेब्रुवारी आज चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तराषाढा 14:11 पर्यंत व नंतर श्रवण. आजचा दिवस अशुभ असल्याने कोणतीही महत्वाची कामे करू नयेत.

daily horoscope

वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–अध्यात्मिक साधना करणारे, मंत्रसिद्धीसाठीची कठोर उपासना करणार्यांना आजपर्यंतच्या  आपल्या उपासनेचे फलीत काय आहे याची जाणिव होईल. वेदांचा अभ्यास केलेल्यांना त्यांच्या साधकांकडून खूपच गौरविले जाईल. त्याच्याकडे असलेल्या तेजस्वीपणाचा अनुभव येईल.

 

वृषभ :–कालच्यापेक्षा आजचा दिवस खूपच प्रमाणात आनंदात जाणार आहे. सरकारी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दंड भरण्याबाबत नोटीस येईल. कुटुंबात पितरांचे श्राद्ध करावे की करू नये असे दोन गट पडून  मनात संभ्रम निर्माण होईल तरी तज्ञ गुरूजींचा सल्ला घ्यावा.

 

मिथुन :–आज तुम्हाला पहाटे पडलेल्या स्वप्नाचा अर्थ लागेल महत्वाच्या कामात मार्गदर्शन मिळेल. मनातील विचार बोलावे लागतील तरच त्यातून काही निष्पन्न होईल. आज तुमच्या मनात प्रत्येक कामाविषयी शंकेची पाल चुकचुकणार आहे.

 

कर्क :–तुमच्या व्यवसातील उघड शत्रूची आज तुम्हाला प्रकर्षाने जाणिव होईल.  स्वतंत्र धंदा असलेल्यांनी आपल्या स्वत:च्या विचारानीच निर्णय घ्यावेत. नवीन गुंतवणूकीचा विचार करू नका. तरूणांना रात्रीचे जागरण त्रासदायक ठरेल.

 

सिंह :–लेखकांना सामाजिक प्रश्र्नावरील जहाल लेखनाबद्दल तुमच्याकडून सफाई मागण्यात येईल. राजकीय मंडळीना स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी जागरूक रहावे लागेल. कुटुंबात आईच्या नात्यातील प्रेमाच्या व्यक्तींचे आगमन होईल.

 

कन्या :– प्रौढ स्त्रीपुरूषांना  जून्या शेअर्समधून अचानक चांगला धनलाभ होईल. जून्या वस्तूंच्या विक्रेत्यांना अँन्टीक पीसची आश्र्चर्यकारक कींमत येईल. प्रेमसंबंधातील बोलणी विवाहाच्या मार्गाने पुढे सरकतील पण घाई करू नका.

 

तूळ :–40 वर्षाच्या पुढील महिलांनी आपली आवश्यक असलेली तपासणी करून घ्यावी. व्यावसायिकांनी आपले मार्केटींगचे तंत्र बदलण्याच्या मार्गांचा विचार करावा. प्रथम संततीकडून अपेक्षित यशाची खात्री मिळेल. वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

 

वृश्र्चिक :–मनातील बंडखोरीच्या विचारांना थारा देऊ नका त्यामुळे स्वत:हून संकट ओढवून घ्याल. सरकारी मंडळीनी वाहन चालवताना आज नियमाचे उल्लंघन होत नसल्याची खात्री करून घ्यावी. आज कोणतेही अती धाडसाचे काम करू नका.

 

धनु :–आज कोणत्याही विषयावर वाद घालू नका. स्पष्ट बोलण्याच्या नावाखाली फटकळपणे बोलाल. नोकरीतील हाताखालील कर्मचारी, कामगार वर्ग  यांचेबरोबरील अती काटेकोरपणा अंगलट येईल. पैशाच्या अती लोभाने केलेले काम नुकसानीत जाईल.

 

मकर :–जागेचा कोणताही व्यवहार असो आज करू नका. अवघड व दुर्लक्षित झालेल्या कामांना आज वेळ द्या. पित्तप्रकृतीच्या व्यक्तींनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे व मसालेदार खाऊ नये. लहान तान्ह्या मुलांना जुलाब, पोट बिघडण्याचा त्रास संभवतो.

 

कुंभ :– राजकीय क्षेत्रातील मंडळीना होणारा विरोध वाढत असल्याचे जाणवेल. महत्वाच्या कामासाठी राजपत्रित अधिकार्यांना भेटावे लागेल. गुप्तशत्रूंच्या हालचालींवर लक्ष असणे महत्वाचे ठरेल. महिलांकडून महत्वाची बातमी लिक होण्याची दाट शक्यता आहे तरी जागरूक रहावे.

 

मीन :–मंत्रसाधना करणार्यांना करत असलेल्या साधनेतून लहानसा अनुभव येईल. पत्नीकडून मिळालेल्या गोड बातमीमुळे  पती-पत्नीत आनंदाचे वातावरण राहील विद्यार्थ्यांनी नवीन विषयाचा अभ्यासातील मेहनत वाढवल्यास चांगले यश मिळेल.

| शुभं-भवतु ||

 

One thought on “बुधवार 10 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *