Read in
मंगळवार 09 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 09 फेब्रुवारी 2021 आज चंद्ररास धनु 20:20 पर्यंत व नंतर मकर. चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा 14:38 पर्यंत व नंतर उत्तराषाढा. आजचा दिवस अशुभ असल्याने कोणतीही महत्वाची कामे करू नयेत.
वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– राजकीय क्षेत्रातील मंडळीना एखाद्या महत्वाच्या विषयात बाजी मारता येणार आहे. ज्या तरूण मुलांमधे व वडीलांमधे वैचारिक दरी निर्माण झाली आहे त्यांनी आज त्या विषयावर स्वत:हून विचार करावा. व्यावसायिक क्षेत्रातील अंदाज अचूक निघतील.
वृषभ :– आजची कामे जरा घाईने आटपून घ्या. संध्याकाळनंतर वेळ तुम्हाला कंटाळवाणा जाणार आहे. वयस्कर मंडळीना रोजच्यापेक्षा जरा जास्तच थकवा येईल. तरूणांचा ही उत्साह कमी होईल. संध्याकाळच्या भेटीगाठी आठी शब्द देऊ नका.
मिथुन :–एखाद्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महिलांचा सन्मान होईल. सरकारी क्षेत्रातील महिला अधिकार्यांचा दबदबा वाढेल. नव्याने गाडी ड्रायव्हींग शिकणार्यानी आज जराही चलबिचल होऊ नये किंवा आज सुट्टी घ्यावी.
कर्क :– कोणत्याही भाषेतील ज्ञानी व्यक्तीला आज पासून येत्या 15 दिवसाच्या आत मोठी संधी मिळणार आहे. दुभाषीचे काम करणार्यांचा तर चांगलाच मानसन्मान होईल. सोबतच्या लहान मोठ्यांबरोबर सौजन्याने वागावे लागेल.
सिंह :–अडीअडचणीसाठी बाजूला ठेवलेले पैसे वापरण्याची हीच खरी वेळ आहे तरी तरी मनाला वाईट वाटून घेऊ नका. परदेशी असलेल्या नोकरदारांना अचानक नवीन पर्याय समोर येतील व त्यामुळे द्विधा मनस्थिती निर्माण होईल.
कन्या :–बोलण्याच्या ओघात तुमच्या मनातील कोंडलेल्या भावनाना वाट करून द्याल. लहान मुलांना कोणत्या शाळेत घालावयाचे या विषयावर कुटुंबात वादावादी निर्माण होईल. महिलांना आवडत्या वस्तूसाठी मोठी कींमत मोजावी लागेल.
तूळ :–जून्या घराच्या विक्रीबाबत कुटुंबात एकमत होईल व त्याचे श्रेय कुटुंबातील बुजुर्गांना मिळेल. किरकोळ विक्रीच्या व्यवसायातून अचानक मोठी उडी मारता येणार आहे. लहान मुलांना राग अनावर होऊन हातघाईवर येथील तरी लक्ष ठेवा.
वृश्र्चिक :–स्पर्धा परिक्षेला बसलेल्यांनी स्वत:विषयीच्या अवास्तव कल्पना सोडून द्याव्यात व मेहनत वाढवावी. महिला शिक्षकांना त्यांच्या मेहनतीचे फळ न मिळाल्याचे जाणवेल. विद्यार्थी वर्ग आज सुस्तावणार आहे.
धनु :–तुमच्या हातातील केसबाबत कोर्टाच्या कामातील गुंतागुंत वाढेल. आज या कामात तुम्हाला कोणाचीही मदत मिळणार नाही. टेक्निकलच्या तरूणांना नवीन ठिकाणी चांगले काम शिकता येत असल्याचे जाणवेल.
मकर :–आर्थिक बळापेक्षा आंतरिक मानते बळ महत्वाचे असते याचा जाहीर अनुभव तरूण वर्गाला येईल. वयस्कर मंडळींना आपल्या जिवनातील जुन्या गोष्टींना धरून प्रबोधन करण्याची संधी मिळेल. लेखकांच्या मनातील विचार लेखणीतून व्यक्त होईल.
कुंभ :–वयापेक्षा जास्त कामाचा बोजा घेतल्याने वयस्कर मंडळींना मानसिक त्रास होईल. आईवडीलांना दूरगावी असलेल्या मुलाला भेटण्याची ओढ निर्माण होईल. मशीनवर काम करणार्यांना आपल्या प्रमोशनचे मार्ग खुले झाल्याचे जाणवेल.
मीन :–सकाळपासूनच कामाची घाई सुरू होणार आहे. राजकीय मंडळीना स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी जागरूक रहावे लागेल. अचानक इतरांची दवाखान्यातील बिले भरण्यासाठी आर्थिक खर्च वाढेल. आज तुमचा दिवस धावपळीत जाणार आहे.
| शुभं-भवतु ||
Thank you Tai