Read in
सोमवार 08 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 08 फेब्रुवारी आज चंद्ररास धनु दिवसरात्र व व चंद्रनक्षत्र मूळ 15:20 पर्यंत व नंतर पूर्वाषाढा. आज भागवत एकादशी आहे. आजचा संपूर्ण दिवस चांगला आहे तरी महत्वाची कामे करायला हरकत नाही
वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–व्यवसायातील बर्याच दिवसापासून रखडलेल्या कामावर लक्ष केंद्रीत कराल. कुटुंबातील वडीलधार्या माणसांकडून कामात महत्वाची मदत मिळेल. महिलांना प्रकृतीचा व डोकेदुखीचा, पित्ताचा त्रास जाणवेल.
वृषभ :–बद्धकोष्ठतेचा त्रास असणार्यांनी त्रासामागच्या कारणांचा विचार करावा. तरूणांचा अँपेडिक्सचा त्रास वाढेल. महिलांनी बचत करून लपवून ठेवलेल्या पैशाचा सुगावा पतिराजांना लागेल व फजिती होईल.
मिथुन :–वैयक्तिक जोडीदाराबरोबर आजचा दिवस हासत खेळत जाणार आहे. नोकरीत महत्वाच्या कामासाठी तुमची निवड केली जाईल. आईवडीलांची सेवा करण्याची संधी मिळेल. तरूणांनी. व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा.
कर्क :–गावाला जाणार असाल तर महत्वाच्या, मौल्यवान चीज वस्तु बँकेच्या लाँकरला ठेवून जावे. चोरी होण्याची शक्यता आहे. प्रवासातही वस्तू सांभाळा. लग्नाच्या मुलींना अपेक्षेप्रमाणे स्थळे येथील व आईवडीलही खूष होतील.
सिंह :–पतीपत्नीमधील प्रेमाला बहर येईल. मानसिक रूग्णांवर भावनिक गोष्टींचा चांगला प्रभाव दिसून येईल. महिलांना, वृद्ध महिलांना प्रेमाने बोलल्यामुळे आपले दुखणे कमी झाल्याचे जाणवेल. सासु व सुनेच्या नात्यातील वीण घट्ट होईल.
कन्या :–व्यवसायात लागणारे आर्थिक बळ मित्रमंडळींकडून मिळेल. पायाच्या आँपरेशनसाठी तारीख ठरवाल. नवीन घराच्या शोधात असलेल्यांना स्वतःच्या अपेक्षेप्रमाणे व बजेटमधे बसणारे घर मिळेल.
तूळ :–मानसिक ताण तणाव असलेल्या रूग्णांकडे, नातेवाईकांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. प्रवासाचे बेत पुढे ढकलावे लागतील. लहान सहान कारणांवरून तरूणांनी चिडचिड करू नये. मधुमेहीनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे.
वृश्र्चिक :–सतत पैशाचा विचार केल्याने मानसिक दडपण येईल. वृद्धांना तरूणांनी आवश्यक तेवढे खर्चाला पैसे दिल्याने आज त्यांना खूपच आनंद होणार आहे. महत्वाच्या कामाबाबत भावाबहिणीचे विचार जूळतील.
धनु :–रोजचा प्रवास करून कंटाळलेल्या टँक्सी, बस ड्रायव्हर्सना आज आरामाची गरज निर्माण होईल. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्न करणार्या संस्थेत तुम्हाला काम करण्याची संधी मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होतील.
मकर :–परदेशी असलेल्या व आजारी असलेल्यांना ताबडतोप मदत मिळेल. विद्यार्थ्यांच्या मानसिक शक्ती मध्ये वाढ झाल्याचे जाणवेल. रूग्णालयातील व्यक्तीना आराम पडू लागून डिसचार्ज मिळण्याची चिन्हे दिसतील.
कुंभ :–कुटुंबात मुलाच्या सासुरवाडीच्या मंडळींचे आगमन होईल. सरकारी कामातील झालेल्या उशीराबद्दल वकिलांबरोबर भेटून पुढील आखणी करावी लागेल. लेखकांकडून धार्मिक लेखनाचे प्रकाशन होईल.
मीन :–पूर्वी चोरीला गेलेल्या दागिन्यांचा चोर सापडेल व पोलीस स्टेशनकडून तुम्हाला बोलावणे येईल. बँकेच्या कर्ज प्रकरणातील लागलेल्या वेळांमुळे बँक अधिकार्यांबरोबर वाद निर्माण होईल. वयस्कर मंडळीना कंबरदुखीचा त्रास होईल.
| शुभं-भवतु ||
Thank you Tai