Read in
रविवार 07 फेब्रुवारी 2021 ते शनिवार 13 फेब्रुवारी 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य
रविवार 07 चंद्ररास वृश्र्चिक 16:14 पर्यंत व नंतर धनु. चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 16:14 पर्यंत व नंतर मूळ.
सोमवार 08 चंद्ररास धनु दिवसरात्र. व चंद्रनक्षत्र मूळ 15:20 पर्यंत व नंतर पूर्वाषाढा. मंगळवार 09 चंद्ररास धनु 20:30 पर्यंत व नंतर मकर. चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा 14:38 पर्यंत व नंतर उत्तराषाढा. . बुधवार 10 चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तराषाढा 14:11 पर्यंत व नंतर श्रवण. गुरूवार 11 चंद्र रास मकर 26:10 पर्यंत व नंतर कुंभ. चंद्रनक्षत्र श्रवण 14:04 पर्यंत व नंतर धनिष्ठा. शुक्रवार 12 चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र धनिष्ठा 14:22 पर्यंत. शनिवार 13 चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र शततारका 15:10 पर्यंत.
9 , 10 व 11 हे तीनही दिवस चांगले नसल्याने या दिवसात महत्वाची कामे करू नयेत.
वरील सर्व राशी नक्षत्रांचा विचार करून व रोजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–12 व 13. तारखेला मित्रमंडळींबरोबर च्या मिटींगमधे नवीन प्रोजेक्टच्या बाबतीत चर्चा होईल. आर्थिक बाब खुलेपणाने बोला. 10 व 11 रोजी एखाद्या संस्थेची कमिटी तयार होऊन त्यात तुम्हाला महत्वाचा पदभार दिला जाईल. 8 व 9 रोजी कुटुंबातील किंवा अत्यंत जवळच्या मोठ्या व्यवसायिकांबरोबर चर्चा करून निर्णयापर्यंत याल. 07 व 8 रोजी बर्याच दिवसापासून रेंगाळलेल्या व्यवसायाबाबतीतल्या बैठकांचे नियोजन कराल.
वृषभ :–8 .व 9.रोजी कुटुंबातील मोठ्यांच्या विचाराने निर्णय घ्या. व्यवसायातील अडचणीच्या विषयावर भावजयीकडून योग्य तो मार्ग सापडेल व ओळखही मिळेल. 10 व 11 रोजी जुनाट आजारावर नवीन वैद्यबुवा ती माहिती मिळेल व पत्ताही कळेल. 12 व 13 रोजी नवीन गुंतवणूकीला वाव मिळेल. तरीही तज्ञांच्या सल्ल्यानेच करा. 07 व 08 रोजी अचानक होणारी कामे घुमजाव करतील तरी आज कोणत्याही कामाची घाई करू नका.
मिथुन :–07 व 08 रोजी नोकरीतील क्लीष्ट कामातील गुंतागुतीवर तुमच्याकडूनच युक्ती मिळेल व गुंता सुटेल. 09 रोजी अपत्यप्राप्तीच्या इच्छुकांना डाँक्टरांकडून दिलासा मिळेल व उपायांचे नियोजन कराल. 10 व 11.रोजी ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू आहे त्यात सुधारणा करण्याचे ठरेल व ते शिकवणारे शिक्षकही मिळतील. 12 व 13 रोजी किरकोळ धान्य दुकानदारांचे अचानक नुकसान होत असल्याचे जाणवेल तरी काळजी घ्यावी लागेल.
कर्क :–07, 08 व 09.रोजी मुलींना ओळखीतील मंडळींकडून अनुरूप अश्या स्थळाची माहिती कळेल. वयस्कर मंडळीना प्रेमाची माणसे, नातेवाईक मित्रमंडळी भेटतील व दिवस आनंदात जाईल.10 व 11 रोजी राजकीय लोकांना त्यांच्याच बरोबरच्या सहकार्यांकडून छुपा विरोध होईल तरी सावध रहावे आपली कार्ड्स ओपन करू नयेत. 12 व 13 रोजी मानसिक त्रास वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या.
सिंह :–08 व 09 रोजी साठवून ठेवलेले पैसे, धन गरजेसाठी बाहेर काढावे लागेल. महिलांना मानसिक त्रासामुळे आजारपण येण्याचा धोका आहे. 12 व 13 रोजी कापडाच्या व्यापारांनी व्यवसायातील गुंतागुंत सोडवण्याचा प्रयत्न करावा. बँकेच्या व्याज प्रकरणाचे पडसाद व्यवसायावर होऊ देऊ नका. 07, 10 , 11 रोजी लेखक व समिक्षकांना सामाजिक बांधिलकी जपण्याच्या प्रयत्नात जनतेच्या आरोपांना तोंड द्यावे लागेल.
कन्या :–07 रोजी नोकरीच्या ठिकाणी मिळालेल्या एखाद्या नोटीशीला, किंवा आरोपपत्रांना उत्तर द्यावे लागेल. 08 व 09 रोजी पतीपत्नीच्या व्यवसायात अचानक गुंतवणूक करण्याची, भांडवल वाढवण्याची गरज निर्माण होईल. 10 व 11 कर्जाचे प्रकरण अंगलट येईल. आईकडील नात्याकडून प्रत्यक्ष मदतीचा हात मिळेल. 12 व 21.रोजी ह्रदयविकाराच्या पेशंट्सना विशेष काळजी घ्यावी लागेल. धावपळ, दगदग करू नका.
तूळ :–12 व 13 रोजी शेतीविषयक चिंता निर्माण होईल. जमीन, शेती विक्रीसाठी काढली असल्यास सध्या तुम्हाला त्यातून फारसा फायदा होणार नाही. 08 व 09.रोजी कोणतीही खरेदी किंवा विक्री भावनेच्या भरात करू नका. नोकरीत कामाचा ताण वाढेल पण नियोजित काम पूर्ण न झाल्याने मानसिक चिडचिड होईल. 10 व 11 रोजी कुटुंबात जोडीदाराची साथ मिळणार नाही व मनस्ताप वाढेल. 07 रोजी व्यवसायाबाबत कोणतेही अंदाज करू नका.
वृश्र्चिक :–09 व 10 रोजी डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कुटुंबात ज्येष्ठमंडळींच्या प्रकृतीबाबत अचानक प्रश्र्न निर्माण होईल. भावंडामधील एकोपा मनाला भावूक करेल. 12 व 13 रोजी मनाला त्रास होत असलेल्या प्रश्र्नांचे निराकरण होईल. महिलांना मनावरील ओझे व्यक्त करण्याची संधी मिळेल व सासरच्या मंडळींकडून प्रेमाचा हाथ मिळेल. 10 व 11 रोजी कोर्टातील जागेच्या व्यवहारात ओळखीचा उपयोग करू नका. नियमाप्रमाणे होणारे काम बिघडेल. 07 व 08 रोजी तुमच्या कामाच्या अनुभवामुळे इतरांवर छाप पाडाल.
धनु :–08 व 09.रोजी मनातील इच्छा, अपेक्षा पूर्ण होण्याचे संकेत मिळतील. भावाकडील आनंदाच्या बातमीने खूष व्हाल. 10 व 11 रोजी पूर्वी गुंतवलेल्या रकमेतून अचानक मोठा लाभ होईल. अध्यात्मिक श्री गुरूमाऊलीच्या कृपाने मानसिक शांतता व समाधान मिळेल. 12 व 13 रोजी कुटुंबात श्री कुलस्वामिनी च्या पूजेबाबतचे नियोजन ठरेल. अपत्यप्राप्तीच्या इच्छूकांना आपली इच्छा पूर्ण होणार असल्याचे कळेल. 07 आजचा दिवस अतिशय दगदगीचा व त्रासाचा जाईल.
मकर :–07, 08 व 09 या तीन दिवसात मानसिक शक्तीमधे वाढ होईल. ज्या कामांची आजपर्यंत भिती वाटत होती तीच कामे करण्याची उर्जा निर्माण होईल. 10 व 11 रोजी कोणाचीही मदत न घेता हातातील काम पूर्ण कराल. तसेच या सप्ताहात रेंगाळलेल्या विषयांना हात घालायला हरकत नाही. जे शक्य नाही ते करून दाखवाल. 12 व 13 रोजी आईचे प्रेम मिळेल.
कुंभ :–गेल्या चार दिवसात पडलेल्या स्वप्नांचा वास्तवातील घटनेंबरोबर पडताळा घ्या . 12 व 13 रोजी औषधाच्या शेअर्समधील गुंतवणूक लाभदायक ठरेल तरी मार्केटचा आढावा घेऊन गुंतवणूक करा. कुटुंबात मुलीच्या विवाहाची बोलणी फलदायक होतील व आनंद निर्माण होईल. 10 व 11 रोजी राजकीय लोकांना गुप्तशत्रूंचा त्रास होईल तरी आपण मौन बाळगावे हे उत्तम होय. 07 , 08 व 09 रोजी कुटुंबात परगावी असलेल्या आईवडीलांची आगमन होईल.
मीन :–07 रोजी पूर्वजांच्या आशिर्वादाने अशक्य ठरलेल्या अपत्य प्राप्तीचा लाभ होईल. 10 व 11 रोजी अध्यात्मिक अभ्यासकाना श्री गुरूमाऊलीकडून आवश्यक ते मार्गदर्शन मिळेल. 12 व 13 रोजी जून्या औषधाच्या शेअर्समधून चांगला फायदा होईल. 08 व 09 रोजी आजारी व हाँस्पिटल मधे अँडमिट असलेल्यांच्या आरोग्यात सुधारणा होत असल्याचे दिसून येईल.
|| शुभं-भवतु ||