Read in
शनिवार 06 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 06 फेब्रुवारी आज चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अनुराधा 17:17 पर्यंत व नंतर ज्येष्ठा आहे. आजचा संपूर्ण दिवस अशुभ असल्याने कोणतीही महत्वाची कामे करू नयेत.
वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आज तुमच्या अष्टम स्थानातील चंद्र तुम्हाला सर्वच गोष्टी सावधपणे करण्याच्या सूचना देत आहे. प्रकृतीची काळजी घ्या. पडण्या धडपडण्यापासून सावध रहा व विशेषत: वयस्कर मंडळीनी आज घरीच रहा बाहेर जाऊच नका. कोणतेही आर्थिक व्यवहार पण करू नयेत.
वृषभ :–जागा, घर घेण्याचे विचार करत असाल तर त्याविषयीचे तुमचे विचार पक्के कराल. भागिदारीच्या व्यवसायात तुम्ही तुमचेच विचार पुढे दामटू नका. आर्थिक बाबतीत मतभिन्नता होणार आहे. कुटुंबात अचानक नवीन वस्त्र खरेदी होईल.
मिथुन :–आज कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. ज्यांना सुट्टी आहे त्यांच्याकडे तर समारंभाचे वातावरण राहील. आईकडील न्यायालयातील कामात मदत करावी लागणार आहे. तरूणांना आवडत्या गोष्टी खाण्यास मिळणार आहेत.
कर्क :–अपत्य प्राप्तीच्या इच्छूकांना गोड बातमी कळेल. ज्यांना अपत्यास आठी डाँक्टरांची मदत घ्यावी लागत आहे त्यांना आज यश येईल. अचानक व्यवसायात मोठा खर्च करावा लागेल. कोर्टातील कामात गुंतागुंत वाढेल.
सिंह :–नोकरीत मानहानीचे प्रसंग येथील. कुटुंबात वडील व मुलगा किंवा मुलगी यामध्ये वादाचे प्रसंग उद्भवतील. महिलांना अचानक पोटदुखीचा त्रास जाणवेल व नाना शंका निर्माण कराल.
कन्या :–कुटुंबात चर्चेचे रूपांतर वादात होईल व आई मुलगा व वडील अशा दोन पार्ट्या पडतील. सुनबाईंचे व सासुबाईंची गुळपीठ जमेल. विद्यार्थ्यांना अवघड वाटणार्या विषयासाठी शिक्षक मिळतील. विवाहेच्छूंना तुम्हाला लाभदायक असणारे नवीन स्थळ येईल.
तूळ :–दवाखान्यात अँडमिट असलेल्या अपत्याच्या प्रकृतीत आराम पडू लागेल. महिलांना मानसिक अस्वस्थता जाणवेल. जिम करणारे किंवा व्यायाम करणार्यांनी कशाचाही आज अतिरेक करू नये. अपेक्षित बाबींची पूर्तता करण्यासाठी कोर्टातील कामात इतरांची मदत घेऊ नका.
वृश्र्चिक :–आज तुमच्या राजकीय कारकिर्दीला सुरवात होण्याची चिन्हे दिसतील. महिलांना मनाच्या द्विधा मनस्थितीमुळे त्यांना बेचैनी येईल. मशीनवर काम करणार्यांनी आज अतिशय काळजीने वागावे. मनातील विचारांना मित्रांसमोर मोकळी वाट द्याल.
धनु :–व्यसनाची सवय असणार्यांनी स्वत:वर कंट्रोल घालण्याची गरज भासेल. प्रकृती आज आपले रंग दाखवणार आहे. नोकरीतील गमावलेले अधिकार परत मिळणार असल्याची चर्चा कानावर येईल. वयस्कर मंडळीना झोप न लागण्याचा त्रास होईल.
मकर :–बंधुराजांकडील आनंदाच्या बातमीने सुखावून जाल. वडीलांच्या प्रेस्टीजमुळे तुमचे अडलेले काम होऊन त्याचे क्रेडीट मात्र तुम्हालाच मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना आपले स्थान निर्माण करता येणार आहे.
कुंभ :–आज तुम्ही सर्वच बाबतीत काळजीने वागायचे आहे. मुलांना बाहेर खेळायला सोडले तरी तुम्हाला स्वत: ला तेथे हजर रहावे लागेल. अचानक आर्थिक खर्च वाढेल. आज तुमचा आरामाचा दिवस आहे हे लक्षात घ्या.
मीन :–तुमच्या हितचिंतकांच्या शुभेच्छांमुळे अवघडातील अवघड काम चुटकीसरशी करून दाखवाल. ज्योतिषी, मानसशास्त्राच्या डाँक्टर्सना एखादी केस सोडवताना नियम बाह्य विचार करावा लागेल. आज एकदम सुखसमाधानाचा दिवस आहे.
| शुभं-भवतु ||
Thank you Tai