Read in
शुक्रवार 05 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 05 फेब्रुवारी चंद्ररास तूळ 12:46 पर्यत व नंतर वृश्चिक. चंद्र नक्षत्र विशाखा 18:27 पर्यंत व नंतर अनुराधा. आज रवि धनिष्ठा नक्षत्रात 31:30 ला प्रवेश करत असून 19 फेब्रुवारी पर्यंत धनिष्ठा नक्षत्रातच असणार आहे.
आजचे नक्षत्र हे राक्षसगणी असल्याने शुभ कार्य करण्यास चांगले नाही. तसेच ते अधोमुख असल्याने जमिनीखालील कामे करण्यास चांगला आहे. जसे विहीर खणणे, बी पेरणे, पुरलेले धन काढणे. तसेच दत्तक घेण्यासाठी व अग्निहोम इ. कार्यासाठी चांगला आहे.
आजचा दिवस संध्याकाळी 06:27 नंतर शुभ आहे.
वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– महिलांनी पतिराजांपासून लपवून ठेवलेले पैसे बाहेर काढून त्याचा आढावा घ्यावा. वारसा हक्काने आलेल्या दागिन्यांना पण जरा हवा दाखवावी .वैवाहिक जोडीदाराबरोबर आजचा दिवस अतिशय सुखासमाधानात जाईल.
वृषभ :–चार पायाच्या प्राण्यांकडून दुखापत होण्याचा धोका आहे तरी सावध रहावे लागेल. नोकरी निमित्ताने करण्यात येणार्या प्रवासात अचानक बदल होऊन पुन्हा मागे यावे लागेल. प्रेमाच्या व्यवहाराचे रूपांतर विवाहात करण्याचा मानस ठरेल.
मिथुन :–समस्त पतिराजांना पत्नीचे उत्तम सहकार्य मिळेल. शैक्षणिक बाबतीतले कोणतेही महत्वाचे काम आज काढू नका. तरूणांना आपल्या वेळखाऊ कामातील वेळ कसा वाचवावा याचे सिक्रेट सापडेल. निवृत्त झालेल्या ज्येष्ठ मंडळींना एखाद्या सामाजिक कामात भाग घेता येणार आहे.
कर्क :–नोकरीतील अधिकारावर अचानक वरीष्ठांकडून आँब्जेक्शन येईल तरी स्वत:ची बाजू स्पष्टपणे मांडण्याची तयारी ठेवा. व्यवसायात मोठी उलाढाल करण्याची संधी मिळेल. गुंतवणूकीचा आज विचारही करू नका नुकसानीला तोंड द्यावे लागेल.
सिंह :–प्रकृतीच्या स्वास्थ्यासाठी डाँक्टरांकडून आहारावर नियंत्रण घातले जाणार आहे. प्रेमाच्या नात्यात बिघाड, रूसवे फुगवे होतील तरी बोलण्यावर संयम ठेवावा. सरकारी कामाना व योजनाना वेग येईल तरी संधींचा फायदा घ्या.
कन्या :–सहज मिळणार्या पैशाच्या मागे लागू नका. दलाल, कमिशन एजंट यांनी सर्वच व्यवहार जपून करावेत. एका त्रासातून दुसरा त्रास निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी आपल्याला अवघड जाणार्या विषयासाठी भरपूर मेहनत घ्यावी बेफिकीर राहू नये.
तूळ :–वयस्कर आजारी मंडळीना प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. नाजूक प्रकृतीवाल्यांनी न झेपणारे कोणतेच धाडस करू नये. व्यवसायातील जूनी राहिलेली येणी वसूल होतील. आज सरकारी कामे करू नका.
वृश्र्चिक :–परदेशी संस्थांबरोबर आज कोणतेही पत्रव्यवहार किंवा आर्थिक व्यवहारही करू नयेत. वयस्कर मंडळींना आपल्या आयुष्याचे सार्थक झाल्याचे जाणवेल.मुलींनी व तरूणींनी आज कोणतेही धाडस करू नये व कोणाबरोबरही अती जवळीकही करू नये.
धनु :–आज नातेवाईकांकडून तुमच्या वरील संस्कारांचे कौतुक केले जाईल व आदर्श वादासाठी तुमचे उदाहरण दिले जाईल. कलाकार, चित्रकार व पेंटर्सना त्याच्या कलाकृतीसाठी चांगली मागणी येईल. सामाजिक आशयाची कलाकृती करण्याच्या आँर्डरस मिळतील.
मकर :–वकीलांना त्याच्या हातातील केस बाबत मोठी चिंता निर्माण होईल व ती बाब प्रतिष्ठेची राहील. राजकीयदृष्टय़ा आज तुमच्या अधिकारातील कक्षांना खात्री लावली जाईल. 19 फेब्रूवारी पर्यंत शांत राहण्याचे ठरवा.
कुंभ :–खाद्यतेलाचा व्यापार असलेल्यांनी नव्याने गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल. दत्तक संततीचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. बँकेतील कर्मचार्यांनी अनवधानानेही कोणत्याही नियमाचे उल्लंघन होत नसल्याची खातरजमा करावी.
मीन :–शैशणिक संस्था, कोचिंग क्लासचे संस्थापकांनी जनतेच्या आरोपांना तोंड द्यावे लागेल. कोणतेही विचार व्यक्त करू नका व शांततेने घ्या. बांधकाम व्यावसायिकांच्या एखाद्या आँफरला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल.
| शुभं-भवतु ||
Thank you Tai