Read in
गुरूवार 04 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 04 फेब्रुवारी आज चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र स्वाती 19:44 पर्यंत व नंतर विशाखा. आज कालाष्टमी, बुद्धाचा वक्र गतीने मकर राशीत प्रवेश 23:03 वाजता. आजचा दिवस 19:44 पर्यंत शुभ आहे.
हे देवगणी नक्षत्र असल्याने विवाह, बारसे मुंज या शुभकार्यांना अतिशय शुभ आहे. नवीन वाहनाची खरेदी करणे, नवीन दुकानाची सुरूवात करण्यासही शुभ आहे. आज ज्यांना गृहप्रवेश करायचा आहे ते गृहप्रवेश ही करू शकतात.
वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– महिलांना आज आपल्या हक्काच्या स्त्रीधनाची प्राप्ती होईल. नवरोबा किंवा सासु सासरे तुमच्यावर आज अतिशय खूष होणार आहेत. मित्रमैत्रिणींना आजचा दिवस अविस्मरणीय जाईल. टोकदार व धारदार असलेल्या सुरीसारख्या वस्तूंपासून लहान मुलांना जपावे लागेल.
वृषभ :–आजचा दिवस अतिशय सुखासमाधानात व मौजमजा करण्यात जाणार आहे. कुटुंबातील वातावरण चैतन्यमय राहील. आरोग्याच्या बाबतीतील त्रास कमी होऊ लागल्याचे जाणवेल. परदेशी असलेल्या मुलांबरोबर हेल्दी संवाद साधल्यास त्यांचेही मानसिक बळ वाढेल.
मिथुन :–तरूण वर्गाकडून आई वडीलांसाठी महत्वाची खरेदी होईल. कुटुंबात जवळच्या नातेवाईकांच्या वाढदीवस किंवा इतर समारंभात मुलीच्या विवाहाविषयी कांही सकारात्मक गोष्टी घडतील. काका किंवा आत्याच्या प्रकृतीची काळजी निर्माण होईल.
कर्क :–सहजपणाने जमुन आलेल्या जमिनीच्या व्यवहारात शंका घेणार्या घटना घडतील. पुरूषांना सासुरवाडीकडून सुग्रास भोजनासाठी आमंत्रित केले जाईल. पोलिस खात्यातील कर्मचार्यांनी कोणत्याही छुप्या बाबीत सहभागी होऊ नये.
सिंह :–गुढशास्त्राच्या अभ्यासकांनी आपल्या ज्ञानाविषयी अहंपणा करू नये. तरूणांनी आज संमोहन शास्त्र, रिकी, प्राणिक हिलींग यांचा प्रयोग कोणावरही करू नये. वयस्कर मंडळीना त्यांच्या प्रेमाची माणसे भेटतील व त्यामुळे त्यांना आनंद वाटेल.
कन्या :–एजंट, कमिशन एजंट, दलाल यांनी आज मोठा आर्थिक व्यवहार करू नये. फसगत होण्याचा धोका आहे. नवीन वाहन खरेदी करणे किंवा कोणत्याही क्षेत्रातील गुंतवणूक पूर्ण विचाराने व तज्ञांच्या सल्ल्याने करावी.
तूळ :–तुमच्या वागण्यातील पारदर्शकपणा आज तुमची प्रतिष्ठा वाढवणार आहे. शाळेच्या वयातील मित्रमैत्रिणींची भेट झाल्याने वयस्कर मंडळींचा आनंद गगनात मावणार नाही. लहान मुलांच्या शाळा प्रवेशाचा प्रश्र्न सुटेल.
वृश्र्चिक :–नात्यातील जवळच्याच लोकांकडून तुमच्या विरोधात गाँसिपींग केले जाईल. मन खंबीर करून सगळ्या कडे दुर्लक्ष करा. गाण्याच्या मैफलीत गाणे म्हणण्याची संधी मिळेल. चित्रकार मंडळी एकदम प्रसिद्धीच्या झोतात येथील.
धनु :–अपत्य प्राप्तीच्या इच्छूकांना गोड बातमी कळेल. नवीन घराचे रजिस्ट्रेशन करण्याची आज घाई करू नका. पतसंस्थेचे किंवा कोणतेही प्रकारचे खाजगी कर्ज घेतले असल्यास या महिन्याचा हप्ता देणे अवघड होणार आहे. प्रकृतीची तक्रार उद्भवेल.
मकर :–पोटदुखी, उदररोगाचा त्रास असलेल्यांनी दुर्लक्ष न करता विशेष काळजी घ्यावी. तात्विक बाबतीत भावंडांबरोबर वाद निर्माण होईल. नोकरीचे ठिकाण किंवा आँफीसमधील तुमच्या नेहमीच्या कामात बदल होईल. महिलांचे दैनंदिन कामातील कष्टातही अचानक वाढ होईल.
कुंभ :–मनातून ज्या गोष्टीची इच्छा करत आहात ती सत्यात उतरणार आहे असे संकेत मिळतील. कांही गोष्टी अशा घडतील की बोलाफुलाला गाठ पडेल. वृद्ध आई वडीलांकडून अतिशय मोलाता व महत्वाचा उपदेश मिळेल.
मीन :–तरूणांना कान ठणकण्याचा त्रास होईल. पुरूषाना महिलांकडून प्रेमाची भेट मिळेल. शाळेतील शिक्षकांचा अचानक कामाचा व्याप वाढेल. परदेशी असलेल्या मुलींना विवाहाचे प्रस्ताव येतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना स्वतःच्या कार्यक्षेत्राप्रमाणे संधी चालून येईल.
| शुभं-भवतु ||