Read in
बुधवार 03 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 03 फेब्रुवारी आज चंद्ररास कन्या 09:49 पर्यंत व नंतर तूळ. चंद्रनक्षत्र चित्रा 21:07 पर्यंत. आजचा दुपारी 02::12 पर्यंत शुभ आहे.
आजचा दिवस शस्त्रक्रियेकरीता शुभ असून कला शिक्षणास सुरूवात करण्यास, अभ्यासास सुरूवात करण्यास चांगला आहे. बाळाचे जावळ काढणे, कान टोचणे, बारसे करणे यासाठीही शुभ आहे.
वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आजचा दिवस सर्वच बाबतीत अतिशय लाभदायक आहे. आजारी व आँपरेशन झालेल्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसेल. कुटुंबातील अडचणींवर सर्वजण एकत्र बसून उपाय काढाल. राजकीय क्षेत्रातील मंडळीना विरोधक त्रास देणार आहेत तरी आज गप्प रहावे.
वृषभ :– जून्या नोकरीतील मागिल येणे मिळण्याचे मार्ग ओपन होतील. महिलांना ओटीपोट दुखण्याचा त्रास होईल. कमिशन एजंटना थटलेले कमिशन आज प्रत्यक्ष मिळेल. वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस करावी लागेल.
मिथुन:–पुरूष मंडळीना सासुरवाडीकडून व्यवसायासाठी मोठी मदत मिळेल. जागेचे, घराचे लिखीत स्वरूपाची जूनी कागदपत्रे सापडतील. रेल्वेने केलेला प्रवास त्रासदायक ठरेल. गुरूमंत्र घेतलेल्या उपासकांना अध्यात्मिक शक्तीचा अनुभव येईल.
कर्क :– नव्या नोकरीचे वेध लागलेल्या तरूणांनी केलेली अती घाई मानसिक त्रास देणारी ठरेल. परदेशी असलेल्यांना पुन: नव्या प्रोजेक्टमधे सामावून घेतले जाईल. लहान भावंडांबरोबर मोठ्या खरेदीचे व्यवहार होतील.
सिंह :– लहान मुलांच्या दाताना दुखापत होण्याचा धोका आहे तरी पडण्या धडपडण्यापासून काळजी घ्यावी लागेल. वयोवृद्ध व्यक्तीच्या आयुष्यातील महत्वाच्या क्षणांवर त्यांच्याचकडून विशेष चर्चा केली जाईल. जून्या डाँक्युमेंटरीच्या विषयाचा संदर्भ देतील.
कन्या :–तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावाने मोठ्या अवघड कामाची सुरूवात करून दाखवाल. लेखक व प्रकाशक यांना नवीनच विषयावरील माहितीपटाचे लेखन करण्याचे मार्ग सुचतील. लहान मुलांना एखादे बक्षिस मिळेल.
तूळ :–परदेशी असलेल्या नोकरदारांना अचानक नवीन पर्याय उपलब्ध होईल. बर्याच कालावधीपासून ज्या पत्राची अपेक्षा करत आहात ते अचानकपणे तुम्हाला मिळेल. महिलांना कोर्टातील कामासाठी शक्कल लढवावी लागेल. नोकरीत सहकारी वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल.
वृश्र्चिक :– वयोवृद्ध मंडळीना सुन, जावईकडून अतिशय प्रेमपूर्वक व्यवहार होईल. एकत्र कुटुंबात महत्वाच्या विषयावर एकमत होऊन विषयातून मार्ग निघेल. खाजगी शिकवणी वर्गातील शिक्षकांच्या मेहनतीला चांगले यश येईल.
धनु :–तरूणांना हक्का पेक्षा कर्त्तव्य श्रेष्ठ असल्याचा अनुभव येईल. सामाजिक स्तरावर प्रतिष्ठा वाढवणार्या घटना घडतील. विवाहेच्छूंना प्रेमातील व्यवहारात मानसिक समाधान मिळत नसल्याचे जाणवेल. आर्थिक गणिते विसकटतील तरी त्याची मानसिक तयारी ठेवा.
मकर :–कुटुंबात अचानक श्री गुरूमाऊलीचे आगमन होईल व लोकांची वर्दळ वाढेल. विद्यार्थ्यांना कलेच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग करण्याची संधी मिळेल. लेखक व कवी मंडळीना प्रक्षोभक विषयावरील विचारामुळे वादंगास तोंड द्यावे लागेल.
कुंभ :–घरातील पाळीव प्राण्यांच्या तब्बेतीची काळजी घ्यावी लागेल. वयस्कर मंडळीनी मनातील भावना व्यक्त करण्यास हरकत नाही. धार्मिक शिक्षणावरील तुम्ही केलेल्या टीकाना समाजाकडून विरोध होईल. वडीलांकडून आर्थिक प्राप्ती होईल.
मीन :–घरगुती ब्युटीपार्लरचा व्यवसाय करणार्यांनी समाजाच्या अपेक्षांना प्राधान्य द्यावे. मैदानी खेळाडूंनी मिळालेली संधी सोडू नये. बर्याच दिवसात न भेटलेल्या मित्राच्या आर्थिक अडचणीसाठी मदत करावी लागेल.
| शुभं-भवतु ||
Thank you Tai