Read in
मंगळवार 02 फेब्रुवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 02 फेब्रुवारी चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र हस्त 22:32 पर्यंत व नंतर चित्रा. संपूर्ण दिवस शुभ असल्याने महत्वाची कामे करण्यास हरकत नाही.
जसे नवीन दुकान सुरू करणे, एखाद्या वेगळ्याच विषयाच्या अभ्यासास सुरूवात करणे, संगीत, नृत्य अशा प्रकारच्या कला शिकण्यास ही तुम्ही आजपासून सुरूवात करू शकता. नव्या कपड्याची घडी मोडू शकता. नवीन घरात रहायला जायचे असेल तर शुभारंभ करायला चांगला दिवस आहे. नव्याने औषध घेण्यास सुरूवात करायची असेल तर आजचा दिवस एकदम शुभ आहे.
वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–बर्याच कालावधीपासून ज्यांची वडीलांबरोबर गाठभेट झालेली नाही त्यांची व वडीलांची भेट होईल व पितृसुखाचा आनंद मिळेल. ज्यांना आर्थिक गरज जाणवत आहे त्यानी बँकेकडून कर्ज मिळण्याच्या प्रयत्नाना आज सुरूवात करावी लवकरच काम होऊन जाईल.
वृषभ :–कोणतेही काम करताना लवकर व्हावे म्हणून कोणताच टप्पा वगळू नका. शिक्षकांकडून मुलांना नेहमीच्या पद्धतीबरोबरच नवीन पद्धतीची माहिती होईल. लहान सहान कारणावरून प्रवासात बाचाबाची होईल. विवाहेच्छूंना उत्तम व अपेक्षित जोडीदार निवडण्याची संधी मिळेल.
मिथुन :–बागकामाची हौस असलेल्यांनी केलेल्या प्रयोगाचे सर्वांकडून कौतुक होईल व चांगली प्रसिद्धीही मिळेल. नवीन वाहन खरेदी करण्याचे ठरले तरी घाई करू नका तुमचा विचार पक्का ठरला असला तरी पुन्हा विचार बदलणार आहेत.
कर्क :– लघुउद्योजक तसेच मोठे कमिशन एजंट यांनी आजचा आर्थिक व्यवहार जपून करावा. आज कोणासही शब्द देऊ नका. घरातील विश्र्वासाच्या नात्यात ही अचानक संशयाचे वातावरण निर्माण होईल पण हा फक्त विचारांचा खेळ आहे हे समझून घ्या.
सिंह :–अस्थमा, कफ किंवा कोणताही छातीचा विकार असलेल्यांनी दुर्लक्ष करू नये. डाँक्टरांवरील श्रद्धा कामाला येईल. वयस्कर मंडळीना व तरूण वर्गासही पाय व सांधेदुखीचा त्रास जाणवेल. एकत्र कुटुंबात सुग्रास जेवणाचा बेत जमेल.
कन्या :–मामाकडील घराकडून एखाद्या दैवी शक्तीचा लाभ होईल. अध्यात्मिक अभ्यास करणार्यांनी मामासाहेबांची भेट घ्यावी एखादे न उलगडलेले कोडे उलगडेल. मुलीच्या विवाहाचा प्रश्र्न नुसत्या चर्चेने हवेत विरून जाईल कोणाकडून कोणतीही कृती होणार नाही.
तूळ:–ज्यांच्या घशाला त्रास होत आहे त्यांनी डाँक्टरांकडे जावे स्वरयंत्राबाबत एखादी तक्रार निर्माण होऊ शकते. वृद्धाश्रमात राहणार्यांना आज आपली कला दाखवता येणार आहे. एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याचे काम तुमच्याकडे येणार आहे.
वृश्र्चिक :–त्वचाविकाराचा त्रास असलेल्यांना अती बेफिकीरी मुळे त्रासात वाढ होणार आहे. मित्राच्या वाढदिवसासाठी महागड्या वस्तूची खरेदी कराल. तुम्ही केलेल्या आर्थिक नियोजनाचे आज बारा वाजणार आहेत.
धनु :–शेअरमार्केट मध्ये अँक्टीव्ह असाल तर आजचा दिवस अचानक नुकसान करणारा आहे तरी व्यवहार सावधपणे करा. नवीन मित्रमैत्रिणींबरोबर लहानशा पार्टीचा आनंद घेता येणार आहे. कौटुंबिक चर्चा रंगतदार होईल व चेष्टा मस्करीत वेळ जाईल.
मकर :–व्यायाम करणारे, जीमला जाणारे यांना त्यांच्या आंतरिक उर्जेची जाणीव होईल. चुलत नात्याकडून तुम्हाला गोडशी भेट मिळेल व अचानक सुखावून जाल. वडीलांच्या प्रेस्टीजमुळे तुमचे अडलेले काम होऊन जाईल.
कुंभ :–पाण्याच्या ठिकाणापासून लहानग्यांना सांभाळा तसेच तान्ह्या बाळांची काळजी घ्यावी लागेल. वयोवृद्ध महिलांकडून मोलाची माहिती मिळेल. बँकेतील रखडलेले काम मार्गी लावण्याकरता आईला किंवा आज्जीला बरोबर घेऊन जा काम फत्ते होईल.
मीन :–घरातील नेहमीच्याच ठिकाणी ठेवलेली महत्वाची वस्तू सापडणार नाही. नोकरीतील मोठ्या कारणांकरीता सरकारी कार्यालयात होणार्या चर्चेच्या मिटींगची सूत्रे तुमच्या हातात असणार आहेत. खाजगी क्षेत्रातील अधिकार्यांना मनाविरुद्ध निर्णयप्रक्रियेत सहभाग घ्यावा लागेल.
| शुभं-भवतु ||
Thank you Tai