daily horoscope

सोमवार 01 फेब्रूवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

सोमवार 01 फेब्रूवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य

सोमवार 01 फेब्रूवारी 2021 आज चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी 23:57  पर्यंत व नंतर हस्त. आजचा दिवस शुभ असल्याने महत्वाची कामे करण्यास हरकत नाही.

daily horoscope

 

वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–काम करण्यास एकदम हुरूप येईल. कौटुंबिक पातळीवर समाधान लाभेल.  विद्यार्थ्यांना त्यांचे यश आवाक्यात आल्याचे जाणवेल. नोकरीत कामाचा ताण वाढल्याने वाढल्याने ब्लडप्रेशरचा त्रास संभवतो तरी मनावर संयम ठेवावा लागेल.

 

वृषभ :–एकत्र कुटुंबात कोणत्याही जनरल विषयावरही चर्चा करण्याचे टाळा. प्रत्येक व्यक्तीबरोबर सौम्यपणाने वागल्यास वाद निर्माण होणार नाहीत. कुलदैवताच्या उपासनेने मानसिक शक्ती वाढत असल्याचा अनुभव येईल. पतीपत्नीमधे आज फारसे ट्युनिंग जमणार नाही.

 

मिथुन :–घरातील भाडेकरूंकडून त्रास संभवतो. भागिदारीच्या व्यवसायातील महत्वाच्या विषयांवर वडीलांकडून महत्वाच्या टीप्स मिळतील तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका. भावाबहिणीतील वाद, मतभेद संपवण्यास हीच योग्य वेळ आहे तरी पुढाकार घ्या.

 

कर्क :–विवाहेच्छू मुलांना त्यांच्या अपेक्षेत बसणारी वधू मिळेल का याची चिंता लागेल.  सुखाच्या कल्पनांना मर्यादा घाला. आईवडीलांकरीता कुलदेवीला जाण्यासाठी प्रवासाचा बेत आखावा लागेल. स्पर्धा, चढाओढ, वादविवाद यात तुम्ही बाजी माराल.

 

सिंह :–नोकरीच्या ठिकाणी तुमच्या बुद्धीची प्रगल्भता पाहून वरिष्ठांकडून कौतुक होईल. हातातील पोजेक्ट मार्गी लावाल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांनी आपल्याला नक्की काय पाहिजे आहे हे ठरवावे व नंतरच प्रयत्न करावा.

 

कन्या :–स्वत:च्या  मुलांच्या अभ्यासातील प्रगती पाहून मनाला समाधान वाटेल. आँन लाईन शिकवणार्या शिक्षकांना  आपल्या प्रयोगाचे फलित पहावयास मिळेल. लहान मुलांकडून त्यांच्या  चतुरपणाचा अनुभवाने अचंबित व्हाल.

 

तूळ :–तरूणां कडून अचानक खाण्यापिण्यावर मोठा खर्च होईल. सरकारी नोकरदारांना शासनाकडून एखादा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे कळेल. गर्भवती महिलांनी फार शारिरीक घेऊ नयेत. आजारी व आँपरेशन झालेल्यांनी विशेष काळजी घ्यावी.

 

वृश्र्चिक :–ज्यांनी नव्याने काही उद्धोग सुरू केला आहे त्यांनी आपल्या सहकार्‍यांची मदत घेतल्यास क्लायंटमध्ये चांगली वाढ होईल. गुडघे व पायदुखीच्या  मंडळीना आपला त्रास कमी होऊ लागल्याचे जाणवेल. हाती आलेल्या पैशाचा योग्य वापर करा.

 

धनु :–उच्चशिक्षण घेणार्‍याना त्याच्या मार्गातील अडथळे दूर होऊ लागल्याचे जाणवेल. परदेशी असलेल्या मुलांना भारतात परतण्याची ओढ लागेल. तुमच्या अंदाजानुसार नव्याने गुंतवणूक करायला हरकत नाही. त्यात इतरांचा सल्ला घेऊ नका.

 

मकर :–तुमच्या न्यायालयातील कामासाठी तेथील कर्मचार्यांबरोबर जवळीक साधू नका व आर्थिक व्यवहाराचा प्रयत्नही करू नका. आईच्या प्रकृतीत अचानक चढउतार होईल. तुमच्यापासून लांब असेल तर लगेच चौकशी करा.

 

कुंभ :–खाजगी कंपनीतील उच्चपदस्थांनी बोलताना पूर्ण अभ्यासून बोलावे. प्रथम लूपहोलचा विचार करावा. व्यावसायिक क्षेत्रातील अंदाज अचूक निघतील. मधुमेहीनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवल्यास काहीही काळजी करावी लागणार नाही.

 

मीन :–अचानक एखाद्या पार्टीला जाण्याचा योग येईल. वयस्कर मंडळीना सुग्रास भोजनाचा आनंद घेता येणार आहे. महिलांना आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर मनमोकळे करता येईल. रिकाम्या जागेबाबत भावाभावातील आर्थिक  व्यवहाराबाबत चर्चा होईल.

| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *