weekly-horoscope-2020

रविवार 31 जानेवारी 2021 ते शनिवार 06 फेब्रूवारी 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य

Read in
रविवार 31 जानेवारी 2021 ते शनिवार 06 फेब्रूवारी 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य

रविवार 31 चंद्ररास सिंह 30:57 पर्यंत व चंद्र नक्षत्र पूर्वाफाल्गुनी 25:17 पर्यंत. सोमवार 01 फेब्रूवारी चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी 23:57  पर्यंत व नंतर हस्त.

weekly-horoscope-2020

मंगळवार 02 फेब्रूवारी चंद्ररास कन्या दिवसरात्र. चंद्रनक्षत्र हस्त 22:32 पर्यंत व नंतर चित्रा. बुधवार 03 फेब्रूवारी चंद्ररास कन्या 09:49 पर्यंत व नंतर तूळ. चंद्रनक्षत्र चित्रा 21:07 पर्यंत व नंतर स्वाती. गुरूवार 04 फेब्रूवारी चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र स्वाती 19:44 पर्यंत व नंतर विशाखा. शुक्रवार 05 फेब्रूवारी चंद्ररास तूळ 12:46 पर्यंत व नंतर वृश्चिक. चंद्र नक्षत्र विशाखा 18:27 पर्यंत व नंतर अनुराधा. शनिवार 06 फेब्रूवारी चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व नंतर चंद्रनक्षत्र अनुराधा 17:17 पर्यंत व नंतर ज्येष्ठा.

31 रविवार संकष्ट चतुर्थी मुबई चंद्रोदय 21:04.

04 गुरूवार  कालाष्टमी, बुधाचा वक्र गतीने मकर राशीत प्रवेश 23:03 वाजता.

05 शुक्रवार रविचा धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश 31:12  वाजता.

वरील सर्व राशी नक्षत्रांचा विचार करून व रोजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

 

मेष :–31  रोजी प्रथम अपत्याकडून आनंदाची व समाधान देणारी बातमी कळेल. 4 व 5  या दोन दिवसात व्यवसायातील गणिते मनासारखी जुळतील. आर्थिक बाबतीत नव्याने विचार करण्याची गरज भासणार नाही. 1, 2 व 3 रोजी नोकरीतील कामाचा ताण जबरदस्त वाढेल आपण शांत कसे रहावे याचा विचार करावा लागेल. ब्लडप्रेशरचा त्रास असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी. 06 रोजी आर्थिक व्यवहार करू नयेत. चेक देणे घेणे काळजीपूर्वक करावे.

 

वृषभ :–गावाकडील शेती बागायत बाबतीत आनंदाची बातमी कळेल. आईच्या जीवावर सोपवलेले काम चोखपणे बजावले जाईल. 1,2 व 3 रोजी कुटुंबातील वादग्रस्त विषयावर चर्चा करू नका. चर्चेचे रूपांतर वादामधे होण्याचा धोका आहे. 6 रोजी व्यवसायिक क्षेत्रात तुमची मनमानी चालणार नाही. व्यवहारिक पातळीवर सावधपणे व्यवहार करा. 4 व 5 रोजी मौल्यवान वस्तूच्या बाबतीत किंवा महत्च्याच्या कागदपत्रांच्या बाबतीत चोरीची भिती राहील. तरी काळजी घ्या.

 

मिथुन :– 31  रोजी महत्वाचा पत्रव्यवहार करायला हरकत नाही. बरेच दिवसापासून रखडलेला व्यवहाराला आज सुरूवात होईल. 1 2 व 3 रोजी परगावी असलेल्या आईची अचानक भेट घेण्याचे ठरेल व प्रत्यक्षात भेटही होईल. वयस्कर मंडळींना मानेचे दुखणे त्रास देईल. 06 रोजी आजोळकडील कांही महत्वाच्या न्यायालयीन कामकाजाबाबत चर्चा होईल. त्या कामात तुमची गरज निर्माण होईल. 4 व 5  रोजी मुलांच्या अभ्यासातील प्रगतीबाबत चिंता निर्माण होईल.

 

कर्क :– 31 रोजी पैसे मिळवण्याच्या नादात स्वत:वर संकट ओढवून घ्याल. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका. लहान भावाकडील ख्याली खुशाली बाबत काहीच कळत नसल्याने मानसिक ताण वाढेल. मित्रांची मदत घेऊन अवघड प्रश्र्न सोडवाल. 1, 2 व 3 रोजी गूढशाश्त्राच्या अभ्यासकांना आत्मशक्तीचा अनुभव येईल. ़मनाची शक्ती वाढेल. 4 व 5 रोजी ज्या पाळीव प्राण्याची अपेक्षा करत होता त्याचीच प्राप्ती होईल. घाई करू नका. 06 रोजी प्रेमाच्या व्यवहारातील अडचणी दूर होतील व विचारांना योग्य दिशा मिळेल.

 

सिंह :– 31 रोजी स्वभावातील करारीपणामुळे आफीसमध्ये विनाकारण दहशत निर्माण होईल.  रजेचा प्रश्र्न सोडवण्याकडे कल राहील. 1, 2 व 3 रोजी तुमच्या हातातील प्रोजेक्टला तज्ञांकडून मान्यता मिळेल व सर्वांकडून कौतुक होईल. परदेशी जाऊ इच्छिणार्यांना आपल्या कामाचा अंदाज येईल. 06 रोजी नवीन जमीन, फ्लाइट घेण्याचा विचार पक्का होईल अती विश्र्वासाने व्यवहार करू नका. 4 व 5 रोजी बघता बघता एखादी वस्तू हरवेल. आज महत्वाच्या वस्तूंत काळजी घ्या.

 

कन्या :–06 रोजी न्यायप्रविष्ट बाबींची फार चर्चा करू नका. इतरांच्या हस्तक्षेपाने काम बिघडण्याचा धोका निर्माण होईल. 4 व 5 रोजी नोकरीतील मागील येणे मिळण्याचे मार्ग खुले होतील. तरी आता विचारणा करायला हरकत नाही. 1, 2 व 3 रोजी मनाची अंतरिक शक्ती वाढेल. जी कामे करताना भिती वाटत होती त्याच कामाबाबतचा आत्मविश्वास वाढेल.

 

तूळ :–31 रोजी व्यवसायात मित्र, व सहकार्‍यांच्या मदतीने मोठी उडी घेण्याचे ठरेल तरीही स्वत:चा आवाका अजमाउन बघा. 4 व 5 रोजी कुटुंबातील सदस्यांचा सर्वच कामात चांगला पाठींबा मिळेल. वडिलांच्या नात्यातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चौकशी करा त्यांना तुमच्या मदतीची गरज आसणार आहे. 06 रोजी बँकेतील कर्ज प्रकरणासाठी बँकेकडून बोलावणे येईल. 1  2  व 3 रोजी परदेश प्रवासाचे बेत नक्की होतील.

 

वृश्र्चिक :–31 रोजी लहान उद्धोजकांना मोठी संधी मिळण्याचे संकेत मिळतील. उत्पादन क्षेत्रात अचानक चांगली वाढ होईल. 1, 2 व 3 रोजी पायदुखीचा त्रास असणार्‍यांना अचानक फरक पडल्याचे जाणवेल. आँपरेशन झालेल्या महिलांना आंतरिक बळ मिळेल व त्यामुळे समाधान वाटेल. 06 रोजी तुमच्या मनातील इच्छा व अपेक्षा मित्रमंडळीजवळ व्यक्त करण्याची इच्छा निर्माण होईल. 4 व 5 रोजी दवाखान्यात अँडमिट असलेल्यांना डिसचार्ज मिळेल.

 

धनु :–31 रोजी वडीलांच्या मदतीने प्रगतीची दारे उघडली जातील लहान व घरगुती व्यवसायात  आईकडील नात्याची आर्थिक व मानसिक मदत मिळेल. 1, 2 व 3 रोजी बर्याच कालावधीपासून रूळावरून घसरलेली गाडी रूळावर येऊ लागल्याचे जाणवेल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अचानक प्रगती होऊ लागेल. 06 रोजी पित्ताचा व डोकेदुखीचा त्रास जाणवेल. तरी जागरण करू नये व आहारावर संयम ठेवावा. 4 व 5 रोजी तुमच्या इच्छा फलद्रूप होणार असल्याचे संकेत मिळतील.

 

मकर :–06 रोजी कामातील अडचणींवर सहकार्‍यांच्या सल्ल्याने मात कराल. प्रत्यक्ष फिल्ड वर्क करणार्यांना अडचणी आ तोंड द्यावे लागेल पण त्याच वेळी तुम्ही स्वत:ला सिद्ध करून दाखवाल. 4 व 5 रोजी वयस्कर मंडळीना पाय व गुडघेदुखीचा क्त्रास जाणवेल. मधुमेही व्यक्तींनी पायांची काळजी घ्यावी. 1, 2 व 3 रोजी तज्ञ व आदरणिय व्यक्तींकडून मोलाचा सल्ला मिळेल. न्यायालयातील कामकाजाबाबत केलेली घाई त्रासदायक ठरेल.

 

कुंभ :–31 रोजी व्यवसायातील नव्या विचारांना चालना मिळेल. 4 व 5 रोजी तुमच्या कामाच्या ठिकाणी आदरणिय व्यक्तींबरोबर भेट होईल. 1, 2 व 3 रोजी व्यवसायातील गणिते अचूक ठरल्याबद्दल वरिष्ठांकडून कौतुक होईल. नवीन व महत्वाचे निर्णय अतिशय विचाराने घ्यावे लागतील. 06 रोजी बँकेतील कर्ज फेडीबाबतचा तगादा मानसिक ताण वाढवेल. सर्व गोष्टी विचाराने व शांततेने हाताळला.

 

मीन :–06 रोजी कामातील फायद्याच्या विचाराने मानसिक सुख मिळेल. उत्पादन क्षेत्रात अचानक मोठी आँर्डर मिळून मोठी कमाईची संधी मिळेल.1, 2 व 3 रोजी गद्ध्यलेखन व काव्यलेखनाच्या क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. महिलांना त्यानी केलेल्या कवितांचे जाहीर वाचन करण्याची संधी मिळेल. 31 रोजी नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन नोकरीच्या क्षेत्रांची माहिती मिळेल. 4 व 5 रोजी सध्या कोणत्याही परिस्थितीत कर्ज काढू नका व कोणाला उधारी देऊ नका.

|| शुभं-भवतु ||

 

One thought on “रविवार 31 जानेवारी 2021 ते शनिवार 06 फेब्रूवारी 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *