Read in
शनिवार 30 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 30 जानेवारी आज चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा 26:27 पर्यंत व नंतर पूर्वा फाल्गुनी. आजचा दिवस चांगला आहे.
वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–मुलांकडून एखादे कौतुकास्पद धाडसी कृत्य घडल्याचे कळेल. सरकारी नोकरदारांना अचानक त्यांचे अधिकारात काटछाट केस्याचे समजेल. शिक्षक, अध्यापकांना विद्यार्थ्यांच्या काळजीने मानसिक ताण येईल. आँन लाईनच्या शिकवण्यात काय व कसा बदल करावा याचे कोडे पडेल.
वृषभ :–आज तुम्हाला जो कांही प्रकृतीचा त्रास जाणवेल त्याविषयी मनात भिती निर्माण होईल व आपल्याला कांहीतरी मोठा रोग झाल्याचे विचार त्रास देतील. व्यवसायिक मंडळीना सर्वच गोष्टी दूषित दिसतील. मित्राचे बँकेचे कर्ज प्रकरण तुम्हाला त्रासदायक ठरेल.
मिथुन :–डोक्यावरचा भार उतरवण्यासाठी केलेल्या उपायाने मानसिक त्रास वाढेल. आर्थिक बाबतीतील वृद्धी ने सुद्धा मनाचे समाधान होणार नाही. राग येणे टाळता येत नसेल तर आज मौन पाळा. कोणत्याही प्रकारची लाँटरी किंवा कोणत्याही शेअर्समध्ये आज पैसे गुंतवू नका.
कर्क :–आज घसा दुखण्याचा त्रास होईल. गायक मंडळीना अचानक आपला स्वर लागत नसल्याचे जाणवेल. तरूणांचे विचार नियमांना धरून नसल्याचे सर्वांच्याच लक्षात येईल. नोकरीतील सहकार्यांच्या मदतीने अवघड व रखडलेली कामेही मार्गी लागतील. आईकडून आर्थिक लाभ होईल.
सिंह :– शाळकरी विद्यार्थ्यांना आपले ध्येय गाठण्यासाठीचा मार्ग दृष्टीपथात येईल. चेहर्यावरील तेजस्वीपणात वाढ झाल्याचे जाणवेल. स्कीनचा त्रास असलेल्यांना तर अचानक कांहीतरी पाँझिटीव्ह बदल झाल्याचे जाणवेल. मित्रमैत्रिणींकडून प्रेमाचा वर्षाव होईल.
कन्या :–आजचा दिवस जरी चांगला असला तरी तुमच्यासाठी त्रासदायक आहे. कोणतेही महत्वाचे काम करू नका. कुटुंबात पत्नीबरोबर किंवा आईबरोबर विनाकारण वाद निर्माण होतील. महिलांनी आज सर्व व्यवहार मुक्याने केल्यास वादाचे प्रसंग निर्माण होणार नाहीत.
तूळ :–तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असलात तरी तुम्हाला आज सरकारी क्षेत्रातील योजना किंवा तत्सम बाबींपासून लाभ होईल. वडीलधार्या व्यक्तीच्या सल्ल्याने कामाचे नियोजन करा. प्रेमाच्या व्यवहारातील मैत्री घट्ट होत असल्याचे जाणवेल मनातील संशयाचे भूत संपवून टाका.
वृश्र्चिक :–पुरूष मंडळीना सासूबाईं बरोबर प्रवासात सोबतीसाठी जावे लागेल. सरकारी नोकरीत असलेल्यांना अचानक विशेष अधिकार दिले जातील. नातवंडे सांभाळण्याची जबाबदारी तुमच्यावर असेल तर त्याना पडण्या धडपडण्यातून ईजा होण्याचा धोका आहे तरी काळजी घ्या.
धनु :–पदव्युत्तर शिक्षणाची सोय होईल. शिक्षणाच्या बाबतीतील असलेले अडथळे दूर होऊ लागतील. प्रायव्हेट कोचिंग क्लासचा चांगला उपयोग होत असल्याचे दिसून येईल. लेखन करणार्या नवोदित लेखकांना वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रात विशेष कौतुक होईल.
मकर :–आज तुमच्या स्वभावातील राग संतापाची प्रक्रिया अचानक उफाळून येईल. वरच्या हुद्द्यावर असलेल्यांनी मनावर संयम ठेवावा अन्यथा हाताखालील लोकांना गाँसिपींगला संधी मिळेल. गद्ध्यलेखन व काव्यलेखनाच्या क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल.
कुंभ :–नोकरीत वरिष्ठांबरोबरचे संबंध अचानक बिघडत चालल्याचे जाणवेल. आपलेच विचार आपणच तपासून बघण्याची गरज निर्माण होईल. आजच्या प्रसंगाची तुलना जून्या घटनेशी न लावता या प्रसंगाकडे तिर्हाईत नजरेने बघा.
मीन :–नोकरीच्या ठिकाणी जूने राहिलेले अँरिअर्स मिळण्याचा निरोप मिळेल. महिलांना महत्वाच्या कामासाठी दुसर्या आँफीसला जावे लागेल. बद्धकोष्ठतेचा त्रास असणार्यांनी त्रासामागच्या कारणांचा विचार करावा. तरूणांना पित्ताचा त्रास होईल.
| शुभं-भवतु ||
Thank you Tai