Read in
शुक्रवार 29 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 29 जानेवारी आज चंद्ररास कर्क 27:20 पर्यंत व नंतर सिंह. चंद्रनक्षत्र आश्लेषा 27:20 पर्यंत व नंतर मघा. आज कोणतेही काम करण्यास दिवस चांगला आहे.
वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– आज तुमच्या मुलांपुढे तुमचे काहीही चालणार नाही. बालवयातील मुलांचा हट्ट पुरवावा लागेल व मोठ्या मुलांसमोर गप्प बसावे लागेल. पतिराजांना पत्नीकडून पुरेपूर प्रेमाचा वर्षाव होईल. व्यवसायातील गणिते अचूक ठरतील.
वृषभ :–सकाळ संध्याकाळ मनात एकच विचार घोळत राहील. विचारांपासून दूर होण्याचा प्रयत्न करा. वयस्कर मंडळीना कफ खोकल्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांनी अवघड वाटणारा विषय नव्याने शिकण्यास आजपासून सुरूवात केल्यास विषयाची आवड निर्माण होईल.
मिथुन :–वयस्कर मंडळींच्या अचानक बरगड्या, हात व खांदे दुखी सुरू होईल. तरी काळजी घ्यावी. गायक मंडळीना आपल्या गायकीमुळे एकदम प्रसिद्धी मिळेल. अपचनाचा किंवा अँसिडीटीचा त्रास असलेल्यांनी डाँक्टरांचा सल्ला घ्यावा.
कर्क :–आश्रम शाळेत राहणारे, वसतीगृहात राहणारे यांनी आपल्या मनावर संयम ठेवण्याची गरज आहे. सायकल, स्कूटर, बाईक चालवणार्यांनी उगीचच स्टंटबाजी करू नये त्यात दुखापत होण्याचा धोका आहे. मोठ्या भावाला मदतीची गरज लागेल.
सिंह :–स्वत: केलेले नियम स्वत:लाच अडचणीत आणतील. व्यवसायात हाताखालील कर्मचार्यांबरोबर आपुलकीने वागावे लागेल. कोणालाही शब्दानेही दुखवू नका. कुटुंबातील ज्येष्ठांच्या बरोबर प्रवासाचा योग आहे. महत्वाची कामे आज करू नका उद्यावर टाका.
कन्या :–बँकेतील व्यवहार स्वत: हजर राहून करावेत. अचानक मोठ्या माँल मधे जाऊन खरेदी कराल. तरूणांच्या प्रकृतीत रेग्युलर चेकअप करून सुद्धा तब्बेतीत अचानक बिघाड निर्माण झाल्याचे कळेल. . महिलांनी मनावरील ओझे व्यक्त होऊन मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा.
तूळ :–व्यवसायातील उधार उसनवारीस कोणासही जामिन राहू नका. तुमच्या हस्तक्षेपामुळे दुसर्यांचे नुकसान होईल. बुक केलेल्या घराबाबत फार मोठा प्रश्र्न निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासातील प्रगतीचा आढावा घ्यावा.
वृश्र्चिक :–तरूणांना व मोठ्यांनाही वडीलांकडून मोलाचे सहकार्य मिळेल व अडचणींच्या परिस्थितीतून योग्य मार्ग निघेल. खाजगी शिकवणी वर्गातील शिक्षकांच्या मेहनतीला चांगले यश येईल व त्यांचे नावही होईल.
धनु :–हातातील पैसे खर्च करताना आपण काय करत आहोत याचे भान राहणार नाही. मित्रांचा किंवा मोठ्यांचा सल्ला घ्या. तुमच्या कांही दुर्गुणांवर चर्चा करण्यासाठी जवळचे नातेवाईक एकत्र येतील. विद्यार्थ्यांनी मोठ्यांचा विश्र्वास संपादन करावा.
मकर :–मनातील विचार व भावना सहकार्याबरोबर व्यक्त करा. कोणत्याही फायद्यासाठी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका. घराचे नूतनीकरण करण्याचे विचार वेग घेतील. खाजगी क्षेत्रातील पदधिकार्यांना सहकार्यांकडून व हाताखालील वर्गाकडून विरोध होईल.
कुंभ :– येणारे दोन दिवस अचानक झोपेचे प्रमाण वाढेल. कुटुंबात आई वडीलांचे मुलाबरोबरचे ट्युनिंग एकदम मस्त बनेल. व्यवसायात दिलेल्या वेळेत काम पूर्ण करून दाखवाल व तुमच्यामुळे कंपनीला क्रेडीट मिळेल.
मीन :–कुटुंबातील मंडळी वीकेंडला आनंद लुटण्यासाठी मोठी योजना करतील व त्याची जबाबदारी तुमच्यावर असेल. व्यवसायिक क्षेत्रातील जून्या वायद्यासाठी मानसिक ताण येईल. पण सहकारी व कर्मचाऱ्यांची यांची चांगली साथ मिळणार आहे.
| शुभं-भवतु ||
Thank you Tai