Read in
गुरूवार 28 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 28 जानेवारी आज चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य 27:50 पर्यंत आहे व नंतर आश्लेषा आहे.
वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज शाकंभरी पौर्णिमा असून शाकंभरी नवरात्राची समाप्ती आहे. तसेच गुरूपुष्यामृतयोग योग 07:16 ते 27:50 पर्यंत आहे.
मेष :–.वडीलांकडून तुम्हाला मिळालेले जे गुण आहेत त्यांचा तुमच्या जीवनात कसा उपयोग होतो त्याचा तुम्हाला अनुभव येईल. नोकरीतील अडचणींच्या प्रसंगावर मात करून काम यशस्वी करण्यातील तुमचा हातखंडा पाहून बाँसलाही आश्र्चर्य वाटेल.
वृषभ :–विद्यार्थ्यांना त्याच्या अभ्यासात कांही प्रमाणात अडथळे येत असल्याचे जाणवेल. घर बदलण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांच्या मनात अनेक शंका निर्माण होणार आहेत. तरी सध्या नवीन घराचा विषय बंद करा.
मिथुन :–नवीन धनार्जनाचे मार्ग सापडतील. महिलांना दागदागिने घालुन नटण्या समजण्याची संधी मिळेल. कौटुंबिक सुखामधे आज वाढ होणार आहे. बँकबँलन्सच्या बाबतीत तुम्हाला फारच जागरूक रहावे लागेल.
कर्क :–कुटुंबात लागणार्या चैनीच्या वस्तूंची सहजपणे न विचार करता खरेदी कराल. रेग्युलर शिक्षणव्यवस्थेमधे सामावलेल्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या जीवावर यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आईबरोबर आनंदाचे बोलणे घडेल.
सिंह :– लवकरच तुमच्या नोकरीतील होणार्या बदलासाठी तुमची मानसिक तयारी तुम्हाला करावी लागेल. बर्याच दिवसापासून आजारी असलेल्या व्यक्तींना आपली आजारातून मुक्तता होत असल्याचे जाणवेल.
कन्या :–एखादी निवडणूक लढवण्याचा विचार करत असाल तर सध्या तो विचार सोडून द्या. बर्याच दिवसानंतर भाऊबहिणीची प्रत्यक्ष भेट होईल. लहान मुलांना घेऊन बाहेर जाताना त्यांचा हात सोडू नका.
तूळ :–महिलांना त्यांच्या करत असलेल्या कार्याबद्धल मोठे कौतुकाचे शब्द मिळतील. कुटुंबात वारसा हक्काची बोलणी सुरू होऊन त्यातील सर्व प्रश्र्न सहजपणे सुटतील. बँकेचे व्यवहार डोळसपणाने केल्यास नुकसान होणार नाही.
वृश्र्चिक :–वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्याबद्दल दंड भरावा लागणार आहे तरी जागरूकतेने वाहन चालवा. उच्च शिक्षणातील बारकाव्यांची माहिती घेतल्याने आता निर्णयापर्यंत येता येईल. पूर्वी ठरवलेला प्रवासाचा बेत बदलावा लागेल.
धनु :– अती वाचनाने किंवा वाहनप्रवासामुळे डोळ्यांचा त्रास जाणवेल. अध्यात्मिक उपासकांना उपासनेच्या बळाचा लाभ होईल. श्री गुरूमाऊलीची वरदहस्त लाभेल. लहान मुलांच्या अभ्यासातील अडथळे कमी होऊ लागतील.
मकर :–महिलांना आजचा दिवस अतिशय कष्टाचा जाणार आहे. नोकरीच्या ठिकाणीही स्वत:च्या कामाबरोबर दुसर्यांच्या कामाची जबाबदारीही स्विकारावी लागेल. मित्राच्या मदतीसाठी तातडीने प्रवास करावा लागेल.
कुंभ :– आरोग्यात होणार्या सुधारणेमुळे तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना अतिशय आनंद होईल. परदेशी राहणार्या तरूणांना घरचे वेध लागतील व मानसिक त्रास होईल. सल्लागार केंद्रातील अधिकार्यांना अतिशय मनस्ताप होणार्या प्रश्र्नांना सामोरे जावे लागेल.
मीन :– श्री गुरूमाऊलीच्या कृपेने संकटापूर्वीच संकटाची चाहूल लागेल. सूचक स्वप्ने किंवा घटनांचा अर्थ समजून घ्या. खर्चाचे प्रमाणही अचानक वाढेल. विनाकारण जवळच्या नात्याकडून मनस्तापाच्या घटना घडतील.
| शुभं-भवतु ||
Dhanyawad Tai