Read in
बुधवार 27 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 27 जानेवारी आज चंद्ररास मिथुन 21:42 व नंतर कर्क. चंद्रनक्षत्र पुनर्वसु २७:48 पर्यंत व नंतर पुष्य. आज शुक्राचा मकर राशीत प्रवेश 27:29 ला करत आहे. आजचा दिवस शुभ आहे.
वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आज तुमच्या स्वभावातील रागीटपणाला तुम्हाला वाट मोकळी करून द्यावी लागेल. वाद्य वाजविण्यास शिकवणार्या ना योग्य गुरूची भेट होईल. तरूण मुलामुलींना दाताचा जूना त्रास पुन्हा त्रास देऊ लागेल. धान्याच्या रिटेल दुकानदारांना अचानक मोठा फायदा होईल.
वृषभ :–लहान घरगुती व्यवसायात नवनव्यावस्तूंची वाढ केल्यास कस्टमर संख्येत वाढ होईल. सरकारी योजनांतून तुंम्हाला चालवता येणार्या योजनेचा शोध घ्या. काल परवापर्यंत न कळत्या वयातील मुले अचानक शहाणी व समजूतदार झाल्याचे जाणवेल.
मिथुन :– कोणतेही नवीन काम करताना मित्रमंडळींऐवजी मोठ्यांचा सल्ला घ्या ज्यांचे कामात फक्त काँम्प्युटरचा वापर होतो त्यांच्याकडून अचानक चुका होण्याचा संभव आहे. बँकेतील कर्मचार्यांनी स्वत:चे काम स्वत:च करावे इतरांची फारशी मदत घेऊ नये.
कर्क :– गर्भवती महिलांनी इतरांनी सांगितलेले सल्ले मानण्यापेक्षा डाँक्टरांचा सल्ला मानावा. ज्यांच्या पायाचे आँपरेशन झाले आहे त्यांनी कोणत्याही प्रकारची घाई करू नये. लहान मुलांच्या हातातील खेळण्याकडे लक्ष द्यावे लागेल. मुलांना व थोराना गच्चीच्या कठड्यापासून जपा.
सिंह :–बागकाम करणार्यांना नवीन फंडा सापडेल. मैत्रीच्या संबंधातून मानसिक त्रासावर उपाय सापडेल. जवळच्या नात्यातील मंडळींच्या भेटीतून नवीन उर्जा मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींची सेवा करण्याची गरज निर्माण होईल. मुलांना आवडता पदार्थ खाण्याची संधी मिळेल.
कन्या :– माहेरी आलेल्या मुलीकडून अडलेल्या कामावर उपाय सापडेल.विवाहेच्छूंना आपल्या अपेक्षेत बसणारे स्थळ सांगून येईल. पूर्वी ठरवलेला प्रवासाचा बेत बदलावा लागेल. व्यवसायातील उधारी न मागता आपणहून वसूल होईल.
तूळ :–व्यवसायात लागणारे आर्थिक मदत मित्रांकडून पूर्ण केली जाईल. कलाकार मंडळीना समाजाला आवडणार्या विषयावर कला सादर करता येणार आहे. ज्याचे राहते घर विकावयाचे आहे त्यानी नियमाला अनुसरून बोलावे मनात येईल ते बोलू नये.
वृश्र्चिक :–घर दुरूस्ती वा लहान कामाचे काँट्रॅक्ट घेणार्यांना नवीन संधी मिळणार आहेत. सिव्हील इंजिनीअर्सनी आपली चिकाटी वाढवल्यास मार्केटमधे तुमचे नाव घेतले जाईल. लहान मुलांच्या पायाना फोड आलेले दिसतील. लहान मुलांना अग्नी पासून जपावे लागेल.
धनु :– विचारशक्तीला आवर घालावा लागेल. आपल्या चुका झाकण्यासाठी इतरांना बदनाम करू नका. शालेय विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखून यशासाठी अभ्यासात प्रगती करावी. आई वडीलांना तुमच्याकडून एखादी गोडशी भेट मिळेल. गणित शाखेच्या विद्यार्थांना अवघड गणिते येऊ लागतील.
मकर :– तुमच्या तोंडातून निघालेल्या एका शब्दांचा विपर्यास होऊन मानसिक क्लेश होतील. सरकारी क्षेत्रातील उच्चपदाधिकार्यांनी आज कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत. ज्येष्ठांनी आपले मत व्यक्त करताना निष्पाप भरडले जाणार नाहीत याची दखल घ्यावी.
कुंभ :–विद्यार्थी वसतिगृहे, महिला हाँस्टेल येथील पर्यवेक्षकांना आडचणीत आणण्याचे प्रयत्न निष्फळ ठरतील. वकील मंडळीनी आपल्या कामाशिवाय इतर विषयात हात घालू नये. मुलींच्या अपेक्षांचा विचार न करताच त्याच्यावर चर्चेची झोड उठेल.
मीन :–तुम्हाला न पटणारे नियमही तुम्हाला पाळावे लागणार आहेत हे लक्षांत ठेवा. . कलाकार, चित्रकार व पेंटर्स मंडळीना आपल्या कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रवासात तिकीट न काढता बेफिकीरीने वागू नका. तरूणांना पित्ताचा त्रास जाणवेल. कुटुंबात ज्येष्ठ मंडळींच्या प्रकृतीचा अचानक प्रश्र्न उद्भवेल.
| शुभं-भवतु ||