Read in
सोमवार 25 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 25 जानेवारी 2021 आज चंद्ररास वृषभ 13:01 पर्यंत व नंतर मिथुन. चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 25:54 पर्यंत व नंतर आर्द्रा.
वरील रास व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज बुध कुंभ राशीमधे प्रवेश करत आहे दुपारी 04:29 ला. आजचा दिवस शुभ आहे.
मेष :–आज पुरूष मंडळीना ब्लड रिलेशनच्या नात्यातून विशेष लाभ होणार आहे. प्रसिद्धी, जाहिरात क्षेत्रात काम करणार्यांना आपल्या कामाचे प्रमोशन करता येणार आहे. वयस्कर मंडळीना गळा, घसा व छातीमधे दुखण्याचा त्रास होणार आहे. योग्य त्या डाँक्टरांचा सल्ला घ्या.
वृषभ :–महिलांची बर्याच दिवसापासूनची इच्छा पूर्ण होणार आहे. आवडत्या रंगाची व प्रकारची साडी बंधुराजांकडून भेट म्हणून मिळेल. तरूणां कडून आज महत्वाचे काम उद्यावर पुढे ढकलले जाईल. राजकीय मंडळींच्या कामात एखादे विघ्न येण्याची दाट शक्यता आहे.
मिथुन :–पतीपत्नीमधील वादाचे पर्यावसान संघर्षामधे होईल तरी काळजी घ्यावी लागेल. कोर्टातील कामात अचानक गुंतागुंत वाढल्याचे जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी इतरांचे आजारपण सुरू असूनही तुमची प्रकृती ठणठणीत राहील.
कर्क :–गूढविद्ध्येच्या व कुंडलिनी जागृतीच्या अभ्यासकांना अचानक जादुची कांडी सापडल्याचे जाणवेल. व्यवसायात दिवाळखोरीत अडकलेल्या व्यावसायिकांना अडचणींवर मदत करणारा देवदूत सापडेल. निवृत्त झालेल्या ज्येष्ठ मंडळींना समाजातून मानाचे स्थान मिळेल.
सिंह :–पतीपत्नीमधील दुरावा संपण्याचे मार्ग समोर येतील. मैदानी खेळाच्या शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल व त्यात तुमचा नंबर लागेल. फँन्सी वस्तूंऐवजी घरगुती वस्तूंच्या व्यवसायांना जास्त मागणी मिळेल. महिलांकडून अचानक गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च केले जातील.
कन्या :–नव्याने व्यवसायात आलेल्यांचा चांगला जम बसू लागल्याचे जाणवेल.आजी आजोबांना नातवंडाची काळजी सतावेल. आईकडील नात्यातून अत्यानंदाची बातमी कळेल. संशोधन क्षेत्रातील मान्यवरांच्या कामात चांगली गती येईल व आत्मविश्वासही वाढेल.
तूळ :–सध्या सुरू असलेल्या उद्योगातून चांगली भरभराट होणार असल्याचे संकेत मिळतील. अध्यात्मिक व धार्मिक मंडळी लवकरच तीर्थक्षेत्रास भेट देण्याचे नियोजन करतील. दूर परगावी असलेल्या घराची व मालमत्तेची चिंता सतावेल.
वृश्र्चिक :–वकिलांना अशिलांकडून चुकीची माहिती मिळण्यास धोका आहे तरी वकील मंडळीनी जागरूक रहावे. लहान मुलांना खोटे बोलावेसे वाटेल तरी मोठ्यांनी लहानांना प्रोटेक्ट करू नये. कुटुंबातील सर्वानीच सहविचाराने निर्णय घेतल्यास कोणत्याच अडचणींचा बाऊ वाटणार नाही.
धनु :–तुमच्या अत्यंत आवडत्या व्यक्तीची भेट होईल. व त्यांच्याबरोबर सुग्रास भोजनाचा योग येईल. तरूणांना पित्ताचा त्रास संभवतो. भागिदारीच्या व्यवसायात नव्याने गुंतवणूक करावी लागण्याची गरज निर्माण होईल. तरी तशी तरतूद करण्याच्या मागे लागा.
मकर :–तुमच्याकडून कोणी कर्ज घेतले असल्यास ते न मागताही परत मिळण्याचे निरोप मिळतील. बरेच दिवसापासून तुम्ही ज्याच्या शोधात आहात तो पाळीव प्राणी उपलब्ध होईल. ब्लडप्रेशरचा त्रास असलेल्यांचे प्रकृती स्वास्थ बिघडेल.
कुंभ :–बांधकामाच्या काँन्ट्रक्टर्सना सार्वजनिक इमारतींचे काम मिळण्याची संधी आहे तरी टेंडर भरावयाचे असल्यास भरावे. बिघडलेले मानसिक स्वास्थ्य दुरूस्त होत असल्याचे जाणवेल व मन आनंदी राहील. . वयस्कर मंडळींच्या उजव्या गुडघ्याचा त्रास सुरू होईल.
मीन :–स्टेशनरीच्या दुकानातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल. घरगुती पार्लरचा व्यवसाय आज अचानक चांगला चालेल. कुटुंबात राहत्या घराच्या सजावटीचे विचार पक्के होऊन त्याविषयी इंटिरीअर डेकोरेटर्सची भेट घेण्याचे ठरेल.
| शुभं-भवतु ||
Thank you Tai