Read in
रविवार 24 जानेवारी ते शनिवार 30 जानेवारी 2021 चे साप्ताहिक राशीभविष्य
रविवार 24 जानेवारी आज चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र रोहिणी 23:59 पर्यंत. सोमवार 25 चंद्ररास वृषभ 13:01 पर्यंत व नंतर मिथुन. चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 25:54 पर्यंत व नंतर आर्द्रा.
मंगळवार 26 चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आर्द्रा 27:11 पर्यंत. बुधवार 27 चंद्ररास मिथुन 21:42 व नंतर कर्क. चंद्रनक्षत्र पुनर्वसु 27:48 पर्यंत व नंतर पुष्य. गुरूवार 28 चंद्र रास कर्क दिवसरात्र. चंद्रनक्षत्र पुष्य 27:50 पर्यंत नंतर आश्लेषा. शुक्रवार 29 चंद्ररास कर्क 27:20 पर्यंत नंतर सिंह. चंद्रनक्षत्र आश्लेषा 27:20 पर्यंत. शनिवार 30 चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा 26:27 पर्यंत.
मंगळवार दि. 26 गणराज्य दिनाच्या सर्वाना हार्दीक शुभेच्छा.
गुरूवार 28 श्री शाकंभरी पौर्णिमा. श्री शाकंभरी नवरात्र समाप्ती.माघ स्नानारंभ.
मेष :–24, 25 मनासारखी खरेदी करता येणार आहे. त्याचबरोबर बाहेर फिरण्याचा व जेवणाचा बेत चांगला जमणार आहे. 26, 27 ला शिक्षणासंबंधातील ज्या पत्रांची तुम्ही वाटबघत आहात ती व अजून पर्यंत न आलेली पत्रे येणार आहेत. सिनेमा, नाटक तसेच कला क्रिडाच्या क्षेत्रातील मंडळींना 28 व 29 हे दोन दिवस आश्र्चर्यकारक अनुभवाचे जाणार आहेत. 30 रोजी तुम्हाला समोरच्यावर हुकुमत गाजवाविशी वाटेल. व्यवसाय उद्योगात तुमचीच मनमानी चालवाल.
वृषभ :–24, 25 या दोन्ही दिवशी स्वत:च्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी करता येणार आहेत. दुसर्याला विचारले तरी नकार येणारच नाही. नोकरीत सहभोजनाचा आनंद मिळेल. 26 व 27 रोजी दगदग, मानसिक कष्ट व शारिरीक थकवा येईल. वयस्कर मंडळीनी या दोन दिवसात घरातच आराम करावा व शांत रहावे. 28 व 29 डोक्यात गुंतवणूक चे विचार येतील पण अचानक मनात आले म्हणून गुंतवणूक करू नका. आज तुमच्याकडून औषधासाठी बराच खर्च होणार आहे.
मिथुन :–26 व 27 हे दोन दिवस पराक्रम करायला फारच महत्वाचे आहेत. तुम्हाला जी उडी मारायची ती बिनधास्त मारा. 28 व 29 बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला असल्यास आज चौकशी करा. तुमचे काम सोपे होणार आहे. जी निवृत्त मंडळी पेन्शनची वाट बघत आहेत त्यांना पेन्शनचे काम पूर्ण झाल्याचा निरोप येईल. उच्चशिक्षणासाठी जाणार्यांनी सर्व बाबी नीट समजून घ्याव्यात व नंतरच पुढील व्याप करावा. 30 ला फक्त आराम करायचा दिवस आहे. 24 व 25 रोजी हरवलेली व न सापडणारी वस्तू थोड्याश्या प्रयत्नाने सापडेल.
कर्क :–24 व 25 रोजी मित्रमंडळींच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास हजेरी लावता येणार आहे. ज्यांच्या जीवावर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्यांची भरभक्कम मदत मिळेल. 26 व 27 ला तुम्ही कांहीही सांगितले नाही तरी तुमच्या मनातील गोष्टी इतरांना ओळखता येणार आहेत. अध्यात्मिक मंडळीना इतरांना मार्गदर्शन करावे लागेल. 28 व 29 रोजी दुसर्याच्या कामाचा व्याप अंगावर ओढवून घ्याल. सरकारी मंडळीनी कोणत्याही कामातील जबाबदारी टाळू नका. 30 ला विरोधासाठी विरोध करण्याची प्रवृत्ती उफाळून येईल.
सिंह :–30 रोजी तुम्ही तुमच्या मनाचे राजे असाल. बर्याच गोष्टी अचानकपणे तुमच्याच बाजूने होतील. 24 व 25 या दोन दिवसात नोकरीतील महत्च्याच्या कामासाठी प्रवास करावा लागेल व दुसर्या आँफीसला भेट द्यावी लागेल. 26 व 27 फक्त आणि फक्त औषधांच्या शेअर्समधे पैसे गुंतवा चांगला नफा होईल. 28 व 29 रोजी अनपेक्षितपणे एखाद्या मोठ्या खर्चाला तोंड द्यावे लागेल. स्वत:चे एटीएम किंवा क्रेडिट कार्ड क्षणभरासाठीही दुसर्यांकडे देऊ नका.
कन्या:–अध्यात्मिक क्षेत्रातील अभ्यासकांना 24 व 25 हे दोन्ही दिवस श्री गुरूमाऊलीच्या मार्गदर्शनाचा लाभ होणार आहे. 26 व 27 रोजी प्रथम संततीच्या तब्बेतीची तक्रार उद्भवेल. प्रसंगी दवाखान्यात अँडमिट करावे लागेल. 28 व 29 वैवाहिक नात्यातील बिघडत चाललेल्या गोष्टींवर उपाय सापडेल. तसेच दुरावा निर्माण झालेल्यांचे पुनर्मिलन होण्याचे संकेत मिळतील. 30 ला जूने पुराने वाद उकरून काढण्याची इच्छा होईल.
तूळ :–30 रोजी मोठ्या कामात हात घालाल व सुरूवातही करून दाखवाल. हरवलेल्या व्यक्तीचा ठावठिकाणा कळेल. निवडणूक चा विचार करत असलेल्यांनी उतावळेपणा करू नये. कालपर्यंत तुमची साथ देत नसलेले 24 व25 ला तुमच्यात येउन सामिल होतील व तुमची तळी धरतील. 26 व 27 ला न्यायालयीन बाबींत गुंतून पडू नका. तसेच कांही वाद नव्याने निर्माण होणार नाहीत याची दखल घ्या. 28 व 29 हे दोन्ही दिवस अत्यंत लाभदायक जातील. व्यवसायात नवीन राबवलेल्या कल्पनांना मूर्त स्वरूप येईल.
वृश्र्चिक :–24 व 25.रोजी जे काम करणार आहात त्याचे पडसाद 30 ला उठणार आहेत. केलेल्या कामाचा परिणामही 30 ला बघायला मिळेल. 26 व 27 रोजी महिलांना आपल्या व्यवसायासाठी नवीन कल्पना सापडतील तरी त्यांनी लगेच त्या अंमलात आणू नयेत. प्रथम 30 च्या परिणामांचा अभ्यास करावा व नंतरच विचार करावा. 28 व 29 ला विद्यार्थ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन मिळेल, पण त्यांनी कंटाळा करू नये.
धनु :–30 रोजी तुम्हाला सेवाभावी काम करण्याची संधी मिळेल तरी ती संधी सोडू नका. संत पुरूषांची भेट होऊन उपदेश मिळेल. अपत्य प्राप्तीच्या इच्छुकांचे 26, 27 रोजी दत्तक संतती घेण्याचे निश्र्चित होईल. मूर्तीकला अवगत असलेल्यांना मूर्ती बनवण्याची एक अनोखी संधी मिळेल. 24 व 25 रोजी स्पर्धा परिक्षा बाबतची माहिती मिळेल व विचार पक्का होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमची कामातील तत्परता व चोखपणा तुम्हाला सन्मान मिळवून देईल. 28 व 29 हे दोन्ही दिवस तुम्हाला प्रकृतीच्या बाबतीत काळजीपूर्वक वागावे लागेल.
मकर :–24 व 25 रोजी तरूणांना आपल्या प्रेमाचा विचार विवाहात करता येणार आहे. शिक्षक व प्राध्यापक यांना स्पेशल कोचिंगसाठी विचारणे होईल. 26 व 27 मधे बर्याच दिवसापासून आजारी असलेल्यांना आपल्या आजाराच्या स्वरूपाची कल्पना येईल. 26 चा दिवस अशुभ असल्याने ज्या तपासण्या करायच्या आहेत त्या 27 रोजी करून घ्याव्यात. 28 व 29 रोजी विवाहाच्या बाबतीत वयातील अंतराला जास्त महत्व देऊ नये. 30 रोजी पुरूष मंडळीना सासुरवाडीला जाण्याचा योग येईल.
कुंभ :–. 24 व 25 रोजी आईच्या आजारपणाबाबत चिंता निर्माण होईल. योग्य त्या डाँक्टर्सचा सल्ला घ्या. 26 व 27 रोजी संततीकडून अतिशय आनंदाचे क्षण मिळतील. विवाहित मुलींना माहेरच्या घराला अचानकपणे आधार द्यावा लागेल. 30 रोजी व्यवसायातील चर्चा मानसिक ताण वाढवेल. ब्लडप्रेशरचा त्रास असलेल्यांनी काळजी घ्यावी. 28 व 29 रोजी तुमच्या अपेक्षेनुसार घराला योग्य भाडेकरू मिळतील.
मीन :–24 व 25 या दोन दिवसात परदेशी जाण्याचे निश्चित झालेल्यांनी आता व्हिसाचे काम करण्याचे विचार करावेत. पोस्ट आणि टेलिफोन च्या क्षेत्रात काम करणार्यांना आपल्या प्रमोशनचे मार्ग खुले झाल्याचे जाणवेल. 28 व 29 रोजी डाक्टर्स लोकांना प्रचंड मानसिक ताण सोसावा लागेल. 30 रोजी महिलांची सामाजिक कार्याविषयीची आस्था वाढेल व त्यांचा सहभाग उल्लेखनीय राहील. 26 व 27 नव्याने लागलेल्या नोकरीतून कर्ज काढण्यासाठीच पूरक कागदपत्रे सहजपणे उपलब्ध होतील.
|| शुभं-भवतु ||
Thank you Tai